​शक्ती आनंद झळकणार गंगामध्ये

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 6, 2017 17:29 IST2017-01-06T17:29:55+5:302017-01-06T17:29:55+5:30

गंगा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती आनंद ...

Shakti will rejoice in the Ganges | ​शक्ती आनंद झळकणार गंगामध्ये

​शक्ती आनंद झळकणार गंगामध्ये

गा या मालिकेत प्रेक्षकांना एक नवी एंट्री लवकरच पाहायला मिळणार आहे. या मालिकेत छोट्या पडद्यावरचा प्रसिद्ध अभिनेता शक्ती आनंद एका महत्त्वाच्या भूमिकेत पाहायला मिळणार आहे. शक्तीची एंट्री झाल्यानंतर या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळणार आहे. या मालिकेत तो शिव झा ही व्यक्तिरेखा साकारणार आहे. सहा वर्षांच्या मुलीचा पिता आणि विदूर असलेल्या शिवला समाजात प्रचंड मान आहे. अतिशय श्रीमंत घरातील हा शिव आहे. शिवचे त्याच्या मुलीवर प्रचंड प्रेम आहे. त्याला तिच्यात त्याच्या पत्नीची झाक दिसते. यामुळे तो स्वतःपेक्षाही अधिक आपल्या मुलीची काळजी घेतो. शिव आणि गंगा भेटल्यावर त्यांच्या आयुष्यात काय काय बदल घडतात ते प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. या मालिकेविषयी शक्ती सांगतो, "गंगा या मालिकेतील निरंजन या भूमिकेसाठी मला विचारण्यात आले होते. पण त्यावेळी काही कारणांनी या मालिकेत काम करणे मला शक्य झाले नाही. पण यावेळी सगळ्या गोष्टी जुळून आल्या आणि मी या मालिकेचा भाग बनलो. माझ्या व्यक्तिरेखेमुळे पटकथेला संपूर्णपणे कलाटणी मिळणार आहे. त्यामुळे माझ्यासाठी ही भूमिका खूपच आव्हानात्मक आहे. या भूमिकेसाठी मी खूपच उत्सुक आहे." 
शक्तिने याआधी क्योंकी साँस भी कभी बहू थी, सारा आकाश यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. भारत का वीर पूत्र महाराणा प्रताप या मालिकेत प्रेक्षकांना शक्तीचे एक वेगळे रूप पाहायला मिळाले होते. शक्ती त्याची पत्नी सई देवधरसोबत नच बलिये या कार्यक्रमातही दिसला होता. या कार्यक्रमात त्याची नृत्यकलादेखील प्रेक्षकांना पाहायला मिळाली होती. 

Web Title: Shakti will rejoice in the Ganges