शहरं
Join us  
Trending Stories
1
'तेव्हा पाकिस्तानशी मैत्री नव्हती, मग सिंधू पाणी करार का केला?', जयशंकर यांनी विरोधकांना घेरले
2
Kamchatka Krai earthquake Russia: समुद्राच्या खाली एकामागोमाग एक ३० धक्के! अमेरिकेच्या समुद्र किनाऱ्यावर सहा फूट लाटा उसळल्या, जगभरात हाहाकार... 
3
इन्स्टावर तरुणांना मेसेज पाठवायची, आणखी एका महिलेचे पाकिस्तान कनेक्शन उघड, शमा प्रवीण एटीएसच्या ताब्यात
4
रशियात भीषण भूकंपानंतर महाप्रलय; त्सुनामीमुळे प्रशांत महासागर खवळला, भारताला बसू शकतो फटका?
5
Video: मोठी दुर्घटना टळली! इंडो तिबेटियन पोलीस दलाची बस नदीत कोसळली, शस्त्रे गेली वाहून
6
पत्नी, सासूला संपवण्याचा कट रचला; दगडाने ठेचून हत्या केली अन् मृतदेह बागेत पुरला, मग...
7
IND vs ENG : 'वसाहतवाद' युगात आहात का? इरफान पठाणनं 'इंग्रज' पिच क्युरेटरवर असा काढला राग
8
"लष्कराच्या मदतीशिवाय पहलगाम हल्ला शक्य नाही..."; UNSC रिपोर्टनं पाकिस्तानचा बुरखा फाडला 
9
शांत सुरक्षित निवृत्तीची तयारी, लगेचच सुरुवात केलेली बरी...
10
शेतात बसला होता, मोबाईलवर काहीतरी पाहत होता; तितक्यात वीज पडली, स्फोट झाला, अन्... 
11
गृहकर्जासाठी पगार किती हवा? १० लाखांपासून ते १ कोटी रुपयांपर्यंतचं गणित, किती येईल EMI
12
"PM मोदींकडून अपेक्षा होती पण त्यांनी..."; पहलगाम हल्ल्यात मृत्युमुखी पडलेल्या शुभमच्या पत्नीने व्यक्त केली नाराजी
13
Shravan Recipe: कांदा-लसूण न वापरता करा मसाला स्टफिंग दोडकी; झटपट होते, चटपटीत लागते 
14
१९५२ नंतरचा सर्वात शक्तिशाली भूकंप, रिंग्ज ऑफ फायर'ला बोलतात खरा खलनायक'
15
पृथ्वीतलावरचा अस्सल खजिना! अशा ५ अद्भुत गोष्टी ज्या केवळ कंबोडिया देशामध्येच आहेत
16
सर्वात मोठी डील करण्याच्या तयारीत TATA Motors, इटलीची आहे कंपनी; चीननंही यापूर्वी केलेले प्रयत्न
17
प्रेम वाटलं जातं, मग विमा का नाही? एकाच पॉलिसीत पती-पत्नीला ५० लाखांपर्यंत विमा; कमी प्रीमियममध्ये बंपर परतावा!
18
महागड्या गाड्याही पडतील फिक्या! अ‍ॅडवॉन्स फिचर्ससह बाजारात येतोय महिंद्राचा पिकअप ट्रक, पाहा टीझर
19
Surya Grahan: १०० वर्षातले सर्वात मोठे सूर्यग्रहण २ ऑगस्टला; ६ मिनिटांसाठी पसरणार जगभरात काळोख!
20
IND vs PAK 1st Semi Final : जे नको तेच घडलं! या स्पर्धेत जुळून आला भारत-पाक सेमीचा योग

तोंडाला पाणी सुटेल असं पाणीपुरी पुराण! कुठे पुचका, कुठे गोलगप्पा तर कुठे पानीपुरी; 'सहिष्णू' पदार्थाची रसरशीत स्टोरी  

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 8, 2025 17:55 IST

टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही.

>> शुभा प्रभू-साटम

मनुष्य प्राण्याचा आदिमानवापासून आधुनिक मानवापर्यंतचा प्रवास पाहिला तर त्यातून खाद्यसंस्कृतीला वेगळं काढता येत नाही. मानवाची ही खाद्ययात्रा रंजक आहे. तिला इतिहास तर आहेच, पण भूगोलही आहे. या सदरातून त्याचा पाक्षिक वेध घेतला जाईल.......

