शहरं
Join us  
Trending Stories
1
"आशिष शेलारांनी एकाच दगडात अनेक पक्षी मारले.."; उद्धव ठाकरेंनी केले कौतुक, नेमकं काय म्हणाले?
2
'आमच्याकडे सर्वाधिक अणुबॉम्ब, पृथ्वी 150 वेळा नष्ट होईल', डोनाल्ड ट्रम्पचा यांचा धक्कादायक दावा
3
Gen Z युवकांना सरकार का घाबरतंय?; उद्धव ठाकरेंचा सवाल, शाखेत उभी राहणार 'मतदार ओळख केंद्र'
4
Gold Silver Price 3 Nov: सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा बदल; पटापट चेक करा १४ ते २४ कॅरेट Gold चे लेटेस्ट रेट
5
पाकिस्तानने अण्वस्त्रचाचणी केली, डोनाल्ड ट्रम्प यांचा सनसनाटी दावा, दक्षिण आशियात तणाव वाढणार?
6
पडद्यामागचे तीन ‘शिल्पकार’! 'या' त्रिसूत्री धोरणासह भारतीय महिला संघानं लिहिली अविस्मरणीय स्क्रिप्ट
7
"मी तर चांगलं काम केलं होतं...", राष्ट्रीय पुरस्कार उशिरा मिळाल्याने शाहरुख खानने व्यक्त केली खंत
8
Tulasi Vivah 2025: तुलसी विवाहासाठी रामा तुळस योग्य की श्यामा? जाणून घ्या मुख्य भेद 
9
चीनला शह देण्याचा प्रयत्न! भारत ₹७००० कोटींपेक्षा अधिक रकमेची बनवतोय योजना
10
राज ठाकरे सकाळी ९च्या गर्दीत बदलापूर-कल्याणला चढून लोकल ट्रेनमध्ये विंडो सीट पकडू शकतील का?
11
Deepti Sharma : "मुलीला क्रिकेट खेळू देऊ नका..."; दीप्ती शर्माचे आई-वडील भावुक, सांगितला संघर्षमय प्रवास
12
टाटा ट्रस्ट्समध्ये नवा पेच! पुनर्नियुक्ती नाकारल्यानंतर मेहेली मिस्त्री यांचं मोठं पाऊल; सर्वांनाच पाठवली नोटीस
13
एकनाथ खडसेंच्या बंगल्यातून CD, पेनड्राईव्ह, कागदपत्रे चोरी झालेच नाहीत?, पोलीस तपासात काय समोर आलं?
14
राज ठाकरेंना दोन लाख मुस्लीम दुबार मतदार का दिसले नाहीत? शेलार म्हणाले, 'अजून वेळ गेलेली नाही'
15
'सीपीआर द्यायचं माहीत नाही, व्हिडीओ काढले'; महिला वकिलाचा कोर्टातच दुर्दैवी मृत्यू, शेजारीच होते रुग्णालय
16
हनिमूनसाठी जोडप्याने बुक केली दुबई ट्रीप, लाखो रुपये दिले; परदेशात पोहोचल्यावर बसला मोठा धक्का!
17
पाकिस्तानबद्दल एक गोष्ट सांगून डोनाल्ड ट्रम्प यांनी भारताचं टेंशन वाढवलं? असं काय म्हणाले अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष?
18
यूपी, बंगाल, तामिळनाडूसह 12 राज्यांमध्ये उद्यापासून SIR प्रक्रिया सुरू; 'या' पक्षांचा तीव्र विरोध...
19
'भुल भूलैया ४'मध्ये अक्षय कुमार-कार्तिक आर्यन एकत्र येणार? चर्चा सुरु; दिग्दर्शक म्हणाले...

Asian Games 2023 : सुनील छेत्रीच्या नेतृत्वाखालील भारतीय संघ जाहीर; महाराष्ट्राच्या खेळाडूला संधी

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2023 21:09 IST

या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे.

या वर्षी चीनमध्ये होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धा २०२३ साठी भारतीय फुटबॉल संघाची घोषणा करण्यात आली आहे. सुनील छेत्रीसह २२ खेळाडूंचा संघात समावेश करण्यात आला आहे. प्रशिक्षक इगोर स्टीमॅक यांच्या मार्गदर्शनाखाली भारतीय संघा खेळणार आहे. या वर्षी आतापर्यंत खंडीय आणि सैफ चॅम्पियनशिपचे विजेतेपद जिंकल्यानंतर आता भारतीय फुटबॉल संघ ९ वर्षांनंतर प्रथमच आशियाई क्रीडा स्पर्धेत सहभागी होण्यासाठी चीनला रवाना होणार आहे. 

हँगझोऊ येथे होणाऱ्या आशियाई क्रीडा स्पर्धेपूर्वी भारतीय पुरुष आणि महिला फुटबॉल संघांना खेळणे कठीण मानले जात होते. कारण क्रीडा मंत्रालयाने आशिया खंडातील अव्वल- ८ संघच यात सहभागी होऊ शकतात असा नियम केला होता. मात्र, भारतीय फुटबॉल महासंघाच्या आवाहनानंतर मंत्रालयाने नंतर शिथिलता देत भारतीय फुटबॉल संघाला आशियाई क्रीडा स्पर्धेत जाण्याची परवानगी दिली.

२३ वर्षांखालील खेळाडू आशियाई क्रीडा स्पर्धेत भाग घेतात. पण कोरोना व्हायरसमुळे हे गेम्स २०२२ ऐवजी २०२३ मध्ये होणार आहेत. त्यामुळे २४ वर्षांवरील खेळाडूंनाही सूट देण्यात आली आहे. भारताच्या पुरुष संघाला यजमान चीन पीआर, बांगलादेश आणि म्यानमारसह अ गटात स्थान देण्यात आले आहे. यात २३ संघ असून त्यांची सहा गटात विभागणी करण्यात आली आहे. गट अ, ब, क, ई आणि फ मध्ये प्रत्येकी चार संघ आहेत तर गट ड मध्ये तीन संघ आहेत.    आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारतीय फुटबॉल संघ पुढीलप्रमाणे आहे:- गोलरक्षक: गुरप्रीत सिंग संधू, गुरमीत सिंग, धीरज सिंग मोइरांगथेमबचावपटू: संदेश झिंगन, अन्वर अली, नरेंद्र गेहलोत, लालचुंगनुंगा, आकाश मिश्रा, रोशन सिंग, आशिष रायमिडफिल्डर: जॅक्सन सिंग, सुरेश सिंग, अपुईया राल्टे, अमरजीत सिंग, राहुल केपी, नौरेम महेश सिंगफॉरवर्डः शिवशक्ती नारायणन, रहीम अली, अनिकेत जाधव, विक्रम प्रताप सिंग, रोहित दानु, सुनील छेत्रीमुख्य प्रशिक्षक: इगोर स्टीमॅक

टॅग्स :Asian Games 2023आशियाई स्पर्धा २०२३FootballफुटबॉलSunil Chhetriसुनील छेत्री