शिवानी बावकरची आता वाजणार 'लग्नाची पिपाणी', जाणून घ्या याबद्दल

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 4, 2021 13:14 IST2021-03-04T13:08:53+5:302021-03-04T13:14:03+5:30

शिवानी बावकर सोशल मीडियावरील पोस्टमुळे चर्चेत आली आहे.

Shivani Bawkar's 'Lagnachi Pipani' will be played now | शिवानी बावकरची आता वाजणार 'लग्नाची पिपाणी', जाणून घ्या याबद्दल

शिवानी बावकरची आता वाजणार 'लग्नाची पिपाणी', जाणून घ्या याबद्दल

'लागीर झालं जी' मालिकेत शिवानी बावकर हिने मोठ्या खुबीने शीतली ही भूमिका साकारली होती. या मालिकेत देसी अंदाज तिचा पाहायला मिळाला होता. शिवानी सोशल मीडियावर एक्टिव्ह असून ती ग्लॅमरस फोटोंमुळे चर्चेत येत असते. नुकतेच तिने सोशल मीडिया इंस्टाग्रामवर एक पोस्ट केली आहे. ज्यामुळे ती चर्चेत आली आहे. लवकरच तिची लग्नाची पिपाणी वाजणार आहे. 

आतापर्यंत लग्नाची अनेक गाणी आली, त्यातली काही प्रचंड लोकप्रियही झाली. आता त्यात आणखी एका नव्या गाण्याची भर पडणार आहे. मधुर मिलिंद शिंदे यांनी गायलेल्या आणि संगीतबद्ध केलेल्या "लग्नाची पिपाणी" या नव्या गाण्याचा म्युझिक व्हिडिओ लवकरच सप्तसूर म्युझिकच्या युट्यूब चॅनेलवर प्रदर्शित होत आहे.सचिन कांबळे आणि शिवानी बावकर ही नवी जोडी या गाण्यात दिसणार आहे.

म्युझिक व्हिडिओची निर्मिती सुधाकर फाळके आणि प्रकाश फाळके यांनी केली आहे. तर म्युझिक व्हिडिओचं दिग्दर्शन प्रकाश फाळके यांचं आहे.  दिनकर खाडे यांचं गीत मधुर मिलिंद शिंदे यांनी संगीतबद्ध करून गायलं आहे.

सचिन कांबळे यांनी नृत्य दिग्दर्शन, सुनीत गुरव यांनी छायांकन केलं आहे. अलिबाग , जुन्नर या ठिकाणी हा म्युझिक व्हिडिओ चित्रीत करण्यात आला आहे. 


अतिशय फ्रेश असे हे गाणे, उत्तम छायांकन प्रेक्षकांच्या नक्कीच पसंतीला उतरेल आणि लग्नाच्या सीझनमध्ये प्रत्येक लग्नात ही "लग्नाची पिपाणी" वाजेल यात शंका नाही.

Web Title: Shivani Bawkar's 'Lagnachi Pipani' will be played now