शहरं
Join us  
Trending Stories
1
गोव्यावरून कोल्हापुरात आली आणि रंकाळा तलावात...; गर्भवती नेहा पवार यांच्यासोबत काय घडलं?
2
'मोदी तेरी कब्र...' काँग्रेसच्या रॅलीतून पीएम मोदींवर वादग्रस्त टीका; भाजपचा पलटवार...
3
IND vs SA Live Streaming 3rd T20I : सूर्या-गिलवर असतील नजरा! कुठं पाहता येईल तिसरा टी-२० सामना?
4
₹1000 कोटींच्या सायबर फ्रॉड रॅकेटचा भांडाफोड; 58 कंपन्यांविरुद्ध CBI ने दाखल केले आरोपपत्र
5
'ममता बॅनर्जींना अटक करा'; मेस्सी स्टेडिअम गोंधळावर आसामचे मुख्यमंत्री हिमंता सरमा यांची थेट मागणी
6
Palghar Crime: वसईत पाच वर्षाच्या मुलीवर बलात्कार करून हत्या; १८ वर्षांनंतर आरोपी सापडला उत्तर प्रदेशात
7
'मंत्री झाला म्हणजे जास्त कळते, असा गैरसमज करून घेऊ नये', जयंत पाटील मंत्री सावकारेंवर भडकले, 'हजामती' शब्दावरून चकमक
8
आता '४ दिवसीय आठवडा' शक्य! कर्मचाऱ्यांसाठी मोठा दिलासा; नवीन कामगार कायद्यात '३ दिवस सुट्टी'ची तरतूद
9
नाईट क्लबमध्ये आग, दिल्लीत मेसेज पोहोचला अन् लुथरा ब्रदर्स थांयलंडमध्ये; पडद्यामागे काय घडलं? Inside Story
10
'डिजिटल अरेस्ट' च्या जाळ्यात अडकली, ३३ लाखांची आरटीजीएसही करायला बँकेती गेली; मॅनेजरच्या लक्षात आले...
Daily Top 2Weekly Top 5

Upvas Recipes: झटपट तयार होणाऱ्या पौष्टिक उपवासाच्या रेसिपीज्....आजच करुन बघा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 28, 2019 15:33 IST

Fast Recipes: मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. अनेक स्त्रिया या ह्या काळात गुरुवारचे उपवास करत असतात.

(Image credit- justdial)

मार्गशीर्ष महिना सुरू झाला आहे. अनेक स्त्रिया या ह्या काळात गुरुवारचे उपवास करत असतात. अश्यावेळी काय खावे किंवा आहार कसा असावा हा सगळ्यात मोठा प्रश्न गृहीणीं समोर असतो. यासाठीच उपवासाला खाऊ शकाल अश्या रेसीपीज् जाणून घ्या. हे पदार्थ तुम्ही रोजच्या जेवणाचा कंटाळा आला असेल तर उपवास नसेल तरी, खाऊ शकता. 

१) उपवासाचे घावन

साहित्य: वाटी वरी तांदूळ, १वाटी साबुदाणे, २ हिरव्या मिरच्या, २ चमचे नारळाचा चव, २ चमचे दाण्याचे कूट, १ चमचा जिरे, चवीपुरते मिठ, साजूक तूप.

कृतीः साबुदाणा आणि वरीतांदूळ एकत्र भिजवावे. पाण्याची पातळी साबुदाणा व वरीतांदूळ बुडून वरती २ इंच एवढी असावी. अशाप्रकारे दोन्ही ४-५ तास भिजवावे .दोन्ही व्यवस्थित भिजल्यावर मिक्सरमध्ये वाटून घ्यावे. वाटतानाच त्यात मिरची, जिरे, खोबरे, दाण्याचा कूट, मीठ घालावे. आपण नेहमीच्या घावनाला जेवढे घट्ट भिजवतो तेवढेच घट्ट भिजवावे. म्हणजे त्या अंदाजाने मिक्सरमध्ये पाणी घालावे. नॉनस्टीक तव्याला तूप लावून घ्यावे. एक डाव मिश्रण पातळसर पसरवावे. कडेने एक चमचा तूप सोडावे. एक वाफ काढावी. एक बाजू शिजली कि दुसरी बाजू निट होवू द्यावी. गरम गरम घावन नारळाची चटणी सर्व्ह करावे.

२) उपवासाचे बटाटे वडे

साहित्य: तीन बटाटे, शेंगदाणे तेल किंवा साजूक तूप, एक टीस्पून जिरे, एक टेबलस्पून आलं-मिरची पेस्ट, मीठ चवीनुसार, कोथिंबीर, राजगिरा, शिंगाडा, साबुदाणा किंवा केळ्याचे पीठ अर्धा कप.

