'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 1, 2026 12:44 IST2026-05-01T12:43:46+5:302026-05-01T12:44:43+5:30

मुलांच्या संगोपनाबद्दल अभिनेत्री म्हणाली...

Yeh Jawaani Hai Deewani fame actress evelyn sharma divorce from husband tushar bhindi after 5 years of marriage | 'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...

'ये जवानी है दिवानी' फेम अभिनेत्रीचा घटस्फोट, लग्नानंतर ५ वर्षांनी मोडला संसार; म्हणाली...

रणबीर कपूर आणि दीपिका पादुकोणचा 'ये जवानी है दिवानी' सिनेमा सुपरहिट झाला होता. सिनेमा एवलीन शर्मा ही जर्मन अभिनेत्रीही दिसली होती. तिच्याही अभिनयाने प्रेक्षकांचं लक्ष वेधलं होतं. दरम्यान एवलीन शर्मा पतीपासून विभक्त झाली आहे.  लग्नानंतर पाच वर्षांनी तिचा संसार मोडला आहे. याबद्दल एवलीनने स्वत: भाष्य केलं आहे.

हिंदुस्तान टाईम्सला दिलेल्या मुलाखतीत एवलीन शर्मा म्हणाली, "हो, आम्ही नातं इथेच थांबवण्याचा निर्णय घेतला आहे. परस्पर सहमतीने आणि शांततापूर्ण पद्धतीने आम्ही वेगळे होत आहोत.  मात्र आमच्या दोन्ही मुलांच्या पालनपोषणासाठी आम्ही कायम त्यांचे आईबाबा म्हणून राहू. आयुष्याच्या या नव्या टप्प्यावरही आमची जुनी मैत्री कायम राहील. आम्ही मिळून मुलांचा सांभाळ करु. या क्षणी आम्हाला प्रायव्हसी द्यावी अशी मी आशा करते."

एवलीन शर्मा २०१२ ते २०१९ पर्यंत हिंदी सिनेमांमध्ये काम करत होती. 'ये जवानी है दिवानी'शिवाय ती 'यारियां','मै तेरा हिरो' सिनेमांमध्येही दिसली. २०१९ साली तिचा 'साहो' हा शेवटचा सिनेमा आला. त्याच वर्षी तिने इंडो ऑस्ट्रेलियन डेंटल सर्जन तुषान भिंडीशी साखरपुडा केला. तर २०२१ साली ती तुषारसोबत लग्नबंधनात अडकली. एवलीनने दोन मुलांना जन्म दिला. मात्र आता लग्नानंतर ५ वर्षांनी एवलीनने घटस्फोट घेतला आहे.

Web Title : 'ये जवानी है दीवानी' फेम एक्ट्रेस एवलिन शर्मा का तलाक

Web Summary : 'ये जवानी है दीवानी' से मशहूर एवलिन शर्मा ने शादी के पांच साल बाद पति से तलाक ले लिया। वे बच्चों की परवरिश साथ मिलकर करेंगे और दोस्त बने रहेंगे। शर्मा, जिन्होंने कई हिंदी फिल्मों में काम किया, ने 2021 में तुषान भिंडी से शादी की थी। उन्होंने इस दौरान गोपनीयता बनाए रखने का अनुरोध किया है।

Web Title : 'Yeh Jawaani Hai Deewani' Actress Evelyn Sharma Divorces After 5 Years

Web Summary : Evelyn Sharma, known for 'Yeh Jawaani Hai Deewani,' is divorcing her husband after five years of marriage. They will co-parent their children and remain friends. Sharma, who acted in several Hindi films, married Tushaan Bhindi in 2021. She requests privacy during this time.