​टायगर श्रॉफने डान्स चॅम्पियन्समधील ‘वाइल्ड रिपर्स’साठी दिला खास संदेश!

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 10, 2017 12:53 IST2017-11-10T07:23:58+5:302017-11-10T12:53:58+5:30

‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा  कार्यक्रम सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला ...

Tiger Shroff has given special message for 'Wild Ripper' in Dance Champions! | ​टायगर श्रॉफने डान्स चॅम्पियन्समधील ‘वाइल्ड रिपर्स’साठी दिला खास संदेश!

​टायगर श्रॉफने डान्स चॅम्पियन्समधील ‘वाइल्ड रिपर्स’साठी दिला खास संदेश!

्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ हा  कार्यक्रम सध्या प्रेक्षकांची मने जिंकत आहे. या कार्यक्रमात एकाहून एक सरस नृत्य प्रेक्षकांना पाहायला मिळत आहेत. ‘डान्स चॅम्पियन्स’ या कार्यक्रमात नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमांचे विजेते आणि उपविजेते यांच्यातील स्पर्धा आपल्याला पाहायला मिळत आहे. या कार्यक्रमातील अटीतटीच्या स्पर्धेत जो विजयी ठरेल, तो देशातील सर्वोत्कृष्ट नर्तक ठरणार आहे. या सगळ्याच स्पर्धकांनी अनेक रिअॅलिटी शो मध्ये भाग घेतला आहे. त्यामुळे हे सगळेच स्पर्धक एकमेकांना तगडी टक्कर देत आहेत.
‘स्टार प्लस’वरील ‘डान्स चॅम्पियन्स’ या नृत्यविषयक रिअ‍ॅलिटी कार्यक्रमात टेरेन्स आणि रेमो डिसुझा हे आपल्याला परीक्षकाच्या भूमिकेत पाहायला मिळत आहेत. ते दोघे अनेक वर्षांनंतर एकत्र काम करत आहेत. रेमो आणि टेरेन्स खूपच चांगल्या प्रकारे सगळ्या स्पर्धकांचे मार्गदर्शन करत असल्याने स्पर्धक खूप चांगले परफॉर्मन्स सादर करत आहेत. हा कार्यक्रम सुरू होऊन काही आठवडे झाले असून या स्पर्धकांचा आता एक चाहता वर्ग देखील बनला आहे. त्यांचे चाहते सोशल मीडियाच्या मार्फत त्यांना त्यांच्या आवडत्या स्पर्धकांचा डान्स किती आवडला हे आवर्जून सांगत आहेत. या कार्यक्रमातील वाइल्ड रिपर्स हा ग्रुप खूपच चांगला डान्स करतो. त्यामुळे अनेकजण त्यांचे चाहते आहेत. सामान्य लोक तर वाइल्ड रिपर्सचे चाहाते आहेत. पण त्याचसोबत टायगर श्रॉफ देखील या ग्रुपचा चाहाता आहे आणि त्यानेच ही गोष्ट नुकतीच डान्स चॅम्पियन्सच्या संपूर्ण टीमला सांगितली आहे. टायगरने एका व्हिडिओच्या द्वारे हा मेसेज वाइल्ड रिपर्सना दिला. टायगरने हे सांगितल्यावर वाइल्ड रिपर्समधील सगळेच प्रचंड खूश झाले. बॉलिवूडचा हा लाडका नृत्यकुशल अभिनेता केवळ वाइल्ड रिपर्सचा चाहता असल्याचे जाहीर करून थांबला नाही, तर त्याने त्यांच्यासाठी एक खास संदेशही दिला. त्यामुळे वाइल्ड रिपर्सचे मनोबल वाढून त्यांचा आत्मविश्वासही दुणावला.
वाइल्ड रिपर्सच्या वी-बोइंग पदन्यास हा टायगरच्या मार्शल आर्टसच्या मूव्हशी बराचसा मिळताजुळता आहे. त्यामुळे टायगरने त्यांना पाठवलेल्या संदेशात त्यांचे अभिनंदन करून त्यांना पुढील स्पर्धेसाठी शुभेच्छाही दिल्या. त्यांना शुभेच्छा देण्यासाठी या कार्यक्रमात उपस्थित राहण्याची इच्छाही त्याने व्यक्त केली. परंतु आपल्या काही वैयक्तिक कामामुळे तो उपस्थित राहू शकला नाही असे त्याने यावेळी सांगितले. 

Also Read : रिध्दिमाला राघवचा येतो राग,जाणून घ्या कारण?

Web Title: Tiger Shroff has given special message for 'Wild Ripper' in Dance Champions!