पलक मुच्छाल गाणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेचे शीर्षकगीत

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 24, 2017 15:18 IST2017-03-24T09:48:20+5:302017-03-24T15:18:20+5:30

दिया और बाती हम हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाची लोकप्रियता ...

The title of the series, Suraj I Sahe Piyaaji | पलक मुच्छाल गाणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेचे शीर्षकगीत

पलक मुच्छाल गाणार तू सुरज मैं साझ पियाजी या मालिकेचे शीर्षकगीत

या और बाती हम हा कार्यक्रम प्रचंड गाजला होता. या कार्यक्रमाने काही महिन्यांपूर्वी प्रेक्षकांचा निरोप घेतला. या कार्यक्रमाची लोकप्रियता पाहाता या कार्यक्रमाचा दुसरा सिझन निर्मात्यांनी प्रेक्षकांच्या भेटीस आणला आहे. या कार्यक्रमाचे नाव तू सुरज मैं साझ पियाजी असे असून या कार्यक्रमात प्रेक्षकांना सगळे नवे कलाकार पाहायला मिळत आहेत. या मालिकेचे टायटल साँग प्रसिद्ध गायिका पलक मुच्छाल गाणार आहे. पलकने शास्त्रीय संगीताचे शिक्षण घेतले असून ती केवळ चार वर्षांची असताना गायला लागली. तिने आतापर्यंत 17 भाषांमध्ये गाणे गायले आहे. पलक आणि तिचा भाऊ गेल्या अनेक वर्षांपासून स्टेज शो करत असून यातून येणारा पैसा ते गरजूंना उपचारासाठी देतात.
आशिकी2, एक था टायगर, किक, अॅक्शन जॅक्सन, प्रेम रतन धन पायो, एमएस धोनीः द अल्टोल्ड स्टोरी यांसारख्या चित्रपटांमधील तिची गाणी गाजली आहेत. ती सध्या चित्रपटांची गाणी गाण्यात व्यग्र असली तरी तिने वेळ काढून तू सुरज मैं सांझ पियाजी या गाण्याचे शीर्षकगीत गायले आहे. दिया और बाती हम या कार्यक्रमाचे शीर्षकगीत लोकांना प्रचंड आवडले होते. तू सुरज मैं सांझ पियाजी या गाण्याचे टायटल साँगदेखील प्रेक्षकांना आवडेल अशी पलकला खात्री आहे. या तिच्या गाण्याच्या शीर्षकाबाबत ती खूपच उत्सुक आहे. ती सांगते, "या प्रसिद्ध मालिकेचा भाग व्हायला मला प्रचंड आनंद होत आहे. मला शीर्षकगीतासाठी विचारले असता नकार देण्यास माझ्याकडे कोणतेही कारण नव्हते. या गाण्यामुळे मी अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचू शकणार आहे. या मालिकेचे शीर्षकगीत माझ्या आवाजासाठी ओळखले जाणार आहे यासारखी सुंदर भावना कोणती असू शकत नाही. या प्रोजेक्टसाठी माझी निवड करण्यात आली यासाठी मी मालिकेच्या टीमची आभारी आहे. मी खूप खूश असून माझे सर्वोत्तम देईल याची मला खात्री आहे." 

Web Title: The title of the series, Suraj I Sahe Piyaaji