शहरं
Join us  
Trending Stories
1
महिला डॉक्टर हॉटेलमध्ये का राहत होती? प्रशांत बनकरसोबत भांडण झालेले, समोर आले मोठे कारण...
2
'कॉल मर्जिंग स्कॅम'चा नवा धोका: तुमचा फोन सुरु असतानाच दुसरा कॉल येईल..., बँक खाते रिकामे होईल...
3
"टीम इंडियाला ऑस्ट्रेलियात माझी गरज होती, पण त्यांनी... "; अजिंक्य रहाणे सिलेक्टर्सवर बरसला
4
१९९० मध्ये एकाच ठिकाणी उभे होते भारत आणि चीन; मग ड्रॅगन कसा गेला पुढे, दिग्गज उद्योजकानं सांगितली संपूर्ण कहाणी
5
पंतप्रधान मोदींची 'ती' गाडी बिहारमधील लोकल गॅरेजवर धुण्यासाठी? प्रोटोकॉल तोडल्याच्या चर्चांना उधाण
6
'AI'ची मोठी चूक! चिप्सच्या पाकिटाला बंदूक समजले; शाळकरी विद्यार्थ्याला पोलिसांनी बेड्या ठोकल्या...
7
टाकाऊपासून टिकाऊ! कचऱ्यातील प्लास्टिकपासून बनवली काँक्रिटपेक्षा ३०% मजबूत विट
8
टीव्हीवरचं लोकप्रिय कपल, लग्नाच्या १४ वर्षांनी जय भानुशाली-माही विजचा घटस्फोट?
9
फक्त आरोग्य विमा काढणे पुरेसे नाही? 'या' एका नियमामुळे तुमचा क्लेम रिजेक्ट होईल, खिशाला बसेल भुर्दंड
10
Numerology: ‘या’ ४ पैकी तुमची बर्थडेट आहे? १८ वर्षांची महादशा-दोष दूर; राहु कृपेने पैसा-लाभ
11
"टाटा समूहात जे सुरू आहे, ते पाहून..," रतन टाटांचे निकटवर्तीय नोशीर सूरावालांनी अखेर मौन सोडलं
12
खळबळजनक! सुसाट डिफेंडरची ५ वाहनांना जोरदार धडक; तिघांचा मृत्यू, ५ जण जखमी
13
पैसे कमावण्याची संधी? ५ मोठे आयपीओ बाजारात येणार; लेन्सकार्टसह 'या' कंपन्यांची लिस्टिंगची तयारी
14
माजी CJI चंद्रचूड यांच्या विधानाचा आधार, राम मंदिराविरोधात याचिका; वकिलाला ६ लाखांचा दंड
15
दक्षिण चीन समुद्रात खळबळ; अर्ध्यातासाच्या अंतराने अमेरिकन नौदलाची दोन विमाने कोसळली
16
भारतापासून १४ हजार किमी दूर, १४ लाख लोकसंख्या; ‘हा’ देश बांधणार राम मंदिर, हिंदू वस्ती किती?
17
८ वा वेतन आयोग कधी लागू होणार? घोषणेच्या १० महिन्यांनंतरही अधिसूचनेची प्रतीक्षाच
18
साप्ताहिक राशीभविष्य: ६ राशींना ऑक्टोबर सांगता सुखाची, पद-पैसा-लाभ; ६ राशींना खडतर काळ!
19
ऑफर्स, ऑनलाईन चॅट्स, फसवणुकीचं जाळं...; iPhone चं आमिष दाखवून लाखोंची फसवणूक
20
भयानक प्रकार! भाजप नेत्याने शेतकऱ्याला थारखाली चिरडले, वाचवायला आलेल्या मुलींचे कपडे फाडले

Mango: हाताचा आंब्याचा वास संध्याकाळपर्यंत हाेता

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 10, 2022 12:45 IST

Mango: मागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो.

