पितळ उघडं पडल्यानंतर 'ठरलं तर मग'मधून प्रियाचा पत्ता कट? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 15, 2026 14:52 IST2026-05-15T14:51:50+5:302026-05-15T14:52:26+5:30

प्रियाचा 'ठरलं तर मग'मधून पत्ता कट होणार का? नंतर मालिकेत प्रिया हे पात्र दिसणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 'ठरलं तर मग'मध्ये प्रिया हे पात्र साकारणाऱ्या प्रियांका तेंडोलकरने यावर उत्तर दिलं आहे. 

tharal tar mag fame priyanka tendolkar break silence on exit of her role from show | पितळ उघडं पडल्यानंतर 'ठरलं तर मग'मधून प्रियाचा पत्ता कट? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली...

पितळ उघडं पडल्यानंतर 'ठरलं तर मग'मधून प्रियाचा पत्ता कट? अभिनेत्रीने सांगूनच टाकलं, म्हणाली...

'ठरलं तर मग' ही स्टार प्रवाह वाहिनीवरील टीआरपीच्या शर्यतीत अव्वल असणारी मालिका. या मालिकेत लवकरच सायली आणि अर्जुन मिळून प्रियाचं पितळ उघडं पाडणार आहेत. प्रियाचा खरा चेहरा सगळ्यांसमोर येणार असून ती खरी तन्वी नसल्याचंही सिद्ध होणार आहे. पण, त्यानंतर प्रियाचा 'ठरलं तर मग'मधून पत्ता कट होणार का? नंतर मालिकेत प्रिया हे पात्र दिसणार की नाही? असा प्रश्न चाहत्यांना पडला आहे. 'ठरलं तर मग'मध्ये प्रिया हे पात्र साकारणाऱ्या प्रियांका तेंडोलकरने यावर उत्तर दिलं आहे. 

प्रियाने महाराष्ट्र टाइम्सला दिलेल्या मुलाखतीत याबद्दल भाष्य केलं. "प्रियाचं कॅरेक्टर किंवा ट्रॅक संपत नाहीये. कारण ती अजूनही अश्विन सुभेदारची बायको आहे. त्यामुळे हे पात्र संपणार नाही. तिला शिक्षा होणार का? तर हो. तिला शिक्षा होणार. पण शिक्षा झाल्यानंतर पुढे काय होतं, हे येत्या एपिसोडमध्ये पाहायला मिळेल. पण माझं कॅरेक्टर संपत नाही इतकं मात्र नक्की. अजून बऱ्याच इंटरेस्टिंग गोष्टी आम्ही मालिकेत घेऊन येणार आहोत", असं प्रियाने सांगितलं. 


'ठरलं तर मग' या मालिकेत प्रियांका तेडोंलकर प्रिया हे खलनायिकेचं पात्र साकारत आहे. सुरुवातीपासूनच प्रियाने मोठ्या शिताफीने घरच्यांना सत्य दूर ठेवत तन्वी असल्याचं नाटक केलं. पण, आता तिचा खरा चेहरा समोर येणार आहे. सायली आणि अर्जुनच्या प्रयत्नांना अखेर यश मिळणार असून मालिकेत मोठा ट्विस्टही पाहायला मिळेल. प्रिया हे खलनायिकेचं पात्र साकारूनही प्रियांका तेडोंलकरला चाहत्यांचं प्रेम मिळत आहे. 

Web Title : 'ठरलं तर मग': क्या प्रिया बाहर होंगी? अभिनेत्री ने स्पष्ट की भूमिका।

Web Summary : 'ठरलं तर मग' में प्रिया का सच उजागर, लेकिन अभिनेत्री प्रियंका तेंडोलकर ने पुष्टि की कि उनका किरदार अश्विन की पत्नी के रूप में आगे भी जारी रहेगा, जिसमें और भी मोड़ आएंगे।

Web Title : 'Tharala Tar Mag': Will Priya be out? Actress clarifies role.

Web Summary : Priya's truth exposed in 'Tharala Tar Mag', but actress Priyanka Tendolkar confirms her character continues as Ashwin's wife with more twists ahead.