शहरं
Join us  
Trending Stories
1
अशोक खरातच्या अश्लील व्हिडीओंची १५ ते २० रुपयांना विक्री, गुन्हा दाखल, त्या व्यक्तीला लवकरच करणार अटक
2
"आज रात्री एका संस्कृतीचा अंत होईल..."; डोनाल्ड ट्रम्प यांची इराणला सर्वात मोठी धमकी
3
धडधड वाढली! इराणने 'या' शहरातील सर्व रेल्वे सेवा केल्या रद्द; इस्रायल-अमेरिकेचे हल्ले, तीन उड्डाण पूल उद्ध्वस्त
4
अवघ्या जगाला इंधनाची कमतरता, पण चीनला नाही जाणवली? २० वर्षांपूर्वीच केली होती तयारी
5
Viral Video: नदीच्या काठावर नवऱ्यासोबत मद्यपान, लोकांनी हटकताच म्हणाली,"आमच्यामुळेच तुमची घरं चालतात!"
6
NCL: एनसीएलमध्ये नोकरीची संधी, ५७७ जागांसाठी जाहिरात प्रसिद्ध; ९ एप्रिलपासून नोंदणी सुरू
7
८वा वेतन आयोग: १३ एप्रिल रोजी महत्वाची बैठक; वेतनवाढीचा अंतिम निर्णय होणार?
8
"दैवीशक्ती असल्याचं भासवत लैंगिक शोषण, ३० पीडिता समोर आल्या..."; खरात प्रकरणात मोठे खुलासे
9
इराण 'हॉर्मुझ' करारासाठी तयार; अमेरिकेला पाठवला शांतता प्रस्ताव, पण केली मोठी मागणी....
10
"पार्थ पवारांचं विधान काँग्रेसला फारच झोंबलं", अमोल मिटकरींनी १६ आमदारांची पार्टी म्हणत डिवचले
11
इस्रायलचा इराणवर मोठा हवाई हल्ला! १८ जणांचा मृत्यू, 24 गंभीर; दिग्गज लष्करी अधिकारी ठार? तेहरानसह शस्त्रास्त्र डेपो उद्ध्वस्त
12
IPL 2026 : अर्जुन तेंडुलकरचा यॉर्कर शो! पंतसमोर अचूक गोलंदाजी; LSG नं दिली पदार्पणाची हिंट (VIDEO)
13
Latest Marathi News LIVE Updates: 'इराणसाठी आजची रात्र अखेरची', अमेरिकेचे अध्यक्ष डोनाल्ड ट्रम्प यांच्या पोस्टने जग हादरले
14
बंगाल निवडणुकीसाठी कडेकोट सुरक्षा; २.४ लाख जवानांसह २० हजार महिला कमांडो तैनात
15
David Warner: क्रीडाविश्वाला हादरून टाकणारी बातमी! स्टार क्रिकेटपटू डेव्हिड वॉर्नरला अटक; नेमकं प्रकरण काय?
16
GEN Z मध्ये वाढतोय हेअर कलर ट्रेंड; ब्ल्यू-रेड-गोल्डन केसांच्या रंगावरुन ओळखा त्यांचं व्यक्तिमत्व
17
युद्ध चिघळलं! डेडलाइन संपण्याआधीच अमेरिकेचा खार्ग बेटावर मोठा हल्ला; इराणचा आर्थिक कणा मोडणार?
18
Manipur rocket attack: गोळ्यांचा आवाज आणि हिंसक जमाव;  मणिपूरमधील हिंसाचाराचे व्हिडीओ आले समोर
19
Mira-Bhayander Flyover: मीरा भाईंदरमधला व्हायरल झालेला 'तो' अजब पूल असा का बनला? खुद्द CM फडणवीसांनी केला खुलासा
20
भूमिपूजन झालं, पण 'पॉड टॅक्सी' नेमकी असणार तरी कशी? फायदा काय? इत्थंभूत माहिती समजून घ्या २ मिनिटांत!
Daily Top 2Weekly Top 5

चाय पकोडा डे - आज खा मनसोक्त भजी

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 30, 2018 10:36 IST

फूड एक्सपर्ट रुशिना मन्शो घडियाल आणि काही फूड ब्लॉगर्सनी एकत्र येत indian food observance day ही संकल्पना राबवली आहे. त्यानुसार एक थीम ठरवून त्याप्रमाणे वेगवेगळे फूड डे सेलिब्रेट केले जातात.  आज म्हणजे सोमवारी 30 जुलैला 'चायपकोडा डे' साजरा केला जाणार आहे. त्यानिमित्ताने गरमागरम भजी खा आणि चहा आवर्जून प्या.

भक्ती सोमणपावसाळ्याला नुकतीच कुठे सुरुवात झाली आहे. या पावसाळ्याच्या धुंद वातावरणात, मनाला आल्हाद देणाऱ्या गारव्यात काहीतरी गरम हे हवचं. चहा हा बेस्ट ऑप्शन आहेच. पण तरी खरी गंमत आहे ती गरमागरम भजी किंवा पकोडा खाण्यात...

पाऊस सुरू झाला की घराघरात हमखास भजी पार्टी रंगते. कांदा भजी हा प्रत्येकाचा विक पॉईंट. भरपूर कांदा, त्यात तिखट, मीठ, डाळीचे पीठ थोडेसे तांदूळ पीठ आणि पाणी एकत्र करून सैलसर पीठ भिजवायचं. आणि गरमागरम  तेलात ही भजी तळून खायची. खाताना जाम मजा येते. कांदयाबरोबरच बटाटा भजी, मिरची भजी होतेच होते. 

मग बाजारात कणसं यायला लागतात. त्याची कुरकुरीत भजी पण अफलातून लागते. मात्र हे खाताना बरोबर चहा हवाच. आता हे वाचून भजी खाण्याची इच्छा होणे साहजिकच आहे. अशावेळी तुम्ही भजी करण्याच्या ओढीने स्वयंपाकघरात जाल. आठवेल की कांदा संपलाय. पण, मूढ घालवू नका. घरात जर कोबी, फ्लॉवर, गाजर अशा भाज्या असतील तर त्या एकत्र करून मिक्स व्हेज भजी करता येईल. नाहीतर मग मुग डाळ, चणा डाळ किंवा सर्व प्रकारच्या डाळ एकत्र करून त्याची भजी करता येईल. आहे का नाही पर्याय!  बाजारात तर या कालावधीत ओव्याची पाने, रानभाज्या मिळतात, त्याचीही भजी मस्त लागते. 

महाराष्ट्रात वेगवेगळ्या भज्या होतातच, पण बाहेरच्या प्रांतातही या भजी किंवा पकोड्याचे खूप प्रकार बघायला मिळतात. त्याविषयी पुन्हा कधीतरी बोलुया. पण आज आहे चाय पकोडा डे. आज काय करायचे तर मनसोक्त भजी (पकोडे) खायची आणि तेही चहा पिता पिता. मुंबई आणि उपनगरातली काही हॉटेल या पकोडा डेत सहभागी होणार आहेत. तेव्हा घरी जर पकोडे करायला जमले नाहीत तर तिथे खा. आणि भजी खाता खाता पाऊस पडला तर खरी मजा येईल. हो ना! 

वाटल्यास तुम्ही तुमचे चहा भजी खातानाचे फोटो #chaipakodaday  या हॅशटॅगने शेअर करा.

टॅग्स :foodअन्न