शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या मध्यस्थीचे 'डर्टी सीक्रेट'! १००० खोल्यांचा सौदा केला, आसिम मुनीर यांनी ट्रम्प यांना दिली ८,३०० कोटींची ऑफर
2
Ashok Kharat : अशोक खरातला न्यायालयीन कोठडी; उद्या पुन्हा नव्या गुन्ह्यात कोर्टात सादर करण्याचे आदेश
3
Video : बॉयफ्रेंडला चीटिंग करताना रंगेहाथ पकडलं; भररस्त्यात गर्लफ्रेंडने धू-धू धुतलं, पण नंतर जे झालं…
4
इस्रायल तयार नव्हता...! ट्रम्प यांनी इराणला लुळा-पांगळा करण्याचा प्लॅन सांगितला; नेतान्याहू झटकन तयार झाले...
5
थायलंडच्या महाराजांना भेटायला गेले भारतीय राजदूत; समोर अधिकारी गुडघ्यावर बसले, कारण काय?
6
"बाबा, मला पोलीस नाही व्हायचं!" वडिलांचं स्वप्न बाजूला सारलं; आता स्विंगच्या जोरावर गाजवतोय आयपीएल
7
युद्धविराम १४ दिवसांचाच...! नंतर पुन्हा युद्ध सुरु होणार? ट्रम्प यांचा इशारा आणि नेतन्याहूंच्या अटी 
8
“PM मोदींचे अपयश, ट्रम्प यांनी इराण शस्त्रसंधीचे श्रेय चीन-पाकला दिले”; संजय राऊतांची टीका
9
RBI नं रद्द केला महाराष्ट्रातील 'या' बँकेचा परवाना; ग्राहकांच्या पैशांचं काय होणार? 
10
US Israel Iran War: युद्ध थांबलं? ट्रम्प यांची मोठी घोषणा, पण मोज्तबा खामेनेईंच्या एका वाक्याने पुन्हा खळबळ! म्हणाले..
11
Amravati Accident: कॅन्टीनला चहासाठी जाण्याच्या सवयीने चार युवकांचा घात; नागपूर-अकोला महामार्गावर ट्रकने कारला उडवले
12
इराणमधील संघर्ष थांबला, आता या दोन देशात तणाव वाढला, किम जोंगच्या सैन्याने डागली बॅलेस्टिक मिसाईल 
13
"होर्मुझच्या समुद्रधुनीत अमेरिका...!"; युद्धविरामानंतर ट्रम्प यांचा इराणला नवा संदेश; तेहरानमध्ये पुन्हा उभ्या राहणार इमारती?
14
युद्ध संपले, आता मदतीचा हात! २४ तासांत ट्रम्प यांचा 'यू-टर्न'; इराणच्या पुनर्निर्माणासाठी अमेरिका करणार सहकार्य
15
Vastu Tips: मनी प्लांट लावूनही पैसा टिकत नाहीये? मग 'या' ५ चुका तुम्ही करत नाही ना? तपासून घ्या!
16
नेपाळमध्ये भारतीय वाहनांसाठी नवा नियम, सीमेवरून वाहतुकीला निर्बंध; स्थानिकांमध्ये संताप
17
ST Fare Hike: उन्हाळी सुट्टीत ST प्रवाशांच्या खिशाला चटका; १०% भाडेवाढ; प्रवास १५ एप्रिलपासून महागणार
18
नाशिकचा 'भोंदू' अशोक खरात कोठडीत ढसाढसा रडला; पोलिसांना शाप देणारा बाबा आता नरमला!
19
विकृतीचा कळस! महिलांची अंतर्वस्त्रे चोरून कॅमेऱ्यासमोरच करायचा अश्लील कृत्य; रहिवाशांनी सीसीटीव्ही पाहिला अन्...
20
IPL 2026: मुंबईविरुद्धच्या सामन्यात जयस्वालची 'स्पेशल' सेंच्युरी; याआधी असं फक्त तिघांनाच जमलंय!
Daily Top 2Weekly Top 5

एएफसी फुटबॉल पात्रता फेरी : भारतीय संघ विजयी लय राखणार?

