शहरं
Join us  
Trending Stories
1
अटारी जोधपूरपासून ९०० किमी दूर, ४८ तासांत कसे जाणार? पाकिस्तानात दिलेल्या महिला भारतात माहेरी आलेल्या
2
स्वामी पुण्यतिथी शिवरात्रि एकाच दिवशी: शिवकृपा, गुरुबळ लाभण्याची सुवर्ण संधी; ‘असे’ करा व्रत
3
पाकिस्तानविरोधात भारताची मोठी कारवाई! गृहमंत्री अमित शाहांचे सर्व मुख्यमंत्र्यांना 'हे' निर्देश...
4
मारुती सुझुकीला मोठा धक्का! सर्वाधिक गाड्या विकूनही तोटा, नेमकं काय आहे कारण?
5
ऐतिहासिक कामगिरीच्या उंबरठ्यावर सीएसकेचा कर्णधार महेंद्रसिंह धोनी, एलिट लिस्टमध्ये सामील होणार
6
'ते पुन्हा एकत्र येण्याची सध्या कुठलीही परिस्थिती नाही'; CM फडणवीसांचं पवार, ठाकरे बंधूंबद्दल राजकीय भाष्य
7
अमेरिका, ब्रिटनसाठी गेली ३० वर्षे पाकिस्तान दहशतवाद पोसतोय; पाकिस्तानी संरक्षण मंत्र्यांचा गौप्यस्फोट
8
पहलगाम हल्ल्याचा बाजारावरही परिणाम; ९ लाख कोटींचे नुकसान, अदानी पोर्टसह 'हे' शेअर्स आपटले
9
पीएसएलमध्ये काम करणाऱ्या सर्व भारतीयांना ४८ तासांत पाकिस्तान सोडण्याचे आदेश!
10
स्मरण दिन: स्वामींचे स्वप्नात दर्शन झाले? काय असू शकतात संकेत? जाणून घ्या नेमका अर्थ...
11
१ वर्ष एटीएम कार्ड वापरण्यासाठी बँक किती चार्ज घेते? 'या' कार्डवर द्यावे लागत नाही पैसे
12
अमित शाहांची सर्व राज्यांच्या मुख्यमंत्र्यांसोबत बैठक, पाकिस्तानी नागरिकांबद्दल दिला महत्त्वाचा आदेश
13
"निर्लज्ज पाकिस्तान", दहशतवाद्यांना 'स्वातंत्र्य सैनिक' म्हटल्यावर पाक क्रिकेटर प्रचंड संतापला
14
गुंतवणुकीत 'ही' काळजी घेतली, तर होऊ शकता मालामाल! कोणत्या गोष्टी लक्षात ठेवायच्या?
15
पंचग्रही ३ राजयोगात स्वामींची पुण्यतिथी: १० राशींना वरदान, लाभच लाभ; बक्कळ पैसा, असीम कृपा!
16
१९७१ च्या युद्धात भारताने पश्चिम पाकिस्तानमधील या भागांवर केला होता कब्जा, नंतर दिले होते परत, कारण काय?
17
धक्कादायक! लग्नातील जेवणामुळे उलट्या; ३७ मुलांसह ५१ जणांना अन्नातून विषबाधा
18
'बाभळीचं झाड सोडून आंब्याच्या झाडाखाली या'; ठाकरेंच्या आमदाराला भाजपच्या मंत्र्याकडून ऑफर
19
घटस्फोटानंतर फळफळलं धनश्री वर्माचं नशीब, या चित्रपटामधून करणार सिनेसृष्टीत पदार्पण
20
सोन्याच्या किमतीत पाकिस्तान भारताच्या ३ पाऊल पुढे; किंमत ऐकून ग्राहक जातायेत पळून

माझी खाद्ययात्रा: तुमकुर इडली... एक वडा-सांबार

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 21, 2022 07:03 IST

‘संजय उवाच’ नावाचा एकपात्री कार्यक्रम मी करू लागलो त्या काळात... साधारण २००४ च्या सुमारास. कारण? विनाकारण; पण तरीही एक कारण होतं.

