n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: 12.8px; line-height: normal;">तनुश्री दत्ताची बहीण इशिता दत्ता सध्या रिश्तो का सौदागर-बाजीगर या मालिकेत प्रमुख भूमिका साकारत आहे. अभिनयक्षेत्रात येण्यापूर्वी इशिता काहीशी सांशक होती. पण तिच्या बहिणीने तिला नेहमीच या क्षेत्रात येण्यासाठी प्रोत्साहन दिलेले आहे. तनुश्री सध्या परदेशात राहात असल्याने इशिता आणि तिची खूपच कमी होत असते. पण तनुश्री फोन करून तिला नेहमीच मार्गदर्शन देत असते. तनुश्रीला इशिताचे या मालिकेतील काम खूपच आवडते. उगाचच कोणाचे कौतुक करणे हे तनुश्रीला पटत नाही. त्यामुळे तनुश्रीने माझे कौतुक करणे हे माझ्यासाठी खूपच महत्त्वाचे असल्याचे इशिता सांगते.