६ महिन्यांची गरोदर अभिनेत्री जीममध्ये करतेय वर्कआऊट, ४२व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ व्हायरल
By कोमल खांबे | Updated: May 5, 2026 11:22 IST2026-05-05T11:21:49+5:302026-05-05T11:22:28+5:30
प्रेग्नंसीमध्येही करिश्माने वर्कआऊट करणं सोडलेलं नाही. तिच्या सोशल मीडियावरुन जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

६ महिन्यांची गरोदर अभिनेत्री जीममध्ये करतेय वर्कआऊट, ४२व्या वर्षी होणार आई, व्हिडीओ व्हायरल
टीव्ही अभिनेत्री करिश्मा तन्ना हिने काही दिवसांपूर्वीच चाहत्यांना आई होणार असल्याची गुडन्यूज दिली. करिश्मा ४२व्या वर्षी तिच्या पहिल्या बाळाला जन्म देणार आहे. करिश्मा तिच्या फिटनेसकडे खूप काटेकोरपण लक्ष देताना दिसते. प्रेग्नंसीमध्येही तिने वर्कआऊट करणं सोडलेलं नाही. करिश्माने तिच्या सोशल मीडियावरुन जीममध्ये वर्कआऊट करतानाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.
या व्हिडीओमध्ये ६ महिन्यांची गरोदर करिश्मा जीममध्ये हेवी वर्कआऊट करताना दिसत आहे. "Monday motivation !!! Legs day baby", असं कॅप्शन तिने या व्हिडीओला दिलं आहे. प्रेग्नंट करिश्माचा जीममध्ये व्यायाम करतानाचा व्हिडीओ पाहून चाहतेही आश्चर्यचकित झाले आहेत. "तुमच्याकडून प्रेरणा मिळत आहे", "जीम गर्ल", "खूप छान", अशा कमेंट करत करिश्माचं चाहते कौतुक करत आहेत. करिश्माचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरलही झाला आहे.
करिश्माने उद्योगपती वरुण बंगेरासोबत २०२२ मध्ये लग्नगाठ बांधली. त्याआधी काही वर्ष ते एकमेकांना डेट करत होते. आता लग्नानंतर ४ वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नव्या पाहुण्याचं आगमन होणार आहे. करिश्माला मातृत्वाची चाहुल लागली असून ती आई होण्यासाठी उत्सुक आहे. ऑगस्ट २०२६मध्ये करिश्मा तिच्या पहिल्या बाळाला जन्म देईल.