'वीर की अरदास वीरा' मालिकेचा दिग्दर्शक वसीम सबीर यांचे निधन

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 4, 2017 11:51 IST2017-01-04T11:45:01+5:302017-01-04T11:51:30+5:30

नवीन वर्षाच्या सुरूवातीलचा टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे.'वीर की अरदास वीर' या मालिकेचे दिग्दर्शक वसीम सबीरचं निधन झालंय.घरातच त्याचा ...

Wasim Sabeer, director of 'Veer ki Ardas Veera' series, passed away | 'वीर की अरदास वीरा' मालिकेचा दिग्दर्शक वसीम सबीर यांचे निधन

'वीर की अरदास वीरा' मालिकेचा दिग्दर्शक वसीम सबीर यांचे निधन

ीन वर्षाच्या सुरूवातीलचा टीव्ही जगतात शोककळा पसरली आहे.'वीर की अरदास वीर' या मालिकेचे दिग्दर्शक वसीम सबीरचं निधन झालंय.घरातच त्याचा पाय घसरला आणि त्यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली हॉस्पिटलला नेईपर्यंतच त्यांची प्राणज्योत मालवली होती.ही बातमी कळताच टीव्ही जगतात शोका कळा पसरली आहे.अनेकांनी ट्वीटरवर वसीम यांच्याशी निगडीत आठवणी शेअर करत श्रध्दांजली वाहिली आहे.काही दिवसांपूर्वीच फिल्म प्रोड्युसर अबीस रिजवी यांचेही इस्तानबुल मध्ये झालेल्या आतंकी हल्ल्यात मृत्यु झाला.त्यापोठापाठ आता ही दुसरी दु:खद घटना घडली असून टिव्ही दिग्दर्शक वसीम सबीर यांच्या जाण्याने अनेकांना विश्वासही बसत नाहीय.टीव्ही जगतात वसीम सबीर यांचे योगदानही मोलाचे होते.'इस प्यार को क्या नाम दुँ', 'वीरा','तमन्ना', 'गंगा' या सुपरहिट ठरलेल्या मालिकेचेही दिग्दर्शन वसीम सबीर यांनीच केले होते.

  

Web Title: Wasim Sabeer, director of 'Veer ki Ardas Veera' series, passed away