शहरं
Join us  
Trending Stories
1
India Oil Supply : "इराणचे जहाज भारताऐवजी चीनकडे का वळवले? केंद्र सरकारने मांडलं समुद्रातील 'खोटं' आणि 'खरं' गणित
2
होर्मुझनंतर आता 'बाब अल-मंदेब'वर इराणची नजर? एका ट्विटने खळबळ; काय होणार परिणाम?
3
खळबळजनक! १२१ आक्षेपार्ह Video, २ पेनड्राईव्ह...; नोकरीचं आमिष दाखवून महिलांवर अत्याचार
4
डोनाल्ड ट्रम्प यांची सुट्टी रद्द! व्हाईट हाऊसमध्ये युद्धाची तयारी? इराणच्या एका चालीने अमेरिका हादरली!
5
बारामती पोटनिवडणूक बिनविरोध करण्यासाठी ठाकरे पाठिंबा देणार का? संजय राऊतांनी सगळेच सांगितले
6
Video: खळखळ वाहणारं नदीचं पाणी अचानक दगडांमध्ये झालं गायब? निसर्गाची ही किमया पाहिलीत?
7
Raghav Chadha : Video - “घायल हूं, इसलिए घातक हूं,...”; AAP च्या गंभीर आरोपावर राघव चड्ढा यांचं चोख प्रत्युत्तर
8
इराणने रस्ता रोखला, पण भारताने शोधली नवी वाट; आफ्रिकेतील देशांशी मैत्री अन् रशियाची तुफान साथ!
9
DC vs MI : मुंबई इंडियन्सचा कॅप्टन बदलला! पांड्याच्या जागी सूर्याकडे जबाबदारी, जाणून घ्या त्यामागचं कारण
10
Gold Silver Price: महिन्याभरात ३५ हजारांनी स्वस्त झाली चांदी, तर सोनं १२ हजारांनी घसरलं; पाहा काय आहेत नवे दर
11
भाजपाने तिकीट नाकारल्यानंतर अन्नामलाई पहिल्यांदाच बोलले, म्हणाले, ‘मला निवडणूक लढवायची…’ 
12
होर्मुज संकटामुळे पाकिस्तानचं कंबरडं मोडलं; 'पेट्रोल बॉम्ब' फुटला, जनताही रस्त्यावर
13
पत्नी प्रियकरासोबत फिरताना दिसली, जाब विचारताच झालं उलट! दोघांनी मिळून पतीला हाणलं
14
Hanuman Mantra: घराबाहेर पडताना, वाहन चालवताना ११ वेळा म्हणा 'हा' दिव्य सुरक्षा कवच मंत्र; हनुमान करतील रक्षण!
15
शेअर बाजारातील घसरणीमुळे गुंतवणूकदार हवालदिल; Zerodha च्या नितीन कामथ यांनी दिला नवा मंत्र
16
Video - हृदयद्रावक! नातू पार्क करत होता गाडी, तेवढ्यात बॅक गिअर; आजीचा जागीच मृत्यू,
17
राहुल गांधी एकाकी?, LPG मुद्द्यावर काँग्रेसमध्ये फूट पडल्याचं चित्र; नेते करताहेत PM मोदींचे कौतुक
18
सर्वसामान्यांना मोठा दिलासा! किरकोळ चुकांसाठी आता पोलीस कोठडी नाही; 'जन विश्वास' कायद्याने चित्र बदलले!
19
IPL 2026, DC v MI Head To Head Record : दिल्ली कॅपिटल्सपेक्षा मुंबई इंडियन्स भारी, पण...
20
Rupa Bayor : धाकड गर्ल! तायक्वांदो जागतिक क्रमवारीत टॉप-५ मध्ये झेप घेणारी रूपा बायोर पहिली भारतीय
Daily Top 2Weekly Top 5

बेलारुसमध्ये सुरू आहे फुटबॉल लीग

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 27, 2020 03:23 IST

खेळाडूंना आपल्या स्वास्थ्याची चिंता आहे आणि केवळ कट्टर चाहतेच स्टेडियममध्ये सामने बघण्यासाठी जात आहेत.

मिन्स्क : जगभरात क्रीडा स्पर्धा ठप्प असताना बेलारुसमध्ये फुटबॉल लीगचे आयोजन करण्यात आले आहे. या स्पर्धेचे भारतासह अनेक देशांमध्ये प्रसारण होत असल्यामुळे आंतरराष्ट्रीय पातळीवर प्रेक्षक वाढले आहेत. खेळाडूंना आपल्या स्वास्थ्याची चिंता आहे आणि केवळ कट्टर चाहतेच स्टेडियममध्ये सामने बघण्यासाठी जात आहेत.एफसी स्लुटास्कचे चाहते याहोर खावान्स्की म्हणाले की, आठवडाअखेर फुटबॉल बघितल्याशिवाय चैन पडत नाही. बेलारुसमध्ये जीवन सामान्य पद्धतीने सुरू आहे. कारण येथील सरकारने कोरोना व्हायरसमुळे लॉकडाऊन करण्याचे विश्व स्वास्थ्य संघटनेची (डब्ल्यूएचओ) सूचना मानली नाही. बेलारुसची लोकसंख्या जवळजवळ एक कोटी आहे आणि येथे कोरोना व्हायरसचे ९५९० रुग्ण आढळले. त्यांचा शेजारी देश युक्रेनची लोकसंख्या त्यांच्या चौपट आहे, पण तेथे यापेक्षा कमी रुग्ण आहेत. बेलारुस फुटबॉल महासंघ सरकारच्या निर्णयानुसार चालत आहे. त्यांनी म्हटले की, सध्याच्या दिशानिर्देशांमध्ये ते सामन्यांचे आयोजन स्थगित करू शकत नाही. त्यांनी या आठवड्यात घोषणा केली होती की, महिला लीग दोन आठवडे उशिरा ३० एप्रिलपासून सुरू होईल. सामने सुरू ठेवल्यामुळे बेलारुस लीगला नवे जीवन लाभले आहे. रशियाचे सर्वांत मोठ्या क्रीडा प्रसारण कंपनीने मार्चमध्ये सामने प्रसारणाचे अधिकार विकत घेतले. त्यानंतर भारत व इस्रायलसह ११ अन्य देशांनी त्यांचे अनुकरण केले. (वृत्तसंस्था)