शहरं
Join us  
Trending Stories
1
Mumbai: तोंडाला रुमाल बांधून आला अन् धाड, धाड; धारावीत भर बाजारात महिलेवर गोळीबार!
2
हिंजवडीत इमारतीवरून उडी मारून आयटी अभियंत्याची आत्महत्या, चिठ्ठीत लिहिले...
3
Badlapur: बदलापुरात रासायनिक कंपनीत आग!
4
Russia Ukraine War: 'रशियाकडे युद्ध थांबवण्याची शेवटची संधी' डोनाल्ड ट्रम्प यांचा पुतिन यांना इशारा!
5
मनसे कार्यकर्त्यांकडून कोचिंग सेंटरच्या संचालकाला मारहाण, कल्याण येथील व्हिडीओ व्हायरल
6
Sangli: नागपंचमीनिमित्त सांगलीत भाविकांना जिवंत नागांचे दर्शन घडणार, खेळावर बंदी कायम!
7
निशिकांत दुबेंना घेराव घातल्यानं राज ठाकरेंकडून वर्षा गायकवाड यांचे कौतुक, म्हणाले...
8
महापालिका निवडणुकीत आघाडी असणार की नाही, त्वरीत सांगा! पुण्यातून शरद पवार गटाची जाहीर मागणी
9
तब्बल ३८ तास बंद राहिला टोलनाका, तरीही २४ हजार लोकांनी प्रामाणिकपणे भरला टोल     
10
How To Deal With Heart Attack: घरात एकटे असताना 'हार्ट अटॅक' आला तर स्वत:चा जीव कसा वाचवाल? डॉक्टरांनी सांगितल्या 'या' सोप्या टिप्स
11
'नागपूरची लेक' वर्ल्ड चॅम्पियन दिव्या देशमुखला नितीन गडकरींचा 'व्हिडीओ कॉल', काय झाल्या गप्पा?
12
"महाराष्ट्राकडे 'बुद्धी आणि बळ' दोन्ही ओतप्रोत, ते जेव्हा..."; राज ठाकरेंकडून दिव्या देशमुखचं कौतुक
13
Pune Crime: 'छातीत दुखतंय', इंजिनिअर तरुण मीटिंग रुममधून उठला अन् सातव्या मजल्यावरून मारली उडी
14
वयोवृद्ध महिलेच्या खुनाचे रहस्य उलगडले, सावत्र मुलाला व पतीला अटक, गुन्हे शाखा दोनची कामगिरी
15
नागपुरला मिळाले ३५ वे पोलीस ठाणे; खापरखेडा पोलीस ठाणे आता नागपुरच्या कार्यकक्षेत
16
'अर्थव्यवस्था बंद करावी का?' रशियाकडून स्वस्त तेल खरेदी करण्याच्या वादाला भारताचे प्रत्युत्तर, आरसा दाखवला
17
Divya Deshmukh: बुद्धिबळाच्या पटावर नव्या 'क्वीन'चं राज्य! 'महाराष्ट्राची लेक' दिव्या देशमुख 'वर्ल्ड चॅम्पियन'; कोनेरु हम्पी उपविजेती
18
"ऑपरेशनला सिंदूर नाव देणं म्हणजे भावनांशी खेळ, एकाही देशाने साथ दिली नाही’’, अरविंद सावंत यांचा मोदी सरकारवर हल्लाबोल
19
'लाडकी बहीण योजनेला सुद्धा भ्रष्टाचारातून सुट्टी नाही'; रोहित पवारांचा अजित पवारांवर पलटवार, आदिती तटकरेंच्या खात्याचं प्रकरण काढलं
20
'शत्रूची किती विमानं पाडली, हे त्यांनी कधीच विचारलं नाही'; राजनाथ सिंह यांचा लोकसभेत राहुल गांधींवर निशाणा

#BestOf2017: वर्षभरात फुटबॉलची क्रेझ वाढली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 29, 2017 00:17 IST

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठरले.