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 14, 2017 00:46 IST

गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे.

मडगाव : गेल्या १२ आंतरराष्ट्रीय सामन्यात अपराजित कामगिरी करणारा भारतीय फुटबॉल संघ उद्या म्यानमारविरुद्धच्या सामन्यातही विजयी लय कायम राखण्यासाठी मैदानात उतरणार आहे. २०१९ मध्ये होणाºया एएफसी फुटबॉल चषक पात्रता फेरीतील हा सामना गोव्याच्या पंडित जवाहरलाल नेहरू स्टेडियमवर खेळविण्यात येईल. सामन्यापूर्वी, भारतीय संघाचा कर्णधार सुनील छेत्री याने आपला इरादा स्पष्ट केला.‘अ’ गटात भारतीय संघ १२ गुणांसह आघाडीवर आहे. किर्गिस्तान आणि म्यानमार या दोन्ही संघांचे प्रत्येकी ४ गुणआहेत. त्यामुळे म्यानमार संघासाठी उद्याचा सामना महत्त्वाचा असेल. म्यानमारला त्यांच्या घरच्या मैदानावर भारतीय संघाने एकमेव गोलने पराभूत केले होते. त्याचा वचपा काढण्याचाही म्यानमार प्रयत्न करेल. दुसरीकडे, भारतीय संघाचे मनोबल उंचावलेले असून, हा संघ लय कायम राखण्याचा प्रयत्न करेल. भारतीय संघाचे प्रशिक्षक स्टिफन कोईन्स्टाईन म्हणाले की, म्यानमारवर आम्ही विजय मिळवलेला आहे. हा संघ तांत्रिकरित्या चांगला आहे. त्यांच्या कमकुवत बाजूंचाही आम्ही अभ्यास केला आहे. आम्ही जबाबदारीने खेळ केला तर विजय मिळवणे सोपे होईल. सुनील छेत्री यानेही संघ विजयासाठी संघ असल्याचा विश्वास व्यक्त केला.म्यानमारचे प्रशिक्षक गेर्ड जेईसे म्हणाले की, भारताविरुद्धचा उद्याचा सामना आमच्यासाठी अत्यंत महत्त्वाचा आहे. येथील वातावरणाशी जुळवून घेण्यासाठी आम्ही तीन दिवस अगोदर भारतात आलो आहोत. गेल्या सामन्यात आघाडीपटूंनी काही संधी गमावल्या होत्या. त्यामुळे आम्ही पराभूत झालो होतो. उद्याच्या सामन्यात सुधारणा होतील, अशी अपेक्षा आहे. भारतीय संघाची बचावफळी भक्कम असली तरी आम्ही सर्वतोपरी प्रयत्न करणार आहोत.म्यानमारची एआयएफएफकडे तक्रारम्यानमार संघ गोव्यात ज्या हॉटेलमध्ये मुक्कामास आहे, त्या हॉटेलच्या सुविधेबद्दल म्यानमार संघाने नाराजी व्यक्त केली आहे. हा संघ तीन दिवसांपूर्वी गोव्यात दाखल झाला होता. सूत्रांनुसार, म्यानमारच्या व्यवस्थापनाने अखिल भारतीयफुटबॉल महासंघाकडे तशी तक्रारही केली आहे.संघ असे : भारत- सुनील छेत्री (कर्णधार), गुरुप्रितसिंग संधू (गोलरक्षक), प्रीतम कोठल, संतोष जिंघम, अनस एदाथोडीका, नारायण दास, जॅकी चंद, यूजीनसन लिंगदोह, रॉल्वीन बॉर्जिस, रॉबिन सिंग, जेजे लालपेखुला.

टॅग्स :FootballफुटबॉलIndiaभारतMyanmarम्यानमार