शहरं
Join us  
Trending Stories
1
माजी कमांडो मारला जाताच पाकिस्तान तडफडू लागला; तीन दहशतवाद्यांना 'निष्पाप पाकिस्तानी' म्हणू लागला...
2
पहलगामचा बदला घेतला; २६ पर्यटकांची हत्या करणारे तीन दहशतवादी ठार, अमित शाहांची माहिती
3
माणिकराव कोकाटेंचा राजीनामा घेणार?, अजित पवारांच्या निर्णयाकडे लक्ष; ३० मिनिटे बैठकीत चर्चा
4
'डोनाल्ड ट्रम्प यांची मध्यस्थी नाहीच; पाकिस्तानच्या विनंतीवरुन युद्धविराम,' जयशंकर यांची स्पष्टोक्ती
5
"जा, तुझ्या बायकोला ठेवून घेतली, काय करायचं ते कर.."; पत्नीच्या प्रियकराची धमकी, पतीनं संपवलं जीवन
6
नर्स निमिषा प्रियाची फाशीची शिक्षा खरंच रद्द झाली का? काय आहे या दाव्याचं सत्य? जाणून घ्या...
7
पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी अजित पवारांचं गडकरींना पत्र, केली 'ही' मागणी
8
'ऑपरेशन सिंदूर हा फक्त एक तमाशा होता', प्रणिती शिंदेंच्या वक्तव्याने नव्या वादाला तोंड फुटले
9
Jio- Airtel समोर टिकू शकणार नाही इलॉन मस्क यांची स्टारलिंक, असं काय केलंय सरकारनं? जाणून घ्या
10
Operation Mahadev : 'टी ८२' सिग्नल ठरले घातक; सुरक्षा दलांनी वेळेवर गाठले अन् पहलगाम हल्ल्याचे सूत्रधार संपवले!
11
"तीन वर्ष झाले तरी पैसेच मिळाले नाहीत...; मालिकेतील अभिनेत्याचे मंदार देवस्थळीवर आरोप
12
"मी जे काही केलं ते इतिहास जमा झालं,..." गंभीर असं का म्हणाला? जाणून घ्या त्यामागची गोष्ट
13
Operation Sindoor: पाकिस्तानच्या हल्ल्यात आईवडील गमावले! राहुल गांधींनी २२ मुलांना घेतलं दत्तक
14
Eknath Khadse : 'पोलिस आधीपासूनच प्रांजल खेवलकर यांच्यावर पाळत ठेवत होते'; एकनाथ खडसेंनी पुरावेच दिले
15
ED Raid: काल निरोप, आज...! माजी आयुक्त अनिलकुमार पवार यांच्यावर घरावर ईडीची धाड
16
खांदा फ्रॅक्चर झाला तरी आजोबांची 'ती' इच्छा केली पूर्ण; ५१ लीटर गंगाजल आणणाऱ्या नातवाचा मृत्यू
17
लाडकी बहीण योजनेत ४,८०० कोटींचा मोठा घोटाळा; सुप्रिया सुळेंचा महायुती सरकारवर गंभीर आरोप
18
'नवीन लोक येतात आणि चुकीचा इतिहास सांगतात'; अंधभक्त म्हणत सुप्रिया सुळे भाजप खासदारावर भडकल्या
19
'तुम्ही २० वर्षे विरोधी बाकावरच बसणार...', ऑपरेशन सिंदूरवरील चर्चेदरम्यान अमित शाह संतापले
20
४ वर्षात ७५० इंजेक्शन्स! दारूमुळे अंथरुणाला खिळला अभिनेता; किडनी फेल, आयुष्य झालं उद्ध्वस्त

माझी खाद्ययात्रा: एकदम हलकी टम्म फुगलेली कचोरी, संजय मोने यांची खुमासदार रेसिपी

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 05:29 IST

खान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं.

