शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानी लष्करानेच केली होती शस्त्रसंधीसाठी विनंती; भारताने सुनावले खडेबोल!
2
तामिळनाडूत अभिनेता विजय यांच्या सभेत चेंगराचेंगरी; ३६ जणांचा मृत्यू!
3
आज पुन्हा युद्ध; आशिया चषक फायनलमध्ये भारत-पाक भिडणार!
4
टिकटॉक अमेरिकेत सुरूच राहणार, काय झाली डील?
5
आधीच पुराने बेजार, त्यात आज पुन्हा 'मुसळधार'; मुंबई, ठाण्यात रेड अलर्ट
6
शेतकऱ्यांना मदत कधीपर्यंत मिळणार? DCM एकनाथ शिंदेंनी दिली आनंदाची बातमी; बळीराजाची दिवाळी गोड होणार!
7
‘फुलराणी’ म्हणते, सध्या मी खेळणंच सोडून दिलंय..! सायना नेहवाल नेमकं काय म्हणाली?
8
‘बीएसएनएल’ची स्वदेशी ४जी सेवा कार्यान्वित, पंतप्रधान मोदी यांच्या हस्ते उद्घाटन; स्वयंपूर्णतेकडे वाटचाल
9
अमेरिकेत १६ राज्यांचे ट्रम्प प्रशासनाविरुद्ध खटले;  लिंगाधारित अभ्यासक्र, निधी रोखण्याचा सरकारचा इशारा
10
'मी थरथर कापतोय कारण...'; चेंगराचेंगरीत ३६ जणांच्या मृत्यूनंतर अभिनेता विजयने सोडलं शहर
11
९ वर्षांच्या बेपत्ता मुलीला शोधायला लागले अन्... चेंगराचेंगरीचे कारण समोर, पाण्याच्या बाटल्या फेकत होता विजय
12
तामिळनाडूत सुपरस्टार विजयच्या रॅलीत चेंगराचेंगरी, महिला आणि मुलांसह 31 जणांचा मृत्यू, अनेक जखमी 
13
'दारुल इस्लाम'वर विश्वास ठेवणाऱ्यांना आधी 'जहन्नुम'मध्ये जावे लागेल, मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा इशारा
14
"ठाकरेंना हात जोडून विनंती की...!" उद्धव ठाकरे यांच्या शेतकऱ्यांसंदर्भातील 'त्या' विधानावर गुलाबराव पाटलांची एका वाक्यात प्रतिक्रिया
15
ओल्या संकटावर पुन्हा धो-धो प्रहार; मराठवाड्यात २,८८० गावांना तडाखा, विदर्भ, पश्चिम महाराष्ट्रालाही झोडपले
16
पनवेलकडे जात असताना बाईक बेलापूर खाडीत कोसळली; एकाचा शोध लागला, दुसरा तरुण बेपत्ता
17
Asia Cup Final 2025: भारत की पाकिस्तान, कोण जिंकणार? ग्रहांची साथ कुणाला? मोठी भविष्यवाणी...
18
प्रेरणादायी! सामान्य भाजी विक्रेत्याचे असामान्य दान; पूरग्रस्तांसाठी दिले १ लाख, माणुसकी जपली
19
विदर्भात 'या' जिल्ह्यांना मुसळधार पावसाचा फटका, पिकांचे अतोनात नुकसान ! अजून किती दिवस जोर राहणार कायम?
20
यावेळी बिहारमध्ये चार-चार दिवाळी उत्सव, किती जागा जिंकणार NDA? अमित शाह यांनी सेट केलं टार्गेट; राहुल-तेजस्वी यांच्यावरही बरसले

भूक लागली? - खा, ताफ्तून आणि लवाश

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 24, 2025 09:40 IST

Food: बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका काॅलनीतल्या एकमेव किराणा मालाच्या दुकानात दोन इराणी मुली एका पाकिटात असलेल्या कापडासारख्या दिसणाऱ्या कुठल्यातरी वस्तू घेऊन जाताना दिसल्या.

बऱ्याच वर्षांपूर्वी पुण्यातल्या एका काॅलनीतल्या एकमेव किराणा मालाच्या दुकानात दोन इराणी मुली एका पाकिटात असलेल्या कापडासारख्या दिसणाऱ्या कुठल्यातरी वस्तू घेऊन जाताना दिसल्या. त्यांच्याकडून समजलं की तो इराणी ब्रेड ‘ताफ्तून’ आहे. पुढे याविषयी वाचताना असं समजलं की ताफ्तून हा फारसी शब्द ताफन म्हणजेच भाजणे. शहानाम्यातही याविषयी उल्लेख आढळतो. 

ताफतान नावाचं बलूचिस्तानमध्ये एक लहानसं गावही आहे. जे इराणला लागूनच आहे. त्यामुळे असाही प्रवाद आहे की या ब्रेडचा शोध बलूचमध्ये लागला असेल. तिथून व्यापाऱ्यांबरोबर प्रवास करत हा नान भारतात पोहोचला. मैदा, दूध, अंडी किंवा तेल, बटर वापरून हा नान तयार केला जातो. प्रवासातही चार-आठ दिवस टिकतो म्हणूनच व्यापाऱ्यांची या नानला पसंती असावी. हा नान गरम हवेतही जास्त काळ टिकतो. 

इराणमधलाच दुसरा आणखी एक महत्त्वाचा नान म्हणजे लवाश. मल्टीकुझिन हाॅटेलात गेल्यावर तिथल्या मेनूमध्ये लवाशचं नाव दिसतं. पण, इथं मिळणारा लवाश हा खाकऱ्याप्रमाणे कडक असतो. तो मूळ लवाशचे हव्या त्या आकारात तुकडे करून ते तळून किंवा भट्टीत पुन्हा एकदा भाजून कुरकुरीत करून घेतात. याचं मूळ तुर्कस्तान आणि अर्मेनियात आहे, असं म्हणतात. हा नान यीस्ट वापरून मैद्याचं पीठ फर्मेंट करून केला जातो. आपल्याकडे उन्हाळी वाळवणाला गल्लीतील बायका एकत्र जमून पापड करतात तसंच इराण, तुर्कस्तान, अर्मेनियात बायका कुणा एकीकडे जमतात आणि गप्पागोष्टी करीत भरपूर नान लाटून भट्टीत भाजून ठेवतात. हे नान सहा महिने टिकतात. लंबगोल, पूर्णगोल, चौकोनी असा हा नान लाटला जातो. नान फुगू नये म्हणून यालाही टोचे मारले जातात. हा नान तिथल्या संस्कृतीचं प्रतीक मानला जातो. म्हणूनच २०१४मध्ये लवाश नानला युनेस्कोने त्यांच्या ‘अमूर्त सांस्कृतिक वारसा’ यादीत अव्वल स्थान दिलं आहे. - अवंती कुलकर्णी ( खाद्यसंस्कृती अभ्यासक)avanti.3110@gmail.

टॅग्स :foodअन्न