शहरं
Join us  
Trending Stories
1
भारतात श्रीमंतांच्या संपत्तीत ६२% वाढ, इतर ९९% लोकांची संपत्ती वाढली १%, पण प्रगतीला धोका
2
आजचे राशीभविष्य,०५ नोव्हेंबर २०२५: बोलण्यावर संयम ठेवा; रागावर व वाणीवर संयम ठेवावा लागेल
3
रेल्वे अपघातानंतर नातेवाइकांचा आक्रोश; हेल्पलाइन नंबरवर टीबीमुक्त अभियानाचा जागर
4
आशिया चषकाचा वाद: जय शाह यांच्या उपस्थितीमुळे मोहसिन नकवींची बैठकीला दांडी
5
अखेर बिगुल वाजला ! राज्यातील २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींच्या निवडणुकांची घोषणा
6
चीनची कार थेट आकाशातून जाणार, ‘उडणाऱ्या कार’चे उत्पादन झाले सुरू
7
हिंदुजा समूहाला जागतिक पातळीवर पोहोचवणारे चेअरमन गोपीचंद हिंदुजा यांचे निधन
8
मंत्री गुलाबराव पाटील कॅबिनेटमध्ये संतापले; पूरग्रस्त शेतकरी आणि नागरिकांबाबतचा होता विषय
9
लवकरच ‘बीएसएनएल’ नेटवर्क; मुंबईत २ हजार टॉवर उभारणी करणार ; इंट्रा सर्कल रोमिंगचा करार
10
तारापूर अणुऊर्जा प्रकल्पातील एक प्लांट बंद; २७० मेगावॉट विजेचा तुटवडा भासण्याची शक्यता
11
लोको पायलटने रेड सिग्नल दुर्लक्ष केला, छत्तीसगडमध्ये झालेल्या प्रवासी ट्रेन आणि मालगाडी अपघातामागील कारण काय?
12
आठवीत शाळा सोडली; मुलांसोबत टेनिस बॉलवर खेळत ‘क्रांती’ घडवली, आणि आज ती वर्ल्ड चॅम्पियन!
13
"मुख्यमंत्री होताच...!"; योगी आदित्यनाथ यांच्या 'टप्पू-पप्पू-अप्पू' विधानावरून तेजस्वी यादव यांचा मोठा पलटवार
14
बिहार विधानसभा निवडणुकीत PK यांच्या जनसुराजला किती जागा मिळणार? ओवेसींच्या पक्षाचं काय होणार? असा आहे सर्व्हेचा अंदाज
15
'...हे निवडणूक आयोगाने लक्षात ठेवावं'; मनसे नेते संदीप देशपांडेंचा थेट इशारा, कोणते प्रश्न विचारले?
16
अजित पवारांची बिहार विधानसभा निवडणुकीत वेगळी चूल; तेजस्वी यादवांविरोधात उतरवला उमेदवार, १५ उमेदवार कोण?
17
बिलासपूरजवळ भीषण रेल्वे अपघातात १० जणांचा मृत्यू ! जखमींच्या किंकाळ्यांनी परिसर थरारला; महाराष्ट्रातील प्रवासी किती?
18
जगाचे लक्ष अमेरिकेकडे! अणु क्षेपणास्त्र चाचणीसाठी हालचाली सुरू, ट्रम्प यांच्या विधानानंतर सैन्याने दिली मोठी अपडेट
19
बिहारमध्ये पुन्हा 'NDA राज', सर्व्हेत छप्परफाड जागा मिळण्याचा अंदाज; भाजप 'टॉप', कोण-कोण ठरणार 'फ्लॉप'?
20
महाराष्ट्रात निवडणुकीचा शंखनाद! २४६ नगरपरिषदा, ४२ नगरपंचायतींसाठी मतदान; वाचा जिल्हानिहाय यादी...

Food: सूप, स्टर फ्राय व्हेजी, पास्ता, थाय करी..., बदलतोय भारतीय जेवणाचा बाज

By मनोज गडनीस | Updated: August 29, 2022 09:45 IST

Food: लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर परदेशी मालिका फक्त पाहिल्याच नाहीत तर तिथली जीवनशैली देखील जमेल तितकी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक प्रत्यय हा गेल्या काही दिवसांत भारतीयांच्या जेवणात झालेल्या बदलांद्वारे दिसून येत आहे.