कृती: बटाटे उकडून कुस्करून घ्यावेत. कढईत तेल किंवा तूप घेऊन त्यात जिऱ्याची फोडणी करावी. त्यात आलं मिरची पेस्ट, मीठ आणि कोथिंबीर घालून स्मॅश केलेला बटाटा परतून घ्यावा. वर दिलेले कोणतेही पीठ घेऊन नेहमीसारखे बटाटेवडे तळावेत.

३) उपवासाचे गुलाबजाम

साहित्यः सव्वाशे ग्रॅम खवा, एक टेबलस्पून अरारूटचे पीठ, एक कप साखर, एक कप पाणी, चिमूटभर खायचा सोडा (उपवासाला चालत असेल तर), तळण्यासाठी शेंगदाण्याचे तेल घेतले तरीही चालेल.

कृतीः माव्यात अरारूटचे पीठ घालून चिमूटभर खायचा सोडा घाला. थोडे दूध घालून मळून घ्या. २०-३० मिनिटं गोळा तसाच ठेवा. नंतर पुन्हा मळून घ्या. छोटे गोळे करून तळून घ्या. साखरेच्या गरम एकतारी पाकात गार गुलाबजाम टाकावेत.

४) उपवासाचा वरीचा पुलाव

 

साहित्य: एक कप वरीचा तांदूळ, दोन टेबलस्पून तूप, दोन लवंगा, जिरे, दोन- तीन मिरच्यांचे तुकडे, अर्धा इंच आले, साखर व मीठ चवीनुसार, अर्धा कप दाण्याचा कूट, दहा-बारा बेदाणे, अर्धा कप रताळ्याच्या फोडी, कोथिंबीर, दहा-बारा काजूचे तुकडे.

कृती: वऱ्याचे तांदूळ धुवून ठेवावेत. एका मोठय़ा भांडय़ात तूप गरम करून त्यात जिरे, लवंग, मिरचीचे तुकडे घालावेत. वरी तांदूळ घालून अंदाजे पाणी घालावे. त्यात बटाट्याच्या फोडी आणि रताळ्याच्या फोडी घालाव्यात. दाण्याचा कूट, मीठ आणि साखर घालून शिजवून घ्यावे. दुसऱ्या पॅनमध्ये थोडे तूप घालून काजू आणि बेदाणे परतून घ्यावेत. हे त्या वरीवर घालून छान मिसळून घ्यावे. कोथिंबीर घालून छान वाफ द्यावी. टीप- सुरणाच्या फोडी, रताळ्याच्या फोडी वेगळ्या शिजवून तुपात थोडय़ा परतून शेवटी वऱ्याच्या तांदळात मिसळल्या तरी चालतात.

५) उपवासाची थालीपीठ

(Image credit- Youtube)

साहित्य: २ वाट्या साबुदाणा, २ मध्यम बटाटे (शिजवलेले), १/२ वाटी शेंगदाण्यांचा कूट, ५-६ हिरव्या मिरच्या, अर्धी वाटी चिरलेली कोथिंबीर, १ चमचा लिंबाचा रस, १ चमचा जीरे, १/२ चमचा जीरेपूड, चवीपुरते मिठ, तेल/ तूप, थालिपीठ थापण्यासाठी प्लास्टीकची शिट.

कृती: साबुदाणे पाण्यात भिजवावे. उरलेले पाणी काढून टाकावे. ३-४ तास भिजत ठेवावेत.शिजलेले बटाटे नीट कुस्करून घ्यावे.मिरच्या बारीक वाटून घ्याव्यात. भिजवलेला साबुदाणा, शिजवलेले बटाटे, मिरच्यांचे वाटण, जीरे, जीरेपूड, शेंगदाण्याचा कूट, कोथिंबीर, लिंबाचा रस आणि चवीपुरते मीठ घालून नीट मिक्स करावे. मिश्रणाचे मध्यम आकाराचे गोळे करावे. प्लास्टीक शिटला तूपाचा हात लावून गोळे थापावे. थालिपीठाच्या मध्यभागी तूप सोडण्यासाठी एक छिद्र करावे. नॉनस्टीक तव्यावर थोडे तूप सोडावे. मिडीयम हाय हिटवर थालिपीठाला झाकण ठेवून वाफ काढावी. दोन्ही बाजूने खरपूस करून घ्यावे. दही, मिरचीचा ठेचा, किंवा लिंबाचे गोड लोणचे यांबरोबर हे थालिपीठ छान लागते. 

टॅग्स :foodअन्नReceipeपाककृती