शहरं
Join us  
Trending Stories
1
Latur: मारहाणीनंतर ‘छावा’चे कार्यकर्ते रात्री उशिरा रस्त्यावर; राष्ट्रवादीचे बॅनर फाडले
2
कोकाटेंचा राजीनामा मागितला, तटकरेंना निवेदन देत पत्ते फेकले, छावा आणि अजितदादांच्या कार्यकर्त्यांमध्ये राडा
3
"आमच्या निवेदनाला लाथाबुक्क्यांनी उत्तर देत असाल तर…’’, विजय घाडगे यांची संतप्त प्रतिक्रिया 
4
ऑपरेशन सिंदूरवेळी जीव धोक्यात घालून केली जवानांना मदत, आता लष्कराने १० वर्षांच्या मुलाला दिलं मोठं बक्षीस
5
"माणिकराव कोकाटे यांचा 'तो' व्हिडीओ AIच्या मदतीनं, मी स्वतः..."; भाजप आमदाराचा दावा
6
राजस्थानात मुसळधार पाऊस, अजमेरमध्ये तरुण वाहून जाता-जाता बचावला; असा वाचला जीव, बघा VIDEO
7
प्रवेश करताच लिफ्ट बंद, प्रवीण दरेकरांसह १७ जण अडकले, १० मिनिटं चालला थरार, अखेर दरवाजा तोडून केली सुटका
8
मांत्रिकाकडून पूजा केली, खड्डा खणला, तेवढ्यात आले पोलीस, गुप्तधन शोधताना पाच जणांना अटक
9
416%नं वाढला कंपनीचा नफा, आता शेअर खरेदीसाठी लोकांची झुंबड; ₹40 पेक्षाही कमी आहे किंमत!
10
हरीण बिथरले, महामार्गावरून सैरावैरा पळत सुटले, पुलावरून मारली उडी, झाला करुण अंत
11
असंवेदनशिल कृषीमंत्री कोकाटेंचा राजीनामा घ्या; विधान परिषदेतील विरोधीपक्षनेते अंबादास दानवे यांची मागणी
12
जम्मू-काश्मीरच्या किश्तवाडमध्ये चकमक, जैश-ए-मोहम्मदचे दहशतवादी लपल्याचा संशय
13
इंडोनेशियात प्रवासी बोटीला भीषण आग; प्रवाशांनी समुद्रात मारल्या उड्या...
14
उज्ज्वल निकम यांची केंद्रीय मंत्रिमंडळात वर्णी लागणार? भाजपा नेते म्हणतात, “काही अशक्य नाही”
15
हिमाचलमधील एका तरुणीनं दोन भावांसोबत का केलं लग्न? जाणून घ्या काय आहे ही 'जोडीदार प्रथा'?
16
"मी रमी खेळतच नव्हतो...!" व्हायरल व्हिडीओवर कोकाटेंचं स्पष्टीकरण, पण स्वतःच मांडल्या दोन थेअरी; एकदा म्हणाले जाहिरात, एकदा म्हणाले...!
17
भारतातील हे पर्यटन स्थळ बनतंय बँकॉक, वेश्या व्यवसायासाठी अल्पवयीन मुलींना आणलं जातंय, भाजपाच्या महिला नेत्याचा आरोप
18
Madha Crime: चेहरा छिन्नविच्छिन्न, रस्त्यावर रक्ताचे डाग! यात्रेत गेलेल्या १० वर्षांच्या कार्तिकचा कालव्यात सापडला कुजलेला मृतदेह
19
विकृतीचा कळस! लंडनमधील इस्कॉनच्या रेस्टोरंटमध्ये घुसून मुद्दाम खाल्लं चिकन; घाणेरडं कृत्य पाहून लोक संतापले
20
मराठमोळी मृणाल ठाकूर घटस्फोटीत अभिनेत्याच्या प्रेमात? "सीतारामम" चित्रपटात एकत्र केलंं काम

कोण म्हणतं जवसाची फक्त चटणीच होते? लाडू पासून कढीपर्यंत जवसापासून बरंच काही बनतं!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 12, 2017 18:45 IST

जवसाकडे दूर्लक्ष म्हणजे आरोग्याकडेच दुर्लक्ष. त्यामुळे यापुढे असे करु नका. जवसाच्या या भन्नाट रेसिपी ट्राय करा. सहज-सोप्या रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही!

