​‘सिरीयल क्वीन’ला धक्का !

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 9, 2016 10:58 IST2016-07-09T05:28:38+5:302016-07-09T10:58:38+5:30

छोट्या पडद्यावरील सिरीयल क्वीन एकता कपूरला झटका लागलाय. 25 जून ते 1 जुलै या आठवड्यात टीआरपी रेटिंग्समधून एकता कपूरची ...

'Sirial Queen' push! | ​‘सिरीयल क्वीन’ला धक्का !

​‘सिरीयल क्वीन’ला धक्का !

ट्या पडद्यावरील सिरीयल क्वीन एकता कपूरला झटका लागलाय. 25 जून ते 1 जुलै या आठवड्यात टीआरपी रेटिंग्समधून एकता कपूरची 'कवच' ही मालिका बाहेर पडलीय. या रेटिंग्समध्ये 'ये है मोहब्बते' अव्वल स्थानी आणि 'कुमकुम भाग्य' ही मालिका दुस-या स्थानावर आहे. या दोन्ही मालिकासुद्धा बालाजी टेलिफिल्म्सच्या असल्या तरी एकताच्या 'कवच' या नव्या मालिकेनं नागिनचं स्थान पटकावलं होतं. 'नागिन' ही मालिका छोट्या पडद्यावर सुपरहिट ठरली होती. नागिननं सलमान खानच्या 'बिग बॉस', कपिल शर्माच्या 'द कपिल शर्मा' शोलाही मागे टाकलं होतं. त्यामुळं 'नागिन' मालिकेचं अव्वल स्थान मिळवणा-या 'कवच' मालिकेची पीछेहाट म्हणजे स्मॉल स्क्रीन क्वीनसाठी मोठा झटकाच म्हणावा लागेल.

Web Title: 'Sirial Queen' push!