२०१७ वर्ष भारतीय फुटबॉलसाठी अनेक प्रकारे महत्त्वपूर्ण आणि अभिमानाचे ठरले. जागतिक क्रमवारीत उंचावलेले स्थान, १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे यजमानपद आणि आशिया चषक स्पर्धेसाठी मिळवलेली पात्रता यांसह अनेक क्षण भारतीय फुटबॉलप्रेमींसाठी लक्षवेधी ठरले. मे महिन्याच्या सुरुवातीला भारतीय फुटबॉलसाठी सर्वांत मोठी आनंदाची बातमी आली. भारतीय संघाने जगातील अव्वल १०० देशांमध्ये स्थान मिळवत शानदार कामगिरी केली. विशेष म्हणजे केवळ तिसºयांदा अव्वल १००मध्ये स्थान मिळवण्यात भारताला यश आले होते. याआधी १९९६ साली भारताने ९४व्या स्थानी झेप घेतली होती. यानंतर याच वर्षी जुलै महिन्यात भारताने फिफा क्रमवारीत ९६वे स्थान पटकावले. गेल्या दोन दशकांमध्ये भारताचे हे दुसरे सर्वोत्तम स्थान ठरले. त्याचवेळी, नोव्हेंबर १९९३ मध्ये भारतीय संघाने ९९वे स्थान पटकावले होते. दरम्यान, यंदाच्या वर्षाची सांगता भरतीय संघाने १०५व्या स्थानाने केली आहे. विशेष म्हणजे २०१७ वर्षाची सुरुवात भारताने १२९व्या स्थानापासून केली होती. आशियाई देशांच्या क्रमवारीत भारतीय संघ कतारनंतर १५व्या स्थानी असून टीम जॉर्डन, बहारीन आणि उत्तर कोरिया यांच्या तुलनेत मात्र भारत पुढे आहे.टीम इंडियाची तब्बल ७७ स्थानांची झेपगेल्या दोन वर्षांमध्ये टीम इंडियाने तब्बल ७७ स्थानांची झेप घेतली. स्टीफन कॉन्स्टेनटाइन यांनी फेब्रुवारी २०१५मध्ये दुसºयांदा प्रशिक्षक म्हणून सूत्रे स्वीकारली, तेव्हा भारतीय संघ फिफा क्रमवारीत १७१व्या स्थानी होता. त्यात मार्च २०१५मध्ये संघाची १७३व्या स्थानी घसरण झाली होती. दरम्यान, त्यानंतर सुधारलेल्या मानांकनामध्ये कॉन्स्टेनटाइन आणि त्यांच्या संघाचा सिंहाचा वाटा राहिला आहे. या उंचावलेल्या स्थानामुळे संपूर्ण वर्षभरात भारतीयांमध्ये फुटबॉलची क्रेझ राहिली. त्यामध्ये अधिक भर टाकली ती १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेने.भारतानं केले  फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन‘फिफा’च्या मुख्य स्पर्धांमध्ये आतापर्यंत भलेही भारताला प्रवेश करता आला नसेल, पण २०१७ वर्ष भारताने १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक स्पर्धेचे आयोजन करून गाजवले. भारतीय क्रीडा क्षेत्रात पहिल्यांदाच फिफा स्पर्धेचे आयोजन होत असल्याने संपूर्ण जगाचे लक्ष भारताकडे लागले होते आणि यजमान म्हणून भारताने अपेक्षेपेक्षा जास्त चांगली कामगिरी करत स्वत:ला सिद्ध केले.१७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा आकर्षणाचं केंद्रभारताच्या, यजमानपदाखाली झालेली १७ वर्षांखालील फुटबॉल विश्वचषक स्पर्धा इतिहासातील सर्वाधिक प्रेक्षकसंख्या लाभलेली स्पर्धा ठरली. कोलकाता येथे झालेल्या तिसºया स्थानाच्या सामन्यानंतर प्रेक्षकसंख्या १२ लाख ३० हजार ९७६च्या पार गेली होती.