शहरं
Join us  
Trending Stories
1
गुन्हे मागे घेतले नाहीत, तर मोठं आंदोलन उभारू; मनोज जरांगे पाटील यांचा सरकारला इशारा
2
इराण-US युद्धात पुतिन यांची उडी; इस्लामाबादमधील फ्लॉप शो पाहून इराणी राष्ट्रपतींना दिली ऑफर
3
IPL 2026 MI vs RCB Phil Salt Record : सॉल्टची स्फोटक खेळी; सेंच्युरी हुकली, त्यातही साधला मोठा डाव
4
पडद्यामागे खेळ रंगला, इराणचा डाव फसला?; सौदीची सीक्रेट पाईपलाईन, भारतासाठी मोठी संधी
5
IPL 2026 : वानखेडेवर भावूक क्षण! MI-RCB खेळाडूंसह प्रेक्षकांकडून Asha Bhosle यांना श्रद्धांजली (VIDEO)
6
Travel : भारताचं सायबेरिया! एप्रिलमध्येही असते शून्याखाली तापमान;-६० अंशांपर्यंत घसरतो पारा
7
पाकिस्तानात विटकॉफ अन् अराघची यांच्यात खडाजंगी; बैठकीतच आली हाणामारीची वेळ, वाचा Inside Story
8
पाकिस्तानात आयोजित अमेरिका–इराणमधील चर्चा निष्फळ होण्याची 5 प्रमुख कारणे, जाणून घ्या...
9
होर्मुझमध्ये अमेरिकेचे 'क्लीनअप' ऑपरेशन! युद्धनौका, ड्रोन आणि लेझर हेलिकॉप्टर्स तैनात
10
चार्जरवरील 'R' अक्षराचा अर्थ माहितीये का? फेक चार्जर ओळखण्याची 'ही' आहे सर्वात सोपी ट्रिक; ९९% लोक करतात दुर्लक्ष
11
सोनं ५०००० तर चांदी २ लाखांनी स्वस्त; खरेदीची सुवर्ण संधी की आणखी घसरणार भाव?
12
इराण-US चर्चा फिस्कटताच होर्मुझला जाणाऱ्या २ पाकिस्तानी जहाजांनी धूम ठोकली; वाटेतच घेतला U-Turn
13
उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!
14
माता न तू वैरिणी; कुऱ्हाडीने घाव घालत दोन मुलांची हत्या, स्वतःवरही केला वार
15
बेडरुम व्हिडीओ, २०२० चं 'ते' सीक्रेट अफेअर... प्रियंकाच्या क्राईम फाईलबाबत खळबळजनक खुलासा
16
Asha Bhosle: "...तेव्हा मी जगाचा निरोप घ्यावा!"; आशा भोसलेंची शेवटची इच्छा ऐकून चाहत्यांचे डोळे पाणावले
17
लहानशा देशात इराणनं लपवलाय 'खजिना'; इथूनच चालतो ड्रोन-मिसाइलचा खेळ, अमेरिकेलाही देतात चकवा
18
Raj Thackeray : "आशाताई'-दि लास्ट एम्परर, आयुष्याच्या प्रत्येक टप्प्यावर वादळं पहिली, तरीही..."; राज ठाकरेंची भावुक पोस्ट
19
TCS ची मोठी घोषणा! यावर्षी २५ हजार फ्रेशर्सना देणार नोकरी; युवा टॅलेंटवर कंपनीचा फोकस
20
ना हृदय... ना मेंदू! तरीही समुद्राच्या अथांग गर्तेत राज्य करतो 'हा' जीव; नेमकं गुपित काय?
Daily Top 2Weekly Top 5

उन्हाळ्यात खरबूज खाण्याचे शौकीन आहात? 'या' सोप्या टिप्स वापरा अन् ओळखा गोड आहे की नाही!

By ऑनलाइन लोकमत | Updated: April 12, 2026 18:59 IST

बाजारात मिळणारे प्रत्येक खरबूज गोड आणि रसरशीत असेलच असे नाही. त्यामुळे योग्य फळ निवडण्यासाठी काही खास टिप्लस...

उन्हाळ्याच्या दिवसात शरीराला हायड्रेट ठेवण्यासाठी पाणी आणि फळांचे सेवन अत्यंत आवश्यक असते. खरबूज हे या ऋतूतील एक महत्वाचे आणि साधारणपणे सर्वांनाच आवडणारे फळ. हे केवळ थंडावा देत नाही तर आरोग्यासाठीही फायदेशीर ठरते. मात्र, बाजारात मिळणारे प्रत्येक खरबूज गोड आणि रसरशीत असेलच असे नाही. त्यामुळे योग्य फळ निवडण्यासाठी काही खास टिप्लस...

असे निवडा योग्य खरबूज -खरबूज खरेदी करताना सर्वप्रथम त्याचा खालचा भाग तपासावा. जर खालचा भाग गडद रंगाचा असेल, तर ते फळ चांगले पिकलेले आहे असे समजावे. फिकट रंगाचा भाग असल्यास खरबूज कच्चे असण्याची शक्यता असते. तसेच, फळाच्या वासावरूनही त्याचा गोडवा ओळखता येतो.

सालीचा रंग आणि वजन -पिकलेल्या खरबुजाचा रंग साधारणपणे फिकट पिवळा असून त्यावर हिरव्या रेषा असतात. जर खरबूज पूर्णपणे हिरवे दिसत असेल, तर ते खरेदी करणे टाळावे. वजनाचा विचार करता, हलके खरबूज सहसा जास्त गोड आणि रसरशीत असते. याउलट जास्त जड खरबुजात बिया अधिक आणि गोडवा कमी असू शकते. तसेच, अतिशय मऊ किंवा दबलेले खरबूज खराब असू शकते.

स्टोअर करण्याची पद्धत -खरबूज आणल्यानंतर, ते खोलीच्या तापमानात ठेवावे. मात्र, फळ कापल्यानंतर उरलेला भाग एअरटाइट डब्यात भरून फ्रीजमध्ये ठेवावा. यामुळे ते जास्त काळ ताजे राहते. लक्षात ठेवा, खरबुजाचा तीव्र वास इतर फळांच्या चवीवर परिणाम करू शकतो, त्यामुळे ते इतर फळांसोबत ठेवू नका. शिवाय, याच्या बिया फेकून न देता धुवून व वाळवून विविध पदार्थांमध्ये वापरता येतात.

 

टॅग्स :fruitsफळेMarketबाजार