संजय मोने, अभिनेतेखान्देशात एकेकाळी नाटकाचे मस्त दौरे व्हायचे. जळगाव मग धुळे आणि भुसावळ असा दौरा असायचा. उन्हाळ्यात साधारण ४५ च्या आसपास तापमान असायचं. जीवाची तगमग म्हणजे काय ते त्यावेळी कळायचं. तंदुरी रोटीला काय वाटत असेल? याचा अंदाज यायचा. पण कधीकधी थंडीच्या दिवसात प्रयोग असायचे, तेव्हा मजा यायची. खान्देशात जेवण फार चविष्ट असतं शेंगदाण्याचा वापर असतो मसाल्यात..जळगावला माझा एक अत्यंत घनिष्ट मित्र राहायचा. भैय्या उपासनी त्याचं नाव. आता तो नाही. माझ्या आयुष्यात तो अचानक आला. आम्ही दोघे रात्र-रात्र गप्पा मारायचो. साथीला त्याचे एक दोन मित्र, काही उत्तम द्रव्य. शेवभाजी आणि भरीत भाकरी ही त्याने खायला घातली तशी आता पुन्हा मिळाली नाही. बनतही असेल उत्तम, पण आता तो नाही. वांग्यांचे तेलात फोडणी करून तुकडे टाकायचे, दाण्याचे कूट, थोडा काळसर मसाला, मस्त झणझणीत तिखट बरोबर भाकरी. 

ज्वारीची उन्हाळ्यात बाजरीची थंडीत... वरती तेल आणि एक अगम्य चटणी. जेवणाच्या ताटात स्वर्ग यायचा. हुरडा-बिरडा हा प्रकार खाण्यापेक्षा दुसऱ्या दिवशी पोट बंड करून उठतं म्हणून मला फारसा आवडत नाही. असे इतरही पदार्थ आहेत. तर जळगावचा एक किस्सा. एका नाटकाचा प्रयोग होता. भैय्याच्या घरी सकाळी नेहमीप्रमाणे पोहोचलो. उत्तम जेवण झालं. छानपैकी झोपही झाली. संध्याकाळी प्रयोगाला निघायचं म्हणून आवराआवर केली. अचानक भैय्या म्हणाला, “चल कचोरी खाऊया.” “कुठे?” “इथे जवळच” आम्ही त्याच्या बुलेटवरून कचोरीवाल्याकडे पोचलो. भैय्या पुन्हा एकदा उद्गारला “चेहरा आवडला नाही तर कचोरी देत नाही हां तो” “म्हणजे?” “म्हणजे तू त्याला कुरूप वाटलास तर कचोरी मिळणार नाही”

आरशात आपण नेहमी बघतोच. मला काळजी वाटायला लागली. जर मी त्याला कुरूप वाटलो तर? आणि हे सगळ्यांना कळले तर? नकोच विषाची परीक्षा.

“मला तशी फार भूक नाहीये” टाळायला म्हणून मी म्हणालो.

भैय्या त्याचं नेहमीचं गडगडाटी हास्य करून म्हणाला “आपण कसेही दिसत असलो तरी आपल्याला खायला मिळेल.” भैय्या रुबाबदार त्यामुळे त्याला मिळाली असती कचोरी, प्रश्न माझ्या साजिऱ्या रूपाचा होता. गाडी त्या कचोरीवाल्याकडे थांबली. मस्त कचोरी. धने आणि बडीशेप बेसन घातलेली एकदम हलकी टम्म फुगलेली. त्यावर दोन प्रकारच्या चटण्या आणि दही. एकदम मधुर. कोथिंबीर पेरलेली. थोडा कापलेला कांदा. भसाभस संपवली. पैसे देऊन झाल्यावर भैय्याने ओळख करून दिली. त्यावर तो कचोरीवाला म्हणाला अच्छी सुरात पायी है आपने. कभीभी आजाना! इतकं समाधान कधीही मिळालं नाही. आता माझ्या दिसण्याबद्दल मी निर्धास्त आहे.

टॅग्स :Sanjay Moneसंजय मोनेfoodअन्न