Supriya Pathare : अभिनय नाही तर निवडलं वेगळं क्षेत्र! दिग्गज अभिनेत्री सुप्रिया पाठारेंचा लेक विकतो पावभाजी...!

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 18, 2022 08:00 IST2022-07-18T08:00:00+5:302022-07-18T08:00:02+5:30

Supriya Pathare : होय, सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीरने अभिनयाच्या माने न लागत पावभाजीच छोटंसं हॉटेल उघडलं आहे.

thipkyanch rangoli fame supriya pathare son mihir pathare started food truck | Supriya Pathare : अभिनय नाही तर निवडलं वेगळं क्षेत्र! दिग्गज अभिनेत्री सुप्रिया पाठारेंचा लेक विकतो पावभाजी...!

Supriya Pathare : अभिनय नाही तर निवडलं वेगळं क्षेत्र! दिग्गज अभिनेत्री सुप्रिया पाठारेंचा लेक विकतो पावभाजी...!

विनोदी म्हणा, नकारात्मक म्हणा, गंभीर म्हणा अशा वेगवेगळ्या भूमिका साकारणाऱ्या अभिनेत्री सुप्रिया पाठारे  (Supriya Pathare) यांची नव्यानं ओळख करून देण्याची गरज नाही. हसऱ्या आणि बोलक्या चेहऱ्याच्या सुप्रिया सध्या त्या ‘ठिपक्यांची रांगोळी’ (Thipkyanch Rangoli) या मालिकेत पाहायला मिळत आहेत. अर्थात इथपर्यंतचा प्रवास सोपा नव्हता. चार भावंडात सगळ्यात थोरल्या असल्याने सुप्रियांनी कधीकाळी चक्क लोकांच्या घरची भांडी घासली. पण आज आम्ही सुप्रिया यांच्याबद्दल नाही तर त्यांच्या लेकाबद्दल सांगणार आहोत.

होय, सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे हा अभिनय क्षेत्रात नाही तर एका वेगळ्या क्षेत्रात आपलं नशीब आजमावत आहेत.   ग्लॅमर दुनियेत न येता हॉटेल व्यवसायात तो आपलं नशीब आजमावतो आहे. सुप्रिया पाठारे यांचा मुलगा मिहीर पाठारे हा शेफ आहे. प्रसिद्ध शेफ संजीव कपूर यांच्या ‘खाना खजाना’ या शोमध्ये त्याने सहभाग दर्शवला होता. काही काळ तो अमेरिकेतही शेफ म्हणून कार्यरत होता.मात्र आता भारतात परतला आहे आणि भारतात त्याने स्वत:चा फूड ट्रक सुरू केला आहे.

मिहीर व त्याचा मित्र आदेश वाघमारे यांनी मिळून 'मharaj’ नावाने फूड ट्रक सुरू केला आहे.  ठाण्यात पोखरण रोड नंबर २, बिरसा मुंडा चौकाजवळ, कोकणीपाडा ठाणे पश्चिम येथे या फूड ट्रकमध्ये  खवय्यांना अस्सल पावभाजीची चाखता येणार आहे. मिहिरला या व्यवसायानिमित्त मराठी सेलिब्रिटींनी भरभरून शुभेच्छा दिल्या आहेत.

सुप्रिया पाठारे यांनी मराठी चित्रपट, मालिकांमधून विविधांगी भूमिका साकारल्या आहेत. सध्या त्या स्टार प्रवाहवरील ‘ठिपक्यांची रांगोळी’ या मालिकेत  माईची भूमिका निभावत आहेत.  अनेक मालिका, रिअ‍ॅलिटी शोमध्ये झळकलेल्या सुप्रिया पाठारे यांनी उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात हक्काचं स्थान निर्माण केलं. विनोदी,नकारात्मक वा गंभीर कोणतीही भूमिका असली तरी सुप्रिया पाठारे त्या भूमिका लिलया पार पाडतात. 
आज अभिनयाच्या जोरावर यश, प्रसिद्धी अनुभवणाºया या अभिनेत्रीने एकेकाळी प्रचंड हालाखीचे दिवस पाहिले आहेत. सुप्रिया पाठारे यांच्याप्रमाणेच त्यांची सख्खी बहीणदेखील मराठी कलाविश्वात कार्यरत आहे. अभिनेत्री अर्चना नेवरेकर व सुप्रिया पाठारे या दोघी बहिणी आहेत.

Web Title: thipkyanch rangoli fame supriya pathare son mihir pathare started food truck