- मनोज गडनीस(विशेष प्रतिनिधी)

लॉकडाऊनच्या काळात अनेकांनी ओटीटी प्लॅटफॉर्मवर परदेशी मालिका फक्त पाहिल्याच नाहीत तर तिथली जीवनशैली देखील जमेल तितकी आत्मसात करायला सुरुवात केली आहे. याचा सर्वाधिक प्रत्यय हा गेल्या काही दिवसांत भारतीयांच्या जेवणात झालेल्या बदलांद्वारे दिसून येत आहे. पारंपरिक भारतीय जेवणाच्या तुलनेत कॉन्टिनेन्टल, इटालियन, कोरियन पदार्थांचे प्रमाण वाढत असून विशेष म्हणजे हे पदार्थ घरीच बनविण्याचाही कल वाढताना दिसत आहे आणि ग्राहकांचा हा वाढता कल बघून व्यापाऱ्यांनीही आता त्या पदार्थांचे सामान उपलब्ध करून देण्यावर भर दिला आहे. पाश्चात्यांचे जेवण म्हणजे मांसाहार ही संकल्पना आता मागे पडली असून तेथे शाकाहाराचा अवलंब मोठ्या प्रमाणावर होताना दिसत आहे. मात्र, उत्तम दर्जाच्या तेलात परतलेल्या भाज्या, वेगवेगळ्या सॉसने त्यात केलेले रुचीरंचन, वेगवेगळी सूप्स, थाय करी, पास्ता, होम-मेड पिझ्जा आदी पदार्थ अधिकाधिक आरोग्यदायी बनविण्याचा प्रयत्न होताना दिसत असून त्याचेच प्रतिबिंब भारतीय किचन्समधून उमटताना दिसत आहे. 

कोल्ड प्रेस, ऑलिव्ह ऑईल घेता का? भारतीय जेवणामध्ये प्रत्येक ऋतुनिहाय वेगवेगळ्या तेलांचा वापर होतो. पण कमी उष्मांक असलेल्या तेलांचा प्रसार सध्या बाजारात जोरात असून कोल्ड प्रेस ऑईल तसेच ऑलिव्ह ऑईलला विशेष मागणी आहे. या दोन्ही तेलाच्या किमती या तुलनेने महाग आहेत. मात्र, तेलाची स्वतःची चव आणि पदार्थात त्यांचा वापर केल्यानंतर पदार्थाची वाढणारी चव यामुळे या तेलाच्या मागणीत देखील वाढ होताना दिसत आहे. 

एक्झॉटिक भाज्यांना वाढती मागणी लाल-पिवळी सिमला मिर्ची, ब्रोकोली, चेरी टोमॅटो, सेलेरी, मशरूम्स, लाल कोबी, झ्युकिनी अशा भाज्यांची मागणी प्रचंड वाढली आहे. काही दुकानदारांनी तर या सर्व भाज्यांचा पॅक करूनच विकायला सुरुवात केली आहे. या सर्व भाज्यांचे एक किंवा दोन नग घेत सर्व भाज्या खरेदी केल्या तर याची अंदाजे किंमत ही २२० रुपये ३०० रुपयांच्या दरम्यान होते. थाय करी करण्याचेही प्रमाण वाढले आहे. त्यामुळे थाय बेझिल किंवा थाय करीच्या घटकांचा बॉक्स देखील १०० रुपयांत अनेक बाजारात उपलब्ध आहे. 

नूडल्स, पास्ताही, पिझ्झाही घरीच...पूर्वी लोकांना फक्त विशिष्ट ब्रँडची मसालेदार नूडल्स ठाऊक होती. आता मात्र, वेगवेगळ्या कंपन्यांची नूडल्स बाजारात आली आहेत. यामध्ये राईस नूडल्स, व्हीट अर्थात गव्हापासून बनविलेली नूडल्स, फ्लॅट नूडल्स असे वैविध्यपूर्ण प्रकार बाजारात उपलब्ध आहेत. यातही लो-कॅलरी, ग्लूटेन फ्री वगैरे असे कार्बोहायड्रेटचे प्रमाण कमी असलेले नूडल्सही बाजारात आहेत. या नूडल्सच्या प्रकाराप्रमाणेच पास्ताचे प्रकारही उपलब्ध आहेत.पास्ता किंवा नूडल्सला हॉटेलसारखी चव यावी, याकरिता व्हाईट किंवा रेड सॉस रेडिमेडही बाजारात उपलब्ध आहेत. तर काही लोक हे सॉसही घरीच बनवत आहेत. त्या करिता लागणारा कच्चा माल देखील बाजारात आता सर्रास उपलब्ध आहे. पिझ्झासाठी लागणाऱ्या ब्रेडचेही अनेक प्रकार बाजारात उपलब्ध असून ग्लूटेन फ्री किंवा गव्हाचा किंवा अनेक धान्यांपासून बनविलेला मल्टीग्रेन ब्रेड यालाही मोठी मागणी आहे. 

टॅग्स :foodअन्न