ठळक मुद्दे* जवसात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्सचा समावेश असतो. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल संतुलित राहून हृदयविकार, रक्तदाब यासारख्या समस्या उद्वभत नाहीत.* खरं तर, दररोज एक चमचा जवसाची पूड आपल्या पदार्थांमध्ये घातली किंवा त्याचे सेवन केलं तरी अनेक आरोग्य समस्या तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत...

सारिका पूरकर-गुजराथीजवस...अत्यंत आरोग्यदायी घटक पदार्थ..सध्याच्या व्यस्त जीवनशैलीमुळे उद्भवणा-या अनेक आरोग्याच्या समस्यांवरचा सहजसोपा उपाय म्हणजे जवस. जवसात ओमेगा 3 फॅटी अ‍ॅसिड्सचा समावेश असतो. यामुळे शरीरातील कोलेस्ट्रोल संतुलित राहून हृदयविकार, रक्तदाब यासारख्या समस्या उद्वभत नाहीत. महिलांसाठी जवस तर वरदानच ठरते. कारण जवसाच्या नियमित सेवनामुळे महिलांच्या हार्मोन्स संतुलनास खूप हातभार लागतो. मासिक पाळी दरम्यानचा जास्तीचा रक्तस्त्राव नियंत्रित करण्यास जवस मदत करते. तसेच त्वचा, केस यांचंही आरोग्य जवसामुळे जपलं जातं. याशिवाय जवसात प्रोटीन, कॅल्शियमही भरपूर असतात. त्यामुळे बाळंतपणादरम्यान आलेला अशक्तपणा, कॅल्शियमची कमतरता भरु न काढण्यासाठीही जवस खाल्लं जातं. एवढ्यावरच जवसातील गुणधर्म संपत नाहीत. तर मधुमेह, कर्करोग यांसारख्या आजारांमध्येही जवसाचं सेवन अत्यंत लाभदायक आहे. बद्धकोष्ठतेवर तर जवसाची पूड रामबाण उपाय आहे. सांधेदुखीतही जवस तुमच्या मदतीला धावून येतं. जवसात फायबर मोठ्या प्रमाणात असल्यामुळे पचनसंस्थेचे सर्व विकार यामुळे दूर होऊ शकतात.एवढे सर्व औषधी गुणधर्म असूनही जवस आजच्या आहारातून हद्दपार झाले आहे. पूर्वी खुरसणी, जवसाची चटणी घरोघरी बनवली जात होती. भाकरीबरोबर ही चटणी अगदी दररोज तोंडीलावणे म्हणून पानात वाढली जात होती. आता मात्र जवस फक्त मुखवासाच्या पॅकमध्येच दिसत आहे. खरं तर, दररोज एक चमचा जवसाची पूड आपल्या पदार्थांमध्ये घातली किंवा त्याचे सेवन केलं तरी अनेक आरोग्य समस्या तुमच्यापर्यंत पोहोचणारच नाहीत...पण तसं होत नाहीये..जवस म्हणजे काहीतरी गावरान, चव नसलेला घटक एवढीच त्याची ओळख बनली आहे. फास्टफूडच्या मेन्यू लिस्टमुळे तर जवस आणखीनच दुर्लक्षित होत गेलं.शिवाय चटणीव्यतिरिक्त काय करणार जवसाचे ? हा प्रश्नही पडतोच. कारण सगळ्यांनाच जवस चटणीच्या स्वरूपात आवडतोच असे नाही..म्हणूनच जवसाचा आहारातील वापर मर्यादित राहून गेला आहे. मात्र जवसाकडे दूर्लक्ष म्हणजे आरोग्याकडेच दुर्लक्ष. त्यामुळे यापुढे असे करु नका. जवसाच्या या भन्नाट रेसिपी ट्राय करा. सहज-सोप्या रेसिपी तुमच्या कुटुंबाला आणखी हेल्दी बनवतील यात शंका नाही! 

