शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुझ खुली करण्याची शेवटची आशा संपली! UNSC मध्ये झाले मतदान, पण चीन-रशियाचे 'व्हिटो'अस्त्र
2
राजस्थानचा 'रॉयल' विजय! यशस्वी, वैभवने गोलंदाजांना धुतले, मुंबई इंडियन्सचा २७ धावांनी पराभव
3
नीलम शिंदेची झुंज संपली, तो कॉल ठरला काळीज चिरून टाकणारा; वडिलांना व्हिडीओ कॉलद्वारे घ्यावे लागणार अंतिम दर्शन
4
कडक! बुमराहचं वैभव सूर्यवंशीने असं केलं स्वागत! पहिल्याच ओव्हरमध्ये ठोकले दोन गगनचुंबी षटकार; पहा व्हिडिओ
5
"पुढील ४८ तास जिथे आहात, तिथेच रहा", ट्रम्प यांच्या धमकीनंतर इराणमधील भारतीयांना केंद्राकडून अलर्ट
6
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
7
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
8
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
9
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
10
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
11
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
12
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
13
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
14
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
15
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
16
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
17
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
18
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
19
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
20
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
Daily Top 2Weekly Top 5

रगडा पॅटीसवर सॉस घ्याल, तर नरकात जाल!

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 11, 2023 13:24 IST

व्युत्पत्ती कुठली हे नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधण्यासारखे. पण कोणत्याही खवैया भारतीय माणसाला या जोडीची ओळख करून द्यायला नको.

खाण्यात अनेक जोडगोळ्या असतात... वडा/समोसा-पाव, फाफडा-जिलेबी, मेदुवडा- सांबार, इडली-चटणी... आणि ही सर्व मुख्यत्वे रस्त्यावरील पदार्थांची नावे, त्यातलाच एक रगडा पॅटीस.

याची व्युत्पत्ती कुठली हे नदीचे मूळ आणि ऋषीचे कूळ शोधण्यासारखे. पण कोणत्याही खवैया भारतीय माणसाला या जोडीची ओळख करून द्यायला नको. रस्त्यावरील भेळ/चाट वर्गात जे पदार्थ मिळतात त्यातील रगडा पॅटीस एक. 

सफेद वाटाण्याचा रगडा/साधारण घट्ट उसळ आणि त्यात पहुडलेले पॅटीस, वरून हिरवी लाल चटणी, कांदा,  कोथिंबीर, शेव आणि मसाला. वाफाळत्या रगड्याची प्लेट समोर आली की बाकी सर्व विसरले जाते. बटाटा पॅटीस आणि रगडा हे मिश्रण मुळात अफलातून. हा रगडा म्हणजे नुसते हळद, मीठ घालून वाटाणे शिजवले जातात. भेळ मिळणाऱ्या ठिकाणी रगडा बहुउपयोगी. पाणी/शेव/सुक्या पुरीमधे सारण म्हणून, नुसती रगडा चाट खायची असेल तर त्यासाठी. स्टो/शेगडीवर उथळ भांड्यात रगडा रटाटत असतो आणि मागणीप्रमाणे दिला जातो. वरून हिरवी आणि लाल चिंच. चटणी मात्र हवीच. बनारस, लखनौ इथे चाट मसाल्याऐवजी बुकनी म्हणून मसाला मिळतो, चाट मसाल्याचा मूळ पूर्वज तो वरून घालतात. मग बारीक शेव आणि कांदा, लिंबू, कोथिंबीर.. पाणी पुरीनंतर जशी सुकी पुरी घेतात तसे दर्दी खवैये नुसत्या रगड्यावर चटण्या घेऊन तो फस्त करतात.

हा पदार्थ मुंबईतील नाही हे मात्र नक्की. पण पाणीपुरी, भेळपुरी आणि रगडा पॅटीस ही त्रिसूत्री  निष्ठेने पाळणारे अनेक आहेत. ही डिश खायची कशी याचे पण काही संकेत आहेत! भसकन पॅटीस तोडून खायचे नसते तर अलगद सर्व मसाले चटण्या एकत्र करायच्या, मग कडेच्या रगड्याची चव घायची. इथे चटणी, कांदा यांचा फुकट रिचार्ज असतो, नंतर अंदाज घेऊन एक घास पॅटीस, एक चमचा रगडा असे करत निवांत संपवायचे. तुमचा रगडा आणि पॅटीस एकदम संपले तर तुम्ही  रस्ता खाण्यामधील महानुभाव आहात. आणि हो.. अस्सल रगड्यात किंवा रगड्यावर निव्वळ बारीक पिवळी शेव असते, जाडी लाल शेव नाही आणि चुकूनही यावर सॉस घ्यायचा नाही... नरकात जाण्याची शिक्षा मिळते!