​बढो बहू या मालिकेत प्रिन्स नरूलाच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसणार युविका चौधरी

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 7, 2017 16:30 IST2017-03-07T11:00:31+5:302017-03-07T16:30:31+5:30

बढो बहू ही मालिका सध्यांच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. कोणतीही मालिका म्हटली की, त्यात सुंदर दिसणारी फिट अभिनेत्री आपल्याला ...

Yuvika Chaudhary will be seen in the role of Prince Naoro's sister in this series of Big Show | ​बढो बहू या मालिकेत प्रिन्स नरूलाच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसणार युविका चौधरी

​बढो बहू या मालिकेत प्रिन्स नरूलाच्या बहिणीच्या रोलमध्ये दिसणार युविका चौधरी

ो बहू ही मालिका सध्यांच्या मालिकांपेक्षा खूप वेगळी आहे. कोणतीही मालिका म्हटली की, त्यात सुंदर दिसणारी फिट अभिनेत्री आपल्याला पाहायला मिळते. पण बढो बहू या मालिकेतील नायिका ही अतिशय स्थूल असून त्या गोष्टीबाबत तिला काहीही वाटत नाही. या मालिकेच्या कथेमुळे प्रेक्षकांना ही मालिका खूप आवडत आहे. या मालिकेत आता एक नवी एंट्री होणार आहे.
प्रिन्स नरूला आणि युविका चौधरी हे गेल्या अनेक वर्षांपासून एकमेकांचे खूप चांगले फ्रेंड्स आहेत. केवळ त्यांच्यात मैत्रीच नाही तर त्यांच्यात अफेअर असल्याचे म्हटले जाते. त्यांच्या अफेअरच्या चर्चा नेहमीच मीडियात रंगत असते. आता हे दोघे एका मालिकेत एकत्र दिसणार असल्याची चर्चा आहे आणि खऱ्या आयुष्यात प्रियकर-प्रेयसी असलेले प्रिन्स आणि युविका या मालिकेत भाऊ-बहिणीच्या भूमिकेत झळकणार आहेत. 
बढो म्हणजेच रायस्था राठोड आणि लकी म्हणजेच प्रिन्स नरूला यांच्या केमिस्ट्रीमुळे या मालिकेला प्रेक्षकांची चांगलीच पसंती मिळत आहे. या मालिकेच्या कथानकाला नेहमीच नवी वळणे मिळत असतात. आता या मालिकेत प्रिन्सच्या बहिणीची एंट्री होणार आहे. या मालिकेत आता युविका चौधरी येणार असल्याचे म्हटले जात आहे. ती या मालिकेच प्रिन्सच्या चुलत बहिणीची भूमिका साकारणार आहे. बढो आणि लकीमध्ये निर्माण झालेला दुरावा कमी करण्यासाठी ही नवी व्यक्तिरेखा मालिकेत आणण्यात येणार आहे. युविका या भूमिकेला योग्य न्याय देऊ शकेल अशी मालिकेच्या टीमला खात्री असल्याचे कळतेय.
युविकाने या मालिकेबाबत प्रतिक्रिया देण्यास नकार दिला असला तरी तिची एंट्री झाल्यानंतर प्रिन्स आणि तिला बहीण-भावाच्या रूपात पाहाणे इंटरेस्टिंग होणार आहे.  


Web Title: Yuvika Chaudhary will be seen in the role of Prince Naoro's sister in this series of Big Show