संजय मोने, अभिनेते‘संजय उवाच’ नावाचा एकपात्री कार्यक्रम मी करू लागलो त्या काळात... साधारण २००४ च्या सुमारास. कारण? विनाकारण; पण तरीही एक कारण होतं. माझ्या भाचीच्या बंगळुरू महाराष्ट्र मंडळात एक कार्यक्रम करायचं मी ठरवलं. तिला सगळी रूपरेखा किंवा रूपरेषा कळवली. तिने होकार दिला. कार्यक्रमाची परवानगी घ्यायला लेखकाकडे गेलो. त्याने तिप्पट पैसे मागितले. देणं शक्य नव्हतं. आता काय करायचं? नाटकाच्या प्रयोगासाठी पुण्याला गेलो होतो. सुधीर गाडगीळ भेटला. ‘काय रे? काय झालं? नेहमीसारखा टर्रेबाजी करत नाहीयेस?’ मी त्याला घडलेला सगळा किस्सा सांगितला.‘इतकंच?’

सुधीरसाठी अशक्य असं काहीच नसतं. ‘इतकी वर्षं या व्यवसायात आहेस. बऱ्याच गोष्टी असतील की साचलेल्या, त्यांना एकत्र कर. जोडीने तुझे आवडते असे काही नाट्यप्रवेश असतील ना? ते सादर कर. शिवाय इतक्या वर्षांतले तुझे काही आडाखे असतील, ते नव्या पिढीसाठी सांग. दोन तासांचा कार्यक्रम होईल. दोन टप्पे पाड. एकानंतर मध्यंतर घे. झाला कार्यक्रम. शेवटच्या पंधरा मिनिटांत प्रेक्षकांच्या प्रश्नांना उत्तरं दे. अडीच तास होईल. इतकं पुरेसं आहे. जा, प्रयोग कर आणि भाचीला हो म्हणून सांग.’

त्याच्या दृष्टीने विषय संपला होता. माझ्या दृष्टीने सुरुवातही झाली नव्हती. मी परत आलो मुंबईला. बंगळुरूला पोहोचलो. आगतस्वागत झालं. मी त्यांना स्वच्छपणे सांगितलं, ठरवलेला कार्यक्रम होऊ शकत नाहीये; पण माझ्या मनात दुसरा एक आहे, तो मी आता तुम्हाला या माझ्या हॉटेलच्या खोलीत करून दाखवतो आणि तुम्ही ठरवा. आवडलं नाही तर माफी मागून मोकळा होईन. मी बोलत गेलो आणि त्यांना बहुतेक आवडला असावा. दुसऱ्या दिवशी पुन्हा बोलत गेलो, बोलत गेलो आणि सव्वातीन तास कार्यक्रम झाला. टाळ्यांचा कडकडाट..

सगळी मंडळी खुश. त्याहीपेक्षा मी. माझ्या भाचीने मला सांगितलं, ‘आमच्या मंडळातल्या लोकांना मी सांगितलंय, तो आपल्याबरोबर जेवायला येईलच असं नाही, बरोबर ना?’ मला फार कौतुक वाटलं तिचं. वाट फुटेल तिथे फिरत राहिलो. तिथेच एका लहानशा कोपऱ्यात बशीएवढी इडली खाल्ली, तुमकुर इडली. पांढरीशुभ्र. वर लाल रंगाची पावडर आणि पांढराशुभ्र लोण्याचा गोळा. दोन खाल्ल्या आणि लाज वाटून थांबलो. नंतर एक वडा-सांबार. खरं सांबार म्हणजे काय? तर ते. आपण घरी जरा वेगळी आमटी सांबार म्हणून खपवतो. डोसा मात्र महाराष्ट्रात प्रसिद्ध आहे, तो मैसोर डोसा कुठेही मिळाला नाही. नाही तरी बनारसला तरी मुंबईइतकं चांगलं बनारसी पान कुठं मिळतं?

टॅग्स :Sanjay Moneसंजय मोने