शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi Fastest Fifty :..अन् वैभव सूर्यंवशीनं रचला नवा इतिहास
2
नागरिकत्व पाकिस्तानी, मात्र 'दिल हिंदुस्थानी'! उल्हासनगरात २५० जण 'भारतीय' होण्याच्या प्रतीक्षेत
3
'भारतीय सैन्य कधीही हल्ला करू शकते...', पाकिस्तानी संरक्षण मंत्र्याने व्यक्त केली भीती
4
RR vs GT : गिलचा कॅच सुटल्यावर बहिणीने मानले देवाचे आभार; तिची रिॲक्शन होतीये व्हायरल
5
पहलगाम हल्ल्याचा नवीन व्हिडिओ समोर; पर्यटकाच्या कॅमेऱ्यात कैद झाली संपूर्ण घटना, पाहा...
6
Padma Awards: क्रिकेटपटू आर अश्विनला पद्मश्री, हॉकीपटू श्रीजेशला पद्मभूषण; येथे पाहा संपूर्ण यादी!
7
पावसाळ्याआधी मृदा व जलसंधारणाविषयी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी घेतला 'हा' महत्त्वाचा निर्णय
8
'शरिया कोर्ट', 'कोर्ट ऑफ काजी'ला कायदेशीर मान्यता नाही; त्यांचे निर्देश बंधनकारक नाहीत: सर्वोच्च न्यायालय
9
मुलगी आयएएस अधिकारी झाली, आनंदोत्सवात वडिलांना ह्रदयविकाराचा झटका
10
युरोपात ब्लॅकआउट! फ्रान्स, स्पेनसह अनेक देशांमध्ये वीजपुरवठा खंडित; विमान, मेट्रोसेवा ठप्प
11
पहलगाम हल्यानंतर जम्मू-काश्मीरमध्ये ट्रेकिंगवर बंदी; पर्यटकांसाठी सूचना जारी...
12
मुंबईकरांचे जगणेच कठीण व्हावे, असाच सत्ताधाऱ्यांचा विचार; बेस्ट दरवाढीवरून आदित्य ठाकरे संतापले
13
आयपॅडमुळे विमानात उडाला गोंधळ, आणीबाणीची परिस्थिती, करावं लागलं एमर्जन्सी लँडिंग, कारण काय? 
14
कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धारामैय्या भर सभेत पोलीस अधिकाऱ्यावर भडकले, मारण्यासाठी उगारला हात, त्यानंतर...  
15
दिल्ली बिहारपासून लांब आहे का? सर्वपक्षीय बैठकीला उपस्थित न राहिल्याने खरगेंचा PM मोदींवर निशाणा
16
भाजपने अध्यक्षपदाची निवडणूक पुढे ढकलली; पहलगाम हल्ल्यामुळे घेतला निर्णय
17
ही खिंड आहे पाकिस्तानचं ‘चिकन नेक’, PoKमधील या एंट्री पॉईंटवर भारताने कब्जा केल्यास होईल जबर कोंडी, कारवायांना लागेल लगाम
18
स्टायलिश लूकसह रॉयल एनफील्ड हंटर ३५० बाजारात; बघताच प्रेमात पडाल!
19
'आता चर्चा नाही, पाकिस्तानशी अखेरची लढाई...', पहलगाम हल्ल्यावरुन फारुख अब्दुल्ला संतापले
20
पहलगाम हल्ल्याबाबत काँग्रेस नेत्यांच्या विधानांवर राहुल गांधी नाराज; मल्लिकार्जुन खरगे समज देणार

रशियाची मैदानावरील लढाई कठीण

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: June 15, 2018 02:17 IST

रशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा.

