सान्वी तलवारचा आयफोन चोरला

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 25, 2016 20:04 IST2016-11-25T20:04:22+5:302016-11-25T20:04:22+5:30

‘चंद्र-नंंदिनी’ मालिकेत दुर्धरेची व्यक्तिरेखा साकारणाºया सान्वी तलवार हिचा सेटवरच ‘आयफोन-६ प्लस’ चोरीला गेल्याने ती निराश झाली आहे. सेटवरच ठेवलेला ...

Sawi swords ran thief's iPhone | सान्वी तलवारचा आयफोन चोरला

सान्वी तलवारचा आयफोन चोरला

ंद्र-नंंदिनी’ मालिकेत दुर्धरेची व्यक्तिरेखा साकारणाºया सान्वी तलवार हिचा सेटवरच ‘आयफोन-६ प्लस’ चोरीला गेल्याने ती निराश झाली आहे. सेटवरच ठेवलेला आयफोन अचानक गायब झाल्याने सगळ्यांनाच धक्का बसला. 



याविषयी सान्वीने स्वत:च माहिती देताना सांगितले की, सेटवर प्रकाशयोजनेचं काम सुरू होतं. मी माझा आयफोन पलंगावर ठेवला अन् मी शूटिंगची तयारी करीत होते. काही वेळानंतर जेव्हा मी मोबाईल बघण्यासाठी