शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
2
"मीरा भाईंदरला ३० टक्के जागा मेहतांच्या मालकीची, १० टक्के..."; मेट्रो उद्घाटनात रंगला संवाद
3
स्वतंत्र AI विभागाला मंजुरी, महावितरणाचा IPO येणार; महाराष्ट्र मंत्रिमंडळाचे ५ मोठे निर्णय
4
फी भरण्यासाठी नाही, तर एअर होस्टेस गर्लफ्रेंडसाठी आयुषने विकली १० एकर जमीन; 'किडनी' कथेमागचे वास्तव ऐकून हादराल...
5
घात लावून बसल्यात घादिर...! आता समजले अमेरिकन युद्धनौका होर्मुझमध्ये घुसण्याचे का धाडस करत नाहीएत...
6
टाटापासून मारुतीपर्यंत 'या' आहेत देशातील टॉप ५ स्वस्तात मस्त कार! ५ लाखांच्या आत घरी आणा; मायलेजही खास
7
भारताची शान, ब्रह्मोस क्षेपणास्त्राचा जन्मदाता हरपला; ज्येष्ठ शास्त्रज्ञ अलेक्झांडर लिओनोव्ह यांचे निधन
8
Manipur Violence : रॉकेट हल्ल्यात २ मुलांचा मृत्यू, मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार; बिष्णुपूरमध्ये कर्फ्यू, ५ जिल्ह्यांत इंटरनेट बंद
9
"डॉलर वर असो किंवा खाली..." राजपाल यादवला पैशांवरुन टोमणा मारणाऱ्यांना सलमानने सुनावलं
10
Feng shui: समृद्धीचं प्रतीक की पर्यावरणाचा रक्षक? बेडूक घराजवळ दिसणं तुमच्यासाठी किती शुभ आहे?
11
"एका मिनिटात १०० स्फोट" होर्मुझच्या सामुद्रधुनीतून परतलेल्या भारतीय अधिकाऱ्यानं सांगितला थरारक अनुभव
12
प्रवाशांच्या जीवाशी खेळ! वंदे भारतचं जेवण घेताय? अहमदाबाद-मुंबई प्रवासात प्रवाशाच्या ताटात काय आढळलं पाहा
13
"आम्ही देशाला ६ सनातनी मुलं दिली, प्रत्येक हिंदूला ३ मुलं तर असायलाच हवीत", पाकिस्तानातून आलेल्या सीमा हैदरचा सल्ला
14
SIR नंतर पश्चिम बंगालमध्ये मतदार यादीतून हटवली ९० लाख मतदारांची नावं
15
होर्मुझचा इतिहास: ज्या जागेसाठी अमेरिका-इराण भिडलेत, तिथले मूळ रहिवासी कोण होते? टोलही होता...
16
अनंत अंबानींची मोठी घोषणा; केरळमधील मंदिरांना ₹१८ कोटींची देणगी, हत्तींच्या देखभालीसाठी करणार मदत
17
Leopard In Dindoshi : दिंडोशीत बिबट्याची दहशत! रहिवाशांमध्ये पसरले भीतीचे वातावरण
18
Vastu Shastra: साध्या वाटणाऱ्या 'या' ७ गोष्टी तुमच्या देवघरातील सकारात्मक ऊर्जा नष्ट करत आहेत का?
19
सोन्याची किंमत ३३६४ रुपयांनी, तर चांदी ८४०१ रुपयांनी झाली स्वस्त; पटापट चेक करा आजचे लेटेस्ट दर
20
Ram Bhajan Kumar : संघर्षगाथा! दगड फोडणारा झाला मोठा अधिकारी; ७ वेळा अपयश, आता नेत्रदीपक भरारी
Daily Top 2Weekly Top 5

Food recipe: शिळी पोळी आणि शिळा भात उरलाय का? झटपट करा 'माणिकमोती'; वाचा रेसेपी!

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 1, 2023 12:10 IST

Food recipe: एक अशी रेसेपी, ज्यामुळे शिळे पदार्थ संपतीलही आणि सगळ्यांच्या पसंतीस पडतीलही!

शिळे पदार्थ उरले की ते संपवायचे कसे हा गृहिणींना मोठा प्रश्न पडतो. घरचे कोणीच शीळवण खात नाहीत. सगळ्यांना ताजा स्वयंपाक लागतो. त्यामुळे बिचाऱ्या गृहिणी शिळे पदार्थ संपवायची जबाबदारी स्वतःकडे घेतात. त्यावर पर्याय म्हणून ही रेसेपी वाचा आणि जरूर ट्राय करा. जेणेकरून शिळ्या पोळ्या आणि शिळा भात संपेलही आणि घरातल्या मंडळींच्या पसंतीस पडेलही! फूड ब्लॉगर वैदेही भावे यांच्या चकली.कॉम या संकेत स्थळावरून साभार. 

साहित्य:

४ आदल्या दिवशीच्या पोळ्या (चपात्या)१ कप शिजलेला भात (आदल्या दिवशीचा)

फोडणीसाठी:

२ टेस्पून तेल, १/८ टिस्पून मोहोरी, १/४ टिस्पून जिरे, चिमूटभर हिंग, १/८ टिस्पून हळद, १/४ टिस्पून लाल तिखट, ३-४ कढीपत्ता पाने२ टेस्पून शेंगदाणे२ ते ३ टेस्पून मटार१/४ कप बारीक चिरलेला कांदा१ टिस्पून लिंबाचा रसचवीपुरते मिठ१/२ टिस्पून साखरसजावटीसाठी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि खोवलेला नारळ

कृती:

१) पोळ्यांचा हाताने कुस्कारा करून घ्यावा किंवा मिक्सरमध्ये भरडसर बारीक करावे. भात हाताने मोकळा करून घ्यावा.२) कढईत तेल गरम करून आधी त्यात शेंगदाणे परतून घ्यावे. नंतर त्यातच मोहोरी, जिरे, हिंग, हळद, लाल तिखट आणि कढीपत्ता पाने घालून फोडणी करावी. त्यात कांदा आणि मटार घालून परतावे. अंदाजे मिठ घालावे.३) कांदा निट परतला गेला गॅस मध्यम करून त्यात भात घालावा. निट मिक्स करून बारीक केलेल्या पोळ्या घालून निट परतावे. साखर घालून १ वाफ काढावी. लिंबाचा रस चवीनुसर घालावा.कोथिंबीर आणि ओल्या खोबर्‍याने सजवावे. गरमागरम सर्व्ह करावे.

टॅग्स :foodअन्न