- रणजीत दळवीरशियासाठी विश्वचषक स्पर्धेत मैदानावरची लढाई महत्त्वाची ठरणार आहे. अशी विश्वस्तरावरची स्पर्धा आयोजित करण्यामागे मूळ हेतू असतो तो त्या देशातील एकूणच खेळाची व्यवस्था सुदृढ, सशक्त बनवून त्या खेळाचा विस्तार होऊन लोकप्रियता वाढविणे हा. तसेच विश्वस्तरावर आपल्या देशाची प्रतिमा उंचावण्याचाही प्रमुख हेतू असतो. आपले अर्थकारण, त्यायोगे साध्य झालेला विकास, केलेली प्रगती याचा ताळेबंदही जगासमोर मांडण्याची ती अमूल्य संधी असते. बाकी पर्यटन वगैरे अशी दुय्यम कारणेही असतातच.हा देश एकेकाळची क्रीडाविश्वातील महासत्ता! पण सोव्हिएत संघाच्या विघटनानंतर त्यांच्या या प्रतिमेला ग्रहण लागले. एवढे की रिओ आॅलिम्पिकमध्ये त्यांच्या अ‍ॅथलिट्सना आॅलिम्पिक समितीच्या ध्वजाखाली स्पर्धा करावी लागली. यामागचे मुख्य कारण म्हणजे त्यांचे अनेक खेळाडू ‘डोपिंग’मध्ये अडकले होते. तेव्हा हे संशयाचे भूत दूर करण्यासाठी फुटबॉलला प्रथम संधी मिळते आहे. या देशाचा फुटबॉल इतिहास १०० वर्षांचा आहे. त्झारचे रशियन एम्पायर, त्यानंतर सोव्हिएत संघराज्य आणि आता रशिया असा खेळाचा प्रवास. तेव्हा, आपला संघ काय करतो याकडे देशाचे लक्ष असणारच! मात्र आपला संघ कुठपर्यंत मजल मारणार याचे उत्तर कट्टरातले कट्टर पाठीराखेही देऊ शकणार नाहीत. शिवाय युरोप आणि संपूर्ण जगाचे लक्ष रशियाकडे राहील. १९६०च्या पहिल्या युरो स्पर्धेचे विजेतेपद व त्यानंतर १९६६च्या इंग्लंडमधील विश्वचषक स्पर्धेतील उपांत्य फेरीपर्यंतची धडक एवढीच रशियाची आतापर्यंतची ठळक कामगिरी. तो काळ होता ‘ब्लॅक स्पायडर’ संबोधला गेलेला त्यांचा विश्वातील सर्वोत्तम गोलरक्षक लेव मशीन याचा. आजवर ‘गोल्डन बॉल’ जिंकणारा तो जगातील एकमेव गोलरक्षक हे विशेष.त्यानंतर संघ म्हणून रशियाची केव्हाच छाप पडली नाही. वैयक्तिक छाप पाडणारे अनेक स्टार पाहावयास मिळाले. रोमन पावलूचेन्को, व्हॅलेरी कार्पिन, आंद्रे आर्शविन असे स्ट्रायकर आणि रिनात दासेयेव्ह व इगॉर अकिनफिव्ह हे गोलरक्षक त्यात मोडतात. यातला इगॉर यंदा रशियाचा प्रमुख आधारस्तंभ असेल. त्याचा सीएसकेए मॉस्को या क्लबमधील सहकारी अ‍ॅलन झोगोएव्ह याकडेही मोठ्या आशेने बघितले जाईल. सेंटर बॅक जॉर्जी झिखिया गुडघा दुखापतीमुळे संघात नसेल आणि डेनिस चेरयेशेव (व्हिया रियाल) याचा अपवाद वगळता त्यांच्याकडील अन्य खेळाडू युरोपात अन्यत्र खेळत नाहीत. एका नवख्या, अननुभवी संघाला गटसाखळीतून पुढे नेणे प्रशिक्षक स्टॅनिसलाव्ह चेरचेसोव यांना शक्य होईल असे दिसत नाही. रशियाने स्पर्धात्मक फुटबॉलमध्ये शेवटचा विजय मिळवला त्याला वर्षे झाली जवळजवळ तीन! आणि येथे त्यांचा उरुग्वे व इजिप्त यांच्याशी कडा मुकाबला आहे. इजिप्तचा मोहम्मद सलाह काहीसा दुखापतग्रस्त आहे. तो खेळला किंवा नाही तरीही इजिप्तला हरविणे सोपे नाही. एकूणच रशियाची स्पर्धेतील वाटचाल कठीण आहे. त्यांना पहिल्या फेरीतच गाशा गुंडाळावा लागेल.

टॅग्स :FootballफुटबॉलFifa World Cup 2018फिफा विश्वचषक २०१८Sportsक्रीडा