 

1) जवसाचे लाडू

बेसन, नारळ, रवा, शेंगदाणे यापासून नेहमी लाडू बनवत आला असाल तुम्ही. पण जवसाचे लाडू बनवून पाहा. सर्व पौष्टिकता एका लाडूत सामावली जाते की नाही ते पाहा. भाजलेल्या जवसाची पूड, बदाम-काजू-अक्र ोड याची पूड आणि काळ्या खजूराची पेस्ट हे सर्व एकत्र करून लाडू वळावेत.

2) पराठा

कणिक, बेसन, ओवा, मीठ, भाजलेल्या जवसाची दोन चमचे पूड, गाजर, फरसबी, हिरव्या मिरचीचं वाटण याची कणिक मळून नेहमी करतो तसेच पराठे लाटून तूपावर शेकावेत.

 

3) गोड पराठाअत्यंत सोपा व तरीही रु चकर असा हा पराठा. भाजलेल्या जवसाची पूड, पीठीसाखर आणि साजूक तूप एकत्र करु न सारण बनवा. मोहन घालून भिजवलेल्या कणकेची पारी करु न त्यात हे सारण भरा आणि तूपावर शेका. मुलांना डब्यातही हा पौष्टिक पराठा तुम्ही देऊ शकता. 

4) डोसा, धिरडेकणकेत जवसाची पूड आणि मीठ, लिंबाचा रस, सिमला मिरची, गाजर, फरसबीचं वाटण, कोथिंबीर, आलं-लसूण-मिरचीचं वाटण, जिरे घालून धिरडे, डोसे बनवता येतात. 

 

 

5) क्रॅकर्स 

कणकेत ज्वारी, नागलीचं पीठ, जवसाची पूड , तीळ, कोथिंबीर, लसूण-मिरची पेस्ट घालून मळून घ्या. पोळपाटावर लाटून चिक्की करतो तसे चौकोनी तुकडे कापून ओवनमध्ये बेक करा. क्रॅकर्स  चहाबरोबर स्नॅक म्हणून खाऊन पाहा.. 

6) सलाड,ओट्सविविध कोशिंबिरी, सलाड यामध्ये जवसाचा वापर फोडणी देताना करा. जवसाची  टेस्ट रायता, कोशिबिंरीची तसेच सलाडची टेस्ट तर वाढवलेच शिवाय त्याची पौष्टिकताही. त्याचप्रमाणे ओट्स शिजवताना दूधाबरोबरच त्यात जवसही घाला. या चवीत देखील जवस आवडीनं खाल्ले जातील. 

7) केक,मफिन्स :

अंड्यातील प्रोटीन्स शाकाहरींना मिळू शकत नाहीत. ही कमतरता जवस पूर्ण करु शकते. केकच्या बॅटरमध्ये देखील जवसाची पावडर घातली तर हेल्दी केक सहज बनवता येतो. 

8) कढीताक-बेसनाची, कोकम घालून केलेली सोलकडी तसेच उपवासाची शिंगाडा पीठाची कढी आपण खाल्ली आहे. जवसाची कढी, ऐकायला नवल वाटतेय. परंतु खूप टेस्टी आणि हेल्दी अशी ही कढी आहे. चिंचेचा कोळ काढून त्यात जवसाची पूड घालून मिश्रण एकजीव करा. साजूक तूपात हिंग, जिरे, कढीपत्ता, अख्ख्या लाल मिरचीची फोडणी करा आणि कढी उकळवून गरमागरम खा. मीठ आणि गुळ अर्थात चवीप्रमाणे घाला. बिहारमध्ये ही कढी नेहमी केली जाते.