प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 30, 2025 15:22 IST2025-05-30T15:22:32+5:302025-05-30T15:22:42+5:30

अनुष्काची ही मैत्रीण नेमकी आहे तरी कोण, याविषयी प्रचंड कुतूहल निर्माण झालं आहे.

Who Is Malvika Nayak Know About The Woman Sitting Next To Anushka Sharma During Ipl Matches | Virat Kohli | प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?

प्रत्येक सामन्यात अनुष्का शर्माच्या शेजारी दिसणारी महिला चर्चेत, नेमकी आहे कोण ?

Who is Malvika Nayak: क्रिकेटर विराट कोहली (Virat Kohli) आणि अभिनेत्री अनुष्का शर्मा (Anushka Sharma)  ही अनेकांची आवडती जोडी आहे. अनुष्का ही कायम खंबीरपणे विराटच्या सोबत असते. अनुष्का जेव्हा-जेव्हा स्टेडियममध्ये विराटचा सामना पाहण्यासाठी येत असते. तेव्हा प्रत्येकवेळी तिची कायम चर्चा रंगताना दिसते. पण, आता सध्या अनुष्का शर्माची एक मैत्रीण सोशल मीडिया सेन्सेशन ठरली आहे. अनुष्काची ही मैत्रीण कोण आहे, ती काय करते, याबद्दल जाणून घेण्यासाठी नेटकरी फारच उत्सुक आहेत.

विराट सध्या आयपीएलमध्ये खेळत आहे. काल त्याच्या टीमनं पंजाब किंग्सचा पराभव करत अंतिम फेरीत प्रवेश केलाय. आरसीबी जिंकल्यानंतर अनुष्का आणि तिची मैत्रिण ही एकमेकींना मिठी मारून आनंद साजरा करताना दिसल्या. मात्र, यावेळी फक्त अनुष्काच नाही तर तिच्यासोबत दिसलेली ही तरुणी चर्चेचा विषय ठरली. तर अनुष्काच्या या मैत्रिणीचं नाव मालविका नायक आहे. अनुष्का आणि मालविका यांची मैत्री फार जुनी आहे.   ती याआधीही अनेक सामन्यांमध्ये अनुष्कासोबत दिसली आहे.

मालविकाही अनुष्काची मैत्रीण असल्याने अर्थातच विराट कोहली तिला सोशल मीडियावर फॉलो करतो. पण विराटशिवाय क्रिकेटपटू स्मृती मंधानाचा बॉयफ्रेंड पलाश मुच्छाल, क्रिकेटर युजवेंद्र चहल हेसुद्धा तिचे फॉलोअर्स आहेत. महेंद्रसिंह धोनीची पत्नी साक्षीचंही नाव फॉलोअर्सच्या यादीत आहे.

 मालविका नायक ही MBA पदवीधर आहे. सध्या ती Innoz Technologies Pvt. Ltd. मध्ये बिझनेस डेव्हलपमेंट आणि पार्टनरशिप्स विभागात काम करते. तिचे पती निखिल सोसले हे डियाजियो इंडियामध्ये मार्केटिंग आणि रेव्हेन्यू हेड म्हणून कार्यरत आहेत आणि ते RCB संघासाठी काम करतात. 

Web Title: Who Is Malvika Nayak Know About The Woman Sitting Next To Anushka Sharma During Ipl Matches | Virat Kohli