शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

'हा' स्टार फुटबॉलपटू एकाच वेळी दोघींशी बांधणार लगीनगाठ

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 25, 2018 09:10 IST

ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डो कथित स्वरूपात दोन महिलांशी विवाह करणार असल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय.

नवी दिल्ली- ब्राझीलचा दिग्गज फुटबॉलपटू रोनाल्डिनो कथित स्वरूपात दोन महिलांशी विवाह करणार असल्यानं पुन्हा एकदा चर्चेत आलाय. मीडिया रिपोर्टनुसार, रोनाल्डिनो यंदाच्या ऑगस्ट महिन्यात प्रेयसी प्रिस्किला कोएलो आणि बीट्रिज सूजा या दोघांशी विवाहबंधनात अडकणार आहे. या दोघीही गेल्या वर्षी डिसेंबरपासून रिओ डी जेनेरोमधल्या हवेली येथे रोनाल्डिनोबरोबर राहतात. परंतु रोनाल्डिनोला या निर्णयामुळे कौटुंबिकच नव्हे, तर करिअरमध्येही मोठं नुकसान होऊ शकते, अशी चर्चा आता रंगू लागली आहे. 

38 वर्षीय रोनाल्डिनो 2016पासून बीट्रिजला डेट करतोय. तर प्रिस्किलाला तो बीट्रिजच्या पूर्वीपासूनच डेट करतोय. दोन्ही महिलांना या स्टार खेळाडूकडून 1500 पाऊंडचा भत्ताही मिळतोय. रोनाल्डिनो स्वतःच्या दोन्ही प्रेयसींशी एकसमान वर्तन करत असून, दोघींनाही सारखंच गिफ्ट देत असतो. त्यानं दोन्ही प्रेयसींना गेल्या वर्षीच्या जानेवारी महिन्यात लग्नासंदर्भात विचारलं होतं आणि त्यावेळी साखरपुड्याच्या निमित्तानं अंगठीही भेट दिली होती. रोनाल्डो या दोघींशी रिओमधल्या सांता मोनिका कोंडोमिनियममध्ये लग्न करणार आहे.रोनाल्डिनो काही निवडक मित्रांना या विवाह सोहळ्यासाठी आमंत्रित करणार आहे. तसेच ब्राझीलचे प्रसिद्ध गायक जॉर्ज वेरसिला या विवाह सोहळ्यात गाणार असल्याचंही समजतंय. या दुहेरी विवाहांमुळे रोनाल्डोला या करिअरमध्ये चांगलीच किंमत मोजावी लागू शकते. खरं तर रोनाल्डोच्या या दोघींशी लग्न करण्याच्या निर्णयाला त्याची बहीण देइसी हिचा विरोध आहे. या विवाह सोहळ्यात ती सहभाग होणार नसल्याचंही तिने आधीच स्पष्ट केलंय. रोनाल्डिनो आता राजकारणात स्वतःचं करिअर आजमावू पाहत आहे. रोनाल्डो लवकरच ब्राझीलमधल्या रिपब्लिक पार्टीत सहभागी होणार आहेत. 

टॅग्स :Footballफुटबॉल