तारा सिंगच्या सिनेमात कॅमिओ करणार सलमान खान, जानेवारीत सुरु करणार शूटिंग

By ऑनलाइन लोकमत | Published: December 19, 2023 09:15 AM2023-12-19T09:15:46+5:302023-12-19T09:18:10+5:30

'गदर 2' च्या यशामुळे अभिनेता सनी देओलचा (Sunny Deol) भाव वाढला आहे.

Tiger 3 star salman khan to make a cameo role in gadar 2 fame sunny deol next movie shooting start in january | तारा सिंगच्या सिनेमात कॅमिओ करणार सलमान खान, जानेवारीत सुरु करणार शूटिंग

तारा सिंगच्या सिनेमात कॅमिओ करणार सलमान खान, जानेवारीत सुरु करणार शूटिंग

अभिनेता सनी देओल सध्या गदर 2 चित्रपटांमुळे चर्चेत आहे. 2001 मध्ये प्रदर्शित झालेल्या ‘गदर : एक प्रेमकथा’ या चित्रपटाचा हा सीक्वेल आहे. ‘गदर 2’च्या या प्रचंड यशानंतर सनी देओलचं नशीब फळफळलं आहे. समीक्षक आणि प्रेक्षकांनी या चित्रपटाचे खूप कौतुक केले. यानंतर सनी देओलकडे आता चित्रपटांच्या ऑफरच्या रांगा लागल्या आहेत. भाईजानचेही देओल कुटुंबाशी चांगले संबंध आहेत. तो धर्मेंद्र यांचा सर्वात मोठा चाहता आहे.

आता बातम्या येत आहेत की सनी देओलच्या पुढच्या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. सध्या सनी देओल त्याचा आगामी 'सफर' चित्रपटाच्या तयारीत बिझी आहे. या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे.  मीडिया रिपोर्ट्सनुसार, या चित्रपटात सलमान खान कॅमिओ करताना दिसणार आहे. चित्रपटाच्या जवळच्या एका सूत्राने ही माहिती दिली आहे. रिपोर्ट्सनुसार, सलमान खान जानेवारीमध्ये या चित्रपटासाठी कॅमिओ शूट करणार आहे. सलमान फक्त एक दिवस शूट करणार आहे. या चित्रपटात तो सुपरस्टार सलमान खानच्या भूमिकेत दिसणार आहे.

सनी देओलसोबत शूट करण्यासाठी सलमान खूप उत्सुक आहे. सलमान खान आणि सनी देओलला एकत्र स्क्रिन शेअर करताना पाहण्यासाठी त्यांचं चाहते उत्सुक आहेत. या दोन्ही स्टार्सचे चाहते आता या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत आहेत. विशाल राणा 'सफर' या चित्रपटाची निर्मिती करत आहेत. 2024 च्या अखेरीस हा चित्रपट मोठ्या पडद्यावर प्रदर्शित होऊ शकतो. या चित्रपटाच्या शूटिंगनंतर सनी देओल लाहोर: 1947 च्या शूटिंगला सुरुवात करू शकतो. 
 

Web Title: Tiger 3 star salman khan to make a cameo role in gadar 2 fame sunny deol next movie shooting start in january

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.