शहरं
Join us  
Trending Stories
1
मराठी मुलीच्या वडिलांना, काकांना दहशतवाद्यांनी नाव विचारून डोळ्यांदेखत गोळ्या घातल्या- एकनाथ शिंदे
2
"तुला मारणार नाही, जा आणि मोदींना सांग"; पतीची डोळ्यांसमोर हत्या केल्यानंतर दहशतवाद्यांनी पत्नीला धमकावलं
3
महाराष्ट्रातल्या दोन पर्यटकांचा पहलगाम हल्ल्यात मृत्यू; पर्यटक जखमी असल्याची CM फडणवीसांची माहिती
4
जम्मू-काश्मीरमध्ये मोठा दहशतवादी हल्ला; नाव विचारुन झाडल्या गोळ्या, 27 जणांच्या मृत्यूची भीती
5
"सरकारला धन्यवाद, पण पुन्हा एकदा सांगतो..."; हिंदी सक्तीच्या माघारीनंतर राज ठाकरेंचे ट्विट
6
दररोज फक्त ₹7 ची बचत करा अन् दरमहा ₹5000 मिळवा; जाणून घ्या सरकारी योजनेचे फायदे...
7
पहलगाममध्ये टीआरएफने घडवला नरसंहार; दहशतवादी संघटनेने पत्र जारी करुन सांगितले कारण
8
'दोषींना सोडणार नाही, कठोर शिक्षा...', पहलगाम दहशतवादी हल्ल्यावर PM मोदींची तीव्र प्रतिक्रिया
9
‘यूपीएससी’त प्रज्ञाचक्षू विद्यार्थ्यांमध्ये मनू गर्ग देशात अव्वल
10
बजाजच्या या शेअरनं दिला 22000% हून अधिकचा परतावा, गुंतवणूकदारांना केलं मालामाल; आता...!
11
पहलगाम हल्ल्यानंतर पंतप्रधान मोदींचा गृहमंत्र्यांना फोन; अमित शाहांना जम्मू-काश्मीरला जाण्याची सूचना
12
'हा' अमित मिश्रा वेगळा... कौटुंबिक हिंसाचाराचे आरोप झालेला क्रिकेटर नेमका कोण? जाणून घ्या...
13
"...तर भविष्यात भयानक परिस्थिती निर्माण होण्याची शक्यता होती"; 'वक्फ'बाबत किरण रिजिजूंचे वक्तव्य
14
फक्त मराठीच अनिवार्य, हिंदी सक्तीवर सरकारचे एक पाऊल मागे; नवीन आदेश काढणार
15
तुम्हाला वारंवार तहान लागते, पाणी प्यायल्यावरही घसा कोरडा होतो? 'या' गंभीर आजारांचे संकेत
16
मत्स्य व्यवसायाला कृषी क्षेत्रासारखाच दर्जा; मंत्रिमंडळ बैठकीत अनेक महत्त्वपूर्ण निर्णय
17
बँकेने गुन्हा दाखल केल्याने त्याची सटकली, साथीदारांना सोबत घेत अख्खी बँकच पेटवली
18
UPSC पास झाल्यानंतर उमेदवारांना पहिला पगार कधी आणि किती मिळतो? पाहा...
19
"मुस्लीम राजेशाही असो अथवा लोकशाही, वक्फ सर्वत्र...;" सौदीत पोहोचलेल्या PM मोदींवर ओवेसींचा निशाणा
20
Jammu and Kashmir : दहशतवाद्यांनी पर्यटकांना आधी विचारला 'हा' प्रश्न अन् सुरू केला गोळीबार, नेमकं काय घडलं?

घरच्याघरी 'असे' कुरकुरीत कटलेट खाल, तर हॉटेलची चव विसरून जाल....

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2020 11:01 IST

आज रविवार! आठवडाभर कामासाठी  बाहेर असलेल्या महिला आज घरी असणार.

आज रविवार! आठवडाभर कामासाठी  बाहेर असलेल्या महिला आज घरी असणार. जर तुम्हाला आज  आपल्या कुंटूंबासाठी  काही स्पेशल पण पटकन होणारी डीश तयार करावीशी वाटत असेल तर आम्ही तुम्हाला एक स्पेशल कटलेटची रेसिपी सांगणार आहोत. नेहमी मुलं बाहेरचं खातात अशी जर तुमची तक्रार असेल तर हे कटलेट्स जर तुम्ही बनवाल तर घरातली लहानांपासून मोठी मंडळी तुमच्यावर खूश झाल्याशिवाय राहणार नाही. हे कटलेट तुम्ही घरात उपलब्ध असलेल्या सामग्रीचा वापर करून तयार करू शकता. फक्त काही फ्रेश भाज्यांची आवश्यकता असणार आहे. ज्या आपण रोजच बाजारातून आणत असतो. चला तर मग जाणून घेऊया कसे तयार करायचे पौष्टिक व्हेजिटेबल कटलेट.

साहित्य:

१ शिजलेला बटाटा१/२ कप मटार१/४ कप गाजराचे तुकडे१/४ कप फरसबीचे तुकडे१ छोटा कांदा१ टेस्पून लसूण पेस्ट५ टेस्पून चणा पिठ६-७ हिरव्या मिरच्या किंवा चवीनुसार लाल तिखट१ टिस्पून गरम मसाला१ टिस्पून चाट मसाला१ टिस्पून आमचूर पावडर१/२ कप बारीक चिरलेली कोथिंबीर१/४ कप भाजलेला रवातेल, मीठ

कृतीकृती: मटार, गाजर, फरसबीचे तुकडे थोडे मीठ घालून वाफवून घ्यावेत. सर्व भाज्या चाळणीत काढून ठेवाव्यात जेणेकरून त्यातील अधिकचे पाणी निघून जाईल.नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १ चमचा तेल गरम करून त्यात आले-लसूण पेस्ट व मिरच्या बारीक करून फोडणी करावी. त्यात बारीक चिरलेला कांदा परतून घ्यावा. कांदा परतला कि त्यात चण्याचे पिठ घालावे, पिठ खमंग भाजून घ्यावे.

एका भांड्यात शिजलेला बटाटा किसून घ्यावा. त्यात सर्व वाफवलेल्या भाज्या, गरम मसाला, आमचूर पावडर, चाट मसाला, कोथिंबीर, मीठ आणि भाजलेले चणा पिठ घालून एकत्र करावे. चणा पिठामुळे घट्टपणा येतो. पण कधी कधी बटाटा व इतर भाज्यांतील पाण्यामुळे जरा ओलसरपणा येण्याची शक्यता असते तेव्हा गरज वाटल्यास ब्रेड घालावा.मिश्रणाचे समान भाग करून त्याला हाताने किंवा साच्याने आकार द्यावे. नॉनस्टीक फ्राईंग पॅनमध्ये १-२ तेल गरम करत ठेवावे. कटलेटला भाजलेला रवा दोन्ही बाजूने लावून घ्यावा. मध्यम आचेवर दोन्ही बाजूने गोल्डन ब्राऊन करून घ्यावे. तयार आहेत व्हेजीटेबल कटलेट.

(सौजन्य- http://chakali.blogspot.com/)

टॅग्स :foodअन्न