आज खाण्यापिण्याचे जे करोडो प्रकार आहेत त्यांचा पूर्वज कोण? म्हंजे आता पाणीपुरी घ्या.. उगा पुरणपोळी आणि मोदक अशा पदार्थांचे शिवधनुष्य नको हा दिसायला टीचकीभर पदार्थ, एका वाटीत मावणारा, पण लोक गुलामागत नतमस्तक होऊन, दयनीय चेहेऱ्याने विक्रेत्याच्या समोर कटोरे/द्रोण घेऊन उभे असतात... अगदी अंबानी घरचे लग्न असो अथवा दुसरे कुठलेही. भले जगातील अद्वितीय पदार्थांचे स्टॉल असोत या पदार्थांचा ठसका कमी होत नाही. लोक प्रथम तिची काही आवर्तने करून मग मुख्य यज्ञकर्माला सुरुवात करतात. नवे सदर आहे आणि त्याची बोहोनी पाणीपुरी या पदार्थाने करतेय. 

पु.ल. यांचे चिरोट्यांबद्दल मत माहीत नसेल असा मध्यमवयीन मराठी माणूस नसावा. खारी बिस्कीट फसले. त्यावर साखर घालून चतुर गृहिणीने नवऱ्याला बनवले... तसे काही पुरीबाबत झाले असावे, असा माझा चवदार अंदाज आहे. म्हंजे पुरी बेत ठरला असावा, पण काही पुऱ्या स्वतंत्र कणखर व्यक्तिमत्त्वाच्या निघून मोडेन; पण वाकणार नाही या भावनेने फुगून राहिल्या असाव्यात. पुरी कोडे इथे थोडे सुटले, पण मग त्याची जोडी भूतलावरील त्या अमृततुल्य पाण्याशी कशी कोणी जुळवली? मुळात असे पाणी करायचे हे कसे सुचले? 

जगातील अनेक चविष्ट पदार्थांचे उगम किंवा जन्म अपघाताने झाले असे मानले जाते. हे काहीअंशी खरे आहे, पण पाणीपुरी हा अपघाती पदार्थ नसावा. कोणीतरी इरसाल, आंबटशौकीन व्यक्तीने याची निर्मिती केली असावी... आणि तो माणूस अनिकेत मुसाफिर असणार. कारण या पदार्थाचा बेस किंवा मूळ अगदी सुटसुटीत आहे. परत मागणीनुसार बदल होतो. तिखा जादा चाहिए... मिळेल! तिखा मिठा बराबर... मिळेला खट्टा बढाओ... वाढतो। पाणी ज्यादा, रगडा कम... होते. स्वयंपाकघरात शिजलेला कोणताही पदार्थ इतका सहिष्णू नसतो. आमटी जरा अधिक पातळ हवी, मिळेल का विचारून बघा... लंघन करण्याचा अनुभव न मागता मिळेल. 

मुद्दा असा की पूर्ण भारतात हा पदार्थ जबरदस्त लोकप्रिय; पण इतिहास मात्र अस्पष्ट. अर्थात त्याने काही फरक पडत नाही म्हणा. तशी मी कट्टर मुंबईकर. पण पाणीपुरी खावी ती कोलकात्यात या मताची. भेळ मुंबईची, विषय संपला, पण पुचका/पाणीपुरीबाबतीत कोलकाता अनभिषिक्त सम्राट. एकतर पुन्या अगडबंब... डेंटिस्टने त्या आपल्याकडे ठेवाव्यात... पार टॉन्सिल दिसतील असे तोंड उघडावे लागते, ते पण राजीखुशीने. आणि ते पाणी... सागर मंथनातून आलेले अमृत आणि सुरा यात दानवांनी सुरा का निवडली हे उमगते. प्रथम थोडे आंबट, मग हलके गोड आणि पुरी गिळता गिळता सणसणीत तिखट.. काय अ‌द्भुत मिश्रण असते राव! दिल्लीमधील गोलगप्पे पुन्हा वेगळे.... इथे मध्यम मार्ग नाही. अगदी साउथ दिल्लीतील अथवा खान मार्केट गैंगपण तिखट आंबटगोड या क्रमाने असणारे पाणी ओरपत असते. मुंबईमधील पाणीपुरी तशी मवाळ. मुंबईसारखी सहिष्णू... मागणी तसा पुरवठा. बाकी भारतात पण पाणीपुरी मिळते; पण ही तीन शहरे बिनीचे शिलेदार. 

तर मूळ मुद्दा काय होता? पदार्थांचा उगम कसा, कुठे कधी झाला? मी उत्तर शोधतेय... तोपर्यंत तुम्ही खायची आवर्तन सुरू ठेवा. आणि हो... यज्ञयाग संपला की सुकी पुरी विसरू नका... अलिखित हक्क असतो तो आपला!