प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2026 13:38 IST2026-05-08T13:37:09+5:302026-05-08T13:38:12+5:30

अभिनेत्रीचा नवरा आहे तरी कोण?

tv actress aashka goradia second time mothe gave birth to a baby boy know more | प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्री झाली आई, पहिल्या मुलाचं नाव अलेक्झांडर तर आता दुसऱ्याचं...; शेअर केली पोस्ट

प्रसिद्ध अभिनेत्री आणि उद्योजिका आशका गोराडिया आणि पती ब्रेंट गोबल यांच्या घरी दुसऱ्यांदा पाळणा हलला आहे. आशकाने १ मे २०२६ रोजी एका गोंडस मुलाला जन्म दिला असून त्याचे नाव 'रिचर्ड थिओडोर गोबल' असे ठेवण्यात आले आहे. आशकाने ८ मे रोजी सोशल मीडियावर आपल्या नवजात बाळाचा पहिला फोटो शेअर करत ही आनंदाची बातमी चाहत्यांसोबत शेअर केली. या दाम्पत्याने डिसेंबर २०२५ मध्ये त्यांच्या लग्नाच्या आठव्या वाढदिवशी गुडन्यूज शेअर केली होती.

आनंदाची बातमी शेअर करताना आशकाने एक छान पोस्ट लिहिली आहे. तिने म्हटले की, "आमच्या आयुष्यात १ मे २०२६ रोजी रिचर्ड थिओडोर गोबलचे आगमन झाले आहे. देवाच्या नियोजनावर आमचा अढळ विश्वास असून आम्हाला मिळालेल्या या गिफ्टबद्दल आम्ही कृतज्ञ आहोत. आता अलेक्झांडरला लहान भाऊ मिळाल्यामुळे घरात दोन मुलांची धिंगाणा मस्ती आणि रंजक गोष्टी, स्टंट्स पाहायला मिळतील." आशकाच्या या पोस्टवर मनोरंजन विश्वातील अनेक कलाकारांनी शुभेच्छांचा वर्षाव केला आहे.

आशका गोराडिया आणि ब्रेंट गोबल यांनी १ डिसेंबर २०१७ रोजी ख्रिश्चन पद्धतीने, तर ३ डिसेंबर रोजी हिंदू रितीरिवाजाप्रमाणे लग्नगाठ बांधली होती. त्यांना ऑक्टोबर २०२३ मध्ये पहिला मुलगा झाला ज्याचं नाव अलेक्झांडर असं ठेवण्यात आलं. आशकाचा नवरा ब्रेंट गोबेल हा योगा प्रॅक्टिशनर आणि शिक्षक आहे. आशकाच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मानंतर करिश्मा तन्ना, दिव्यंका त्रिपाठी, आरती सिंग आणि मोनालिसा यांसारख्या तिच्या जुन्या सहकलाकारांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून या जोडप्याचे अभिनंदन केले आहे.

वर्कफ्रंट

आशका गोराडियाने 'नागिन', 'कुसुम' आणि 'लागी तुझसे लगन' यांसारख्या लोकप्रिय मालिकांमधून आपली ओळख निर्माण केली होती. तसेच ती 'बिग बॉस ६' आणि 'खतरों के खिलाडी ४' मध्येही दिसली होती. २०१९ पासून तिने अभिनयातून ब्रेक घेतला असून सध्या ती तिच्या 'रेने कॉस्मेटिक्स' या यशस्वी ब्रँडवर पूर्णपणे लक्ष केंद्रित करत आहे. आता ती आपल्या दोन मुलांच्या संगोपनात व्यस्त आहे.

Web Title : अभिनेत्री आशका गोराडिया ने दूसरे बच्चे का स्वागत किया, नाम रखा रिचर्ड।

Web Summary : आशका गोराडिया और ब्रेंट गोबल ने 1 मई, 2026 को अपने दूसरे बेटे, रिचर्ड थियोडोर का स्वागत किया। उन्होंने सोशल मीडिया पर एक तस्वीर के साथ खबर साझा की। आशका अपने कॉस्मेटिक्स ब्रांड और परिवार पर ध्यान केंद्रित कर रही हैं।

Web Title : Actress Ashka Goradia welcomes second child, names him Richard.

Web Summary : Ashka Goradia and Brent Goble welcomed their second son, Richard Theodore, on May 1, 2026. They shared the news with a photo on social media. Ashka is focusing on her cosmetics brand and family.