शहरं
Join us  
Trending Stories
1
"...तर आम्ही युद्धविराम करार धुडकावून लावू", लेबनानवरील हल्ल्यानंतर इराणचा थेट अमेरिकेला इशारा
2
थरकाप उडवणारा रक्तपात! दहा मिनिटांत ८९ ठार, ७०० जखमी; इस्रायलच्या हल्ल्यांनंतरची लेबनानमधील फोटो
3
मोजतबा यांची चिठ्ठी, मुनीर यांना कॉल...युद्धविरामाची रंजक कहाणी; डेडलाइन संपण्याआधी काय घडलं?
4
IPL New Rule: शिस्त पाळा नाहीतर…आयपीएल दरम्यान BCCI चा कडक नियम; फक्त ५ खेळाडूंनाच बाउंड्रीजवळ परवानगी
5
Israel Strikes: इस्रायलने लेबनानकडे वळवला मोर्चा! भयंकर हल्ले; अनेक शहरांत डागल्या मिसाईल्स, भयावह दृश्ये
6
DC समोर बटलर-गिलसह वॉशिंग्टनची सुंदर खेळी! तिघांच्या अर्धशतकाच्या जोरावर GT नं साधला 'द्विशतकी' डाव
7
"बारामतीची बिनविरोध झाली पाहिजे होती, पण काँग्रेसने उमेदवार का दिला? हे त्यांनाच विचारा", श्रीकांत शिंदेंचा निशाणा
8
IPL 2026 DC vs GT: बटलरची उत्तुंग फटकेबाजी! खास विक्रमासह गेल-पोलार्डच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
9
ना टॅरिफ, ना युरेनियम साठा, निर्बंधांमध्ये मिळणार मोठी सूट...; ट्रम्प म्हणाले, "इराणच्या सोबतीने काम करणार"!
10
युद्धविरामानंतर डोनाल्ड ट्रम्प यांचा नवा फर्मान; 'या' देशांवर लावणार ५०% टॅरिफ...
11
९,००० mAh बॅटरी, ६.७८ इंचाचा डिस्प्ले, ३२ MP फ्रंट कॅमेरा; OnePlus Nord 6 चा बाजारात धमाका!
12
Latest Marathi News Live: इराणची मदत करणाऱ्या 'त्या' देशांवर ५० टक्के टॅरिफ लावणार; डोनाल्ड ट्रम्प यांचे विधान
13
वैभव सूर्यवंशी ठरला IPL मधील नवा 'सिक्सर किंग'! ईशान किशनसह रिषभ पंतचा रेकॉर्ड मोडला
14
MPSC निकालात सोलापूरचा डंका! विजय लामकाने राज्यात प्रथम तर, आरती जाधव महिलांमध्ये अव्वल
15
मध्यपूर्वेतील संघर्षानंतर भारताची नवी संरक्षण रणनीती; समुद्री मार्ग, ड्रोन अन् अणु पाणबुड्यांवर भर
16
रोहित शर्मा नव्हे तर, 'हा' खेळाडू आहे जगातील पहिला हिटमॅन; ज्याच्या नावानं गोलंदाज थरथरायचे!
17
'वंडर बॉय' Vaibhav Suryavanshi पुढच्या हंगामात Mumbai Indians कडून खेळणार? 'ती' पोस्ट चर्चेत
18
"जे काम करतील, तेच..."; कामचुकार पदाधिकाऱ्यांना एकनाथ शिंदेंनी दिली तंबी; बैठकीतील इनसाइड स्टोरी
19
Kalyan Crime: रश्मी म्हणाली, "वेगळं राहू नाही, तर भांडणं सहन कर", जेवणावरून वाद अन् पतीने धावत्या रेल्वेसमोर...
20
"...तर भारत वर्षाला ३०० प्लुटोनियम अणुबॉम्ब बनवेल!"; कलपक्कमच्या यशानं पाकिस्तानच्या पोटात गोळा, फक्त भीतीनंच हादरला
Daily Top 2Weekly Top 5

मणिपूरच्या आजीबाईंचा ‘केली चना’

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 22, 2023 08:28 IST

ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल असा समज आहे की, इथे शाकाहारी खाणे कमी असते किंवा विचित्र पदार्थ असतात. तर तसे नाही.

स्ट्रीट फूड म्हणजे रस्ता खाणे म्हणताना आपण प्रामुख्याने महाराष्ट्र, गुजरात, उत्तर प्रदेश अशी राज्य बघतो. तुलनेत उत्तर पूर्व भारतातील खाणे तसे विचारात घेतले जात नाही! त्यामुळे आज बघुया मणिपूरमधील तुफान लोकप्रिय रस्ता खाणे : केली चना.

ईशान्य भारतातल्या राज्यांबद्दल असा समज आहे की, इथे शाकाहारी खाणे कमी असते किंवा विचित्र पदार्थ असतात. तर तसे नाही. या राज्यांमधील खाणे पर्यावरण, ऋतू यानुसार स्थानिक घटक पदार्थ घेऊन तयार होते.त्यामध्ये मांसाहारी पदार्थांइतकेच शाकाहारी पदार्थांचेदेखील वैविध्य आहे.

केली चना हा त्यातलाच एक चटपटीत पदार्थ. केली चनामध्ये वापरले जाणारे चणे म्हणजे काबुली किंवा काळे. अन्यत्र मिळते तशी ही चना चाट नाही तर मस्त तिखट अशी सुकी भाजी आणि मणिपूरमधील रस्ता खाण्यात हा पदार्थ अव्वल. उकडलेले चणे राईच्या तेलात कांदा, टोमॅटो, आले, लसूण, काही स्थानिक मसाले, तिखट यांच्या फोडणीत परतले जातात आणि वरून काळ्या तिळाची पूड अथवा अख्खे तीळ, कोथिंबीर, कांदापात घालून देतात. हवे तर वरून लिंबू पिळायचे! चव अफलातून असते. या भागातल्या काही मिरच्या जहाल तिखट त्यामुळे हवे असल्यास त्याचे वाटणही दिले जाते; अर्थात तो जाळ खायला जिगरा हवा!!

याच्यासोबत काहीही नसते. ब्रेड किंवा पुरी असे काहीही नाही आणि केली चना थोडा ओलसर असतो. सर्व फस्त झाले की द्रोणात, वाडग्यात जे पाणी उरते ते भुरकून प्यायचे की झाले.आता याला केली नाव का? - तर लोककथा अशी आहे की, केली नावाची  म्हातारी एका झाडाखाली बसून चणे विकायची. लोकांचा समज होता की म्हातारी चण्यात काहीतरी गुंगीचा पदार्थ मिसळून देते. खूप प्रसिद्ध झाली. लोकांनी अनेकदा विचारलं तरी तिने कृती सांगितली नाही आणि केली चना या भागातल्या चवीचा अविभाज्य भाग झाला. जशी दौलत की चाट, मामा काणेंचा बटाटावडा, टूडे के कबाब तसा हा केली चना.हा चना फस्त करून वरून कडक चहा मारायचा. तिखट पदार्थ खाल्ला आणि वरून गरम पेय घेतले की वेगळी अनुभूती येते... ती हीच!

- शुभा प्रभू साटम, खाद्यसंस्कृतीच्या अभ्यासक shubhaprabhusatam@gmail.com