शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानच्या नकवींचा कांगावा! म्हणे, इस्त्रायलने आमच्या ऑईल टँकरवर हल्ला केला, नंतर हुतींनी कब्जा केला
2
एक खेळाडू सामन्याचा निकाल फिरवू...; आशिया कप फायनलपूर्वी वसीम अक्रमची मोठी भविष्यवाणी
3
Tamilnadu Stampede : अभिनेता थलपती विजयची मोठी घोषणा; चेंगराचेंगरीतील मृतांच्या कुटुंबियांना देणार प्रत्येकी २० लाख
4
महेश मांजरेकरांची पहिली पत्नी दीपा मेहता यांचं निधन, आईच्या आठवणीत मुलाची पोस्ट
5
दिवाळीपूर्वी मोठी बातमी! फक्त १,२०० रुपयांमध्ये देशात कुठेही विमान प्रवासाची संधी; 'या' कंपनीने आणली ऑफर्स
6
स्वामी चैतन्यानंद फसवणुकीतही माहिर! लोकांवर प्रभाव पाडण्यासाठी बनावट UN-BRICS कार्ड; धक्कादायक माहिती उघड
7
Tamilnadu Stampede : "अभिनेत्याला यायला उशीर, पाण्याची कमतरता आणि..."; चेंगराचेंगरीबद्दल काय म्हणाले पोलीस?
8
IND vs PAK Final, Asia Cup 2025: फायनलमध्ये पाकिस्तानविरोधात भारताचा रेकॉर्ड फारसा चांगला नाही; आजपर्यंत १० वेळा भिडला, पण...
9
Rain Update : काळजी घ्या! बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा, आज मुसळधार; विदर्भ, मराठवाड्यासह या भागात बरसणार
10
'पीएम किसान'चा २१ वा हप्ता जाहीर! ३ राज्यांतील शेतकऱ्यांच्या खात्यात जमा, महाराष्ट्रातील शेतकऱ्यांना कधी?
11
IND vs PAK Final, Asia Cup 2025: भारत-पाक अंतिम सामना: सूर्यकुमार पाकिस्तानी मंत्री मोहसिन नकवी यांच्या हस्ते ट्रॉफी स्वीकारणार?
12
Video - तामिळनाडूतील चेंगराचेंगरीत मृत्युमुखी पडलेल्यांचे मृतदेह पाहून शिक्षणमंत्री ढसाढसा रडले
13
LPG ते पेन्शन, UPI पासून रेल्वे तिकीटापर्यंत... १ ऑक्टोबरपासून 'हे' ५ नियम बदलणार
14
आधी मसाज करायला आले अन्..; हायकोर्टाच्या वकिलाकडून ब्लॅकमेलिंगद्वारे पैसे उकळले!
15
IND vs PAK Final, Asia Cup 2025 Marathi : आज 'ऑपरेशन पाकिस्तान'! फायनलमध्ये भारतीय संघात दोन मोठे बदल होणार; अशी असेल प्लेइंग 11 
16
वाट चुकलेले दुचाकीस्वार थेट बेलापूर खाडीत; दोन महिन्यांतील दुसरी घटना; एक जण गेला वाहून
17
लैंगिक अत्याचार प्रकरणातील आरोपी स्वामी चैतन्यानंद यांना अटक; पोलिसांनी आग्र्यातून ताब्यात घेतले
18
केंद्रीय गृह मंत्रालयाने तामिळनाडूतील चेंगराचेंगरीचा अहवाल मागितला; अभिनेता विजयचीही चौकशी होणार
19
BSNL 4G स्पीड टेस्ट 2025: किती मिळतोय स्पीड? MBPS चा आकडा पहाल तर, म्हणाल...
20
"एकेकाळी कौतुक करणारे लोक आज...", सलमान खानचा अप्रत्यक्षपणे अभिनव कश्यपवर निशाणा

Food: चला चाखूया चटकदार चटण्यांची चव

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 26, 2023 11:39 IST

Food: ताटात वरण-भात, भाजी-पोळी बरोबर लोणचे आणि चटणी हे दोन पदार्थ जेवणात रंगत आणतात. चटण्यांचा विषय निघाला की प्रत्येक खवय्या हळवा होतो. शिवाय महाराष्ट्रात प्रांतोप्रांतीच्या चटण्यांना चव आहे. अशाच काही चटण्यांची ही माहिती...

- वृंदा दाभोलकर( खाद्यसंस्कृती अभ्यासक) 

ताटात वरण-भात, भाजी-पोळी बरोबर लोणचे आणि चटणी हे दोन पदार्थ जेवणात रंगत आणतात. चटण्यांचा विषय निघाला की प्रत्येक खवय्या हळवा होतो. शिवाय महाराष्ट्रात प्रांतोप्रांतीच्या चटण्यांना चव आहे. अशाच काही चटण्यांची ही माहिती...

चाटण या शब्दावरून आपल्याला मिळालेला शब्द म्हणजे चटणी. आपल्या जेवणाच्या पानातली डावी बाजू जितकी भक्कम गृहिणींना बाकी स्वयंपाकाचं जरा टेन्शन कमी येतं. चटणी भाकरी, चटणी पाव, आंबोळी चटणी, इडली चटणी किंवा चटणी पोळी हे तर अगदी हुकमी खाणं. पावसाळ्यात, थंडीच्या दिवसात गरम गरम पदार्थांबरोबर चटणी असेल तर त्या पदार्थाला चार चाँद लागतात. आपला सगळ्यांचा आवडता वडापाव याच्याबरोबर हिरवी, लाल, गोड चटणी हवीच. सोलापूरची शेंगदाणा चटणी किंवा कोल्हापूरला मिळणारी लाल चटणी जीला ठेचा म्हणतात, खवय्यांसाठी पर्वणी असते.

लसूण तीळ चटणीकृती - तीळ एका कढईमध्ये मंद आचेवर हलके भाजून घ्यावे.- त्याच कढईत दाणे आणि सुकं खोबर खरपूस भाजून घ्यावे.- दोन्ही थंड झाल्यावर मिक्सरच्या भांड्यात घालून त्यामध्ये जीर, लसणाच्या पाकळ्या, तिखट आणि मीठ घालून मिक्सर वर व्यवस्थित बारीक वाटून घ्यावं.- शेंगदाणे, खोबरं असल्याने वेगळ्या तेलाची गरज भासत नाही आणि खाताना चटणी कोरडी वाटल्यास त्यात दही किंवा कच्च तेल, तूप घालून खाता येते. 

लसूण तीळ चटणीसाठी साहित्य- तीळ - १ वाटी - शेंगदाणे दाणे  - अर्धी ते पाऊण वाटी.

डोश्याची लाल चटणीलाल चटणीसाठी साहित्यn दोन मध्यम आकाराचे टोमॅटो चिरूनn एक मध्यम कांदा चिरलेलाn ५/६ चमचे चिंचेच पाणी,किंवा १ चमचा आमचूर पावडर n काश्मिरी लाल मिरची पावडर २ चमचे n मीठ, जिरं १/२ चमचा, १/२ चमचा हळद, १०/१२ कढीपत्त्याची पानं, २ चमचे तेल (मोहरीचे वापरू शकत असाल तर)n उडदाची डाळ १ चमचा, फोडणीसाठी १/२ चमचा मोहरी.- सुकं खोबर - अर्धी वाटी- लसूण - १२ ते १५ पाकळ्या - मीठ - चवीनुसार, सैंधव मीठ वापरू शकता.- जीरं - अर्धा चमचा- लाल तिखट - १ -१/२ चमचा

कृती - कढईत तेल गरम करा. आता कढईत जिरे टाका. जिरे तडतडले की कांदा घाला. कांदा रंग बदलू लागला की त्यात टोमॅटो घाला. यानंतर हळद,लाल मिरची पावडर,मीठ, कढीपत्ता घाला. - आता ते शिजेपर्यंत सुमारे १०-१२ मिनिटे शिजवा. आता त्यात चिंचेचे पाणी घाला. गॅस बंद करून थंड होऊ द्या. आता हे सर्व मिश्रण मिक्सरमध्ये बारीक वाटून घ्या. नंतर एका भांड्यात काढा.- फोडणी च्या कढईत पहिल्यांदा तेल गरम करून त्यात उडदाची डाळ घालून ती सोनेरी रंगाची झाली की त्यात मोहरी घालून गरम गरम फोडणी त्या चटणीवर घाला.- डोसा, भाकरी, पोळी बरोबर ही चटणी ट्राय  कराच.

टॅग्स :foodअन्न