- संजय मोने, अभिनेतेमागच्या लेखात नाटकाच्या दौऱ्यावरच्या पहिल्या जेवणाची कथा तुम्हाला सांगितली. पुढे तो दौराही अत्यंत वाईट प्रयोग आणि दारुण अवस्था यात पार पडला. त्यानंतर परत एकदा कोकणात प्रयोग लागले. माझ्या गावी रत्नागिरीला प्रयोग होता, म्हणून घरी गेलो. लहानपणी दरवर्षी गावाला जात होतो. माझ्या आईने आमचे सगळे नातेसंबंध जपून ठेवले होते. वडिलांना अमुक एक भाऊ किंवा बहीण आणि इतर नाती असावीत, असा अंदाज असायचा. त्यामुळे कधीतरी ‘अहो! आत्ते नाही मामेभाऊ आहे तुमचा. नाव अशोक नाही सदानंद आहे’, असा आईचा आवाज कानावर पडायचा. त्यावर ‘तोच तो!’, असं बाबा म्हणायचे. आजही तीच परंपरा मी चालवली आहे आणि माझी पत्नी तशीच सुधारणा करत असते. असो! तर रत्नागिरीला प्रयोग होता. मी गावाला गेलो होतो. आता माझी आई हयात नाही; पण माझ्या सगळ्या काकू ती उणीव जाणवू देत नाही. मोठी काकू (तिचे नाव सुधा होते) होती, त्यानंतर शोभाकाकू मग रोहिणीकाकू आणि अनघाकाकू. सगळ्यांचा स्वयंपाक जणू माझ्या आईच्या धाकट्या बहिणी असल्यासारखा उत्कृष्ट आणि एकसाची होता. मी जरा ब्राम्हणी आमटीच्या बाबतीत फारच चिकित्सक आहे; पण सगळ्या काकूसारखी (झेरॉक्स) आमटी करायच्या. दोन दिवस प्रयोग सांभाळून घरचं जेवण झालं. उन्हाळा असल्यामुळे आमरस, घरचा भात, आंबोशीचं लोणचं (हे खायला कोकणातला जन्म असायला लागतो) खाऊन शेवटच्या दिवशी रत्नागिरी शहरात प्रयोगाला पोचलो. नेहमीप्रमाणे उकाड्याने जीव हैराण झाला होता. प्रयोग संपला आणि जेवायला दत्त नावाच्या कार्यालयात पोचलो. साधारण दीड-दोन वाजले होते. प्रयोग संपवून घरी परत जायचे होते. म्हणून जे काय असेल ते पोटात ढकलायचं आणि निघायचं एवढं ठरलं होतं. पानं मांडली गेली आणि काय आश्चर्य! ताटात स्वर्ग! उत्तम पडवळ डाळिंब्यांची उसळ, मऊसूत पोळ्या, पंचामृत, टोमॅटोचा रस्सा ताक आणि फणसाच्या बियांची (आठळ्या म्हणतात त्याला.) भाजी.. मस्त शिजलेल्या आठळ्या. साधी फोडणी, साधा गोडा मसाला. वर ओलं खोबरं.. इतकं सुंदर जेवण की, ते उत्तम भटजी नावाचे दत्त उपाहारगृहाचे चालक म्हणाले, ‘अहो! हापूसचा रस आहे माझ्या दारचा तोही खाऊन बघा!’ मी त्यांना म्हणालो ‘उत्तम भटजी! माझ्या घरचा आलोय की खाऊन’. ते ही कोकणातले खट, म्हणाले; ‘प्रत्येक आंब्याचे पान निराळे आणि रसही निराळा’, आग्रहाखातर फक्त चार वाट्या रस प्यायलो. पुढे आठवतं ते इतकंच, मुंबईत सात वाजता आलो. हाताला येणारा आंब्याचा वास संध्याकाळीही दरवळत होता.

टॅग्स :MangoआंबाSanjay Moneसंजय मोने