हा विश्वविक्रम चीनने १९८५ साली आपल्या यजमानपदाखाली केला होता, जो भारताने अंतिम सामन्याआधीच मोडला. याआधी २०११ साली मॅक्सिकोमध्ये झालेल्या युवा विश्वचषक स्पर्धेतही प्रेक्षकसंख्या १० लाख २ हजार ३१४ इतकी झाली होती.फिफा स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय संघ म्हणून ऐतिहासिक कामगिरीयुवा विश्वचषक फुटबॉल स्पर्धेत यजमान भारताचे आव्हान साखळीतच संपुष्टात आले. मात्र, त्यांनी आपल्या खेळाच्या जोरावर सर्वांची मने जिंकली. झुंजार खेळाचे प्रदर्शन करत भारतीय युवांनी फिफा स्पर्धा खेळणारा पहिला भारतीय संघ म्हणून ऐतिहासिक कामगिरीही केली. त्याचवेळी, इंग्लंडने पहिल्यांदाच १७ वर्षांखालील फिफा विश्वचषक उंचावताना तुल्यबळ स्पेनचा ५-२ असा धुव्वा उडवला. या स्पर्धेत प्रेक्षकांचा जोरदार पाठिंबा मिळालेल्या ब्राझिलला मात्र तिसºया स्थानी समाधान मानावे लागले.भारताला करावा लागला डोपिंगचा सामनायंदाच्या वर्षी भारताला डोपिंगचाही सामना करावा लागला. अनुभवी गोलरक्षक सुब्रत पॉल याच्या लघुशंकेच्या नमुन्यामध्ये प्रतिबंधित असलेले टर्बुटेलिन आढळले. साधारणपणे खोकला आणि सर्दीच्या औषधांमध्ये याचे प्रमाण असते. यामुळे सुब्रतला सूचना देऊन सोडण्यात आले; कारण ‘नाडा’ समितीला कल्पना होती की सुब्रत मुद्दामहून डोपिंग उल्लंघन करणार नाही.इंडियन सुपर लीगला आशियाई फुटबॉल महासंघाची मान्यतायंदा इंडियन सुपर लीगला आशियाई फुटबॉल महासंघाची मान्यता मिळाली. यामुळे लीगमधील विजेत्या संघाला एएफसी कप स्पर्धेत थेट प्रवेश मिळणार आहे. त्याचप्रमाणे याच वर्षी ऐजल एफसीने सर्वांनाच आश्चर्याचा धक्का देताना आयलीग स्पर्धेचे जेतेपद पटकावले.प्रफुल्ल पटेल व अन्य पदाधिका-यांना निवडणूक लढवण्यास बंदीवर्षाअखेरीस मात्र भारतीय फुटबॉल क्षेत्राला मोठा धक्का लागला. राष्ट्रीय क्रीडा संहितेचे पालन न केल्याचे सांगत दिल्ली उच्च न्यायालयाने अखिल भारतीय फुटबॉल महासंघाचे (एआयएफएफ) अध्यक्ष प्रफुल्ल पटेल व अन्य पदाधिका-यांना निवडणूक लढवण्यापासून रोखले. उच्च न्यायालयाने एआयएफएफच्या संविधानामध्ये जरुरी संशोधन करण्यासाठी व पाच महिन्यांमध्ये निवडणूक करण्यासाठी माजी मुख्य निवडणूक आयुक्त एस. वाय. कुरेशी यांची प्रशासक म्हणून नियुक्तीही केली. मात्र, यानंतर सर्वोच्च न्यायालयाने उच्च न्यायालयाच्या आदेशाला स्थगिती दिली होती.

टॅग्स :2017 FIFA U-17 World Cupफिफा 17 वर्षांखालील विश्वचषक 2017Best of 2017बेस्ट ऑफ 2017Footballफुटबॉल