तेजश्री प्रधानच्या घरी झाली गणरायाची स्थापना; अभिनेत्रीने स्वत: तयार केलं मखर

By ऑनलाइन लोकमत | Published: September 19, 2023 12:03 PM2023-09-19T12:03:13+5:302023-09-19T12:03:51+5:30

Tejashri pradhan: तेजश्री आणि तिच्या भावंडांनी मिळून बाप्पासाठी घरी छान डेकोरेशन तयार केलं आहे.

tejashri-pradhan-welcomes-ganpati-bappa-at-home-shares-special-video | तेजश्री प्रधानच्या घरी झाली गणरायाची स्थापना; अभिनेत्रीने स्वत: तयार केलं मखर

तेजश्री प्रधानच्या घरी झाली गणरायाची स्थापना; अभिनेत्रीने स्वत: तयार केलं मखर

googlenewsNext

सध्या सगळीकडे गणेशोत्सवाचा मोठ्या थाटात जल्लोष साजरा केला जात आहे. सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांच्या घरी गणरायाचं आगमन झालं आहे. यामध्येच अभिनेत्री तेजश्री प्रधान (tejashri pradhan) हिच्या घरी सुद्धा बाप्पाचं आगमन झालं आहे. विशेष म्हणजे बाप्पासाठी तेजश्री आणि तिच्या कुटुंबियांनी घरीच मखर आणि डेकोरेशन केलं. याचा एक व्हिडीओ तिने इन्स्टाग्रामवर शेअर केला आहे. हा व्हिडीओ पाहून अनेकांनी तिच्यावर कौतुकाचा वर्षाव केला आहे.

तेजश्री कलाविश्वासह सोशल मीडियावरही कमालीची सक्रीय आहे. त्यामुळे तिच्या दैनंदिन जीवनात घडणाऱ्या अनेक गोष्टी ती चाहत्यांसोबत शेअर करत असते. यात नुकताच तिने बाप्पासाठी मखर करतांनाचा व्हिडीओ पोस्ट केला. यात ती आणि तिचं संपूर्ण कुटुंब डेकोरेशन करताना दिसत आहे. तेजश्रीने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये घरातील काही मंडळी लाकडाच्या पट्ट्या रंगवत आहेत. तर, काही जण पुठ्ठे कापून त्याचं डेकोरेशन करत आहेत.  काही ठिकाणी लायटिंग केली जात आहेत. हा व्हिडीओ शेअर करत तेजश्रीने , 'आम्ही बाप्पाच्या स्वागतासाठी अगदी तयार आहोत,' असं म्हटलं आहे.

दरम्यान, तेजश्री सध्या प्रेमाची गोष्ट या नव्या मालिकेत झळकत आहे. या मालिकेने पहिल्याच आठवड्यात टीआरपीमध्ये प्रथम स्थान पटकावलं. या मालिकेच्या निमित्ताने जवळपास ३ वर्षानंतर तेजश्रीने छोट्या पडद्यावर पदार्पण केलं आहे.

Web Title: tejashri-pradhan-welcomes-ganpati-bappa-at-home-shares-special-video

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.