शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन दिवसात भारताच्या किती जहाजांनी पार केली होर्मुझची सामुद्रधुनी; केंद्र सरकारने सांगितली सद्यस्थिती
2
अशोक खरातसोबत नेत्यांचे संबंध; शरद पवार म्हणाले, 'आमच्यातील लोकप्रतिनिधी जाऊन जे काही...'
3
Thane Crime: खासगी बोलण्याचा बहाणा, हॉटेलमध्ये नेले आणि नर्सवर दोन वेळा बलात्कार
4
बंदूक नव्हे आता अक्कल पाजळणार! भारताविरोधात असीम मुनीरचा कांड; पाकिस्तानचा नवा कुरापती प्लॅन
5
Latest Marathi News LIVE Updates:इराणच्या हल्ल्यात चार इस्रायली नागरिकांचा मृत्यू, इमारतीच्या ढिगाऱ्याखाली मिळाले मृतेदह
6
IPL 2026, MI vs RR : हार्दिक पांड्या खेळणार का? MI कोच म्हणाले, तो काही दुखापतग्रस्त नव्हता, तर...
7
सुनेत्रा पवारांना पाठिंबा दिला, पण प्रचार करणार की नाही, शरद पवारांनी मांडली भूमिका; काँग्रेसबद्दल काय बोलले?
8
‘त्या’ घटनेतील तिसरी हत्या पोलिस व सुरक्षारक्षकांच्या डोळ्यासमोर; व्हिडिओ व्हायरल
9
तृणमूल काँग्रेस की भाजप? यंदा मतदारांचा कौल कुणाला? धक्कादायक ओपिनियन पोल समोर...
10
टॉर्चर करून करून पिता-पुत्राला मारलेले! तामिळनाडूच्या गाजलेल्या 'कस्टोडियल डेथ' प्रकरणात ९ पोलिसांना मृत्यूदंडाची शिक्षा
11
एकेकाळी १४०० एकर जमिनीचे मालक, आता मोहफुले वेचून जगण्याची वेळ; गोंड राजाच्या वंशजांची बिकट परिस्थिती
12
KKR च्या ताफ्यातून एकाच वेळी दोन्ही मिस्ट्री स्पिनर 'गायब'! अजिंक्य रहाणेनं सांगितलं त्यामागचं कारण
13
"शस्त्रसंधी करणे म्हणजे शत्रूंना आणखी गुन्हे करण्यासाठी...", इराणने ट्रम्प यांचा प्रस्ताव धुडकावला
14
Ekana Stadium: एकाना स्टेडियममध्ये पाण्याची एक बॉटल किती रुपयांना मिळते? किंमत ऐकून चक्रावून जाल!
15
बायको अधिकारी बनली अन् पतीला विसरली; अडीच वर्षांनी वाद मिटला, ज्योती-आलोक पुन्हा झाले एकत्र
16
नात्यांचा मोठा पेच! २५ वर्षांनंतर पती पुन्हा प्रकटला, पत्नीचे दीरासोबत लग्न लावले गेले; तिने आता काय करायचे?
17
मायलेज, पॉवर अन् फीचर्सनी सुसज्ज..; फक्त 6 लाखांत घरी घेऊन या लग्झरी सेडान कार
18
ना होर्मुझ खुला करणार, ना ४५ दिवसांचा युद्धविराम होणार! इराणनं प्रस्ताव धुडकावला; आता अमेरिका काय करणार?
19
नवीन घर झाल्यानंतर गौरव मोरेची पहिली प्रतिक्रिया, म्हणाला, "ताडपत्रीच्या घरातून..."
20
थांबा! पिवळेधमक आंबे पाहून भुलू नका; केमिकलने पिकवलेले नाही ना? विकत घेताना 'हे' पाहाच
Daily Top 2Weekly Top 5

अंजीर : फळ कसे, हे तर फुलच !

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 19, 2022 13:06 IST

Fig : अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे.

जगातले सगळ्यात प्राचीन फळ कुठले? असा प्रश्न विचारला तर प्रामुख्याने ज्या फळाचे नाव घेतले जाते, ते फळ म्हणजे अंजीर. वड, पिंपळ, उंबर आणि अंजीर ही एकाच वंशातील फळे. आदीमानवाने अंजिराची लागवड सुरू केली. त्याच्या लक्षात आले की, हे झाड लावायला सोपे आहे. अंजिराची झाडे लावताना बियांची गरज लागत नव्हती. एक फांदी तोडून लावली की झाड रुजत होते. हे फळ आदीमानवाला आवडले. त्याने त्याची लागवड सुरू केली.

अंजिराचा उल्लेख बायबलमध्येही आहे. बायबलमध्ये ॲडम आणि ईव्हने जेव्हा गार्डन ऑफ ईडन सोडले, तेव्हा स्वतःचे शरीर झाकण्यासाठी अंजिराच्या पानांचा वापर केला. म्हणजे विश्वाच्या निर्मितीच्या कथेतही अंजिराचा उल्लेख आहे. सुरूवातीला आशियाई खंडात लागवड झालेल्या या फळाने रोमन साम्राज्यात फार महत्त्वाचे स्थान पटकावले, इतके की रोमन झेंड्यावर अंजिराची पाने होती. रोमन लोक अंजिराला बाचूस किंवा मदिरा आणि मादकतेच्या देवाकडून माणसाला मिळालेली भेट मानत. भारतीय संस्कृतीत प्राचीन काळापासून सुरू झालेली अंजिराची आवड आजही कायम आहे.  

एकेकाळी अंजिराला गरीब माणसाचे ‘सुपरफूड’ मानण्यात येत असे. रोमन आणि ग्रीक साम्राज्यात गुलामांसाठी जे जेवण तयार होत असे, त्यात अंजिराचे प्रमाण खूप असे. कारण त्याचे पोषणमूल्य खूप आहे याची जाणीव त्याकाळच्या लोकांना झाली होती. गुलामांच्या खडतर आयुष्यात हे सुपरफूड त्यांना मजबूत बनवी. मराठी विश्वकोशानुसार, अंजिराचे पोषणमूल्य उच्च असते. त्यापासून कॅल्शिअम मिळते. तसेच यात फॉस्फरस, पोटॅशियम, बीटा कॅरोटीन (अ जीवनसत्त्व) आणि क जीवनसत्त्व असते.

इतर कोणत्याही फळापेक्षा अंजिरात तंतूमय पदार्थ अधिक प्रमाणात असतात. त्यामुळे पोट जड असेल तर अंजिराचा समावेश आहारात करायला हवाच. अंजीर ॲन्टिऑक्सिडंट म्हणूनही फार उपयोगी आहे. भारतासह पोर्तुगाल, इटली, ग्रीस, अफगाणिस्तान वगैरे देशांत मोठ्या प्रमाणात अंजिराचे पीक घेतले जाते. गंमत म्हणजे मानवी इतिहासातले हे पहिले फळ तांत्रिकदृष्ट्या फळच नाही. एक अंजीर म्हणजे हजार कलिका आहेत, बाहेरच्या बाजूला न फुलता, आतल्या आत राहिलेल्या!

टॅग्स :foodअन्न