कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 10, 2024 11:24 IST2024-07-10T11:23:37+5:302024-07-10T11:24:25+5:30

कवितेतून राजकीय व्यक्तींना चिमटे काढणारा 'मिर्झापूर 3' मधील कवी रहीमबद्दल जाणून घ्या (mirzapur 3)

Who is the poet in Mirzapur 3 to be arrested for writing poetry actor pallav singh | कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

कविता केल्या म्हणून तुरुंगात जाणारा 'मिर्झापूर 3' मधील 'शायर' आहे तरी कोण?

सध्या 'मिर्झापूर 3' ची चांगलीच चर्चा आहे. या सीरिजमधील सर्वच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरत आहेत. 'मिर्झापूर 3' मध्ये यावेळी जास्त भाव खाऊन गेलेली व्यक्तिरेखा म्हणजे कवी रहीम. कवी संमेलनात समोर भलेभले राजकारणी बसलेले असूनही त्यांच्यासमोर प्रक्षोभक कविता म्हणत टाळ्या वसूल करणारा कवी रहीम. पुढे कविता केल्या म्हणून रहीमला अटक होते आणि तो तुरुंगात येतो. तिकडेही तो त्याच्या कवितांनी चांगलाच गाजतो. 'मिर्झापूर 3'मध्ये कवी रहीमची भूमिका साकारणारा हा अभिनेता कोण? जाणून घ्या. 

कवी रहीमची भूमिका साकारणारा अभिनेता कोण?

'मिर्झापूर 3'मध्ये कवी रहीमची भूमिका साकारलीय अभिनेता पल्लव सिंग या कलाकाराने. पल्लवने याआधी 'ताज-डिव्हायडेड बाय ब्लड' याशिवाय 'माई' अशा कलाकृतींमध्ये काम केलंय. सिक्कीम मनीपाल युनिव्हर्सिटीमधून त्याने इंजिनीयरींग केलं. पुढे दिल्लीच्या नॅशनल स्कूल ऑफ ड्रामामधून त्याने अभिनयाचं रितसर प्रशिक्षण घेतलं. केवळ अभिनय नाही तर पल्लवने काही नाटकांच्या लेखनाची धुरा सांभाळली आहे.

'मिर्झापूर 3' मधील कविता गाजल्या

'मिर्झापूर 3'  मध्ये पल्लवने बोललेल्या कविता चांगल्याच गाजल्या. बोलता बोलता कवितेत शिवी देऊन राजकारण आणि राजकीय व्यक्ती यांना चिमटे काढणारा रहीम सध्या चांगलाच चर्चेत आहे. सोशल मीडियावर रहीमने सीरिजमध्ये बोललेल्या कवितांचे मीम आणि रील तयार करण्यात आले आहेत. 'मिर्झापूर 3' बद्दल सांगायचं तर या सीरिजला प्रेक्षकांचा संमिश्र प्रतिसाद मिळतोय. काहीजण ही सीरिज पाहून कौतुकाचा वर्षाव करत आहेत कर काहीजण टीकेचा भडीमार. 

Web Title: Who is the poet in Mirzapur 3 to be arrested for writing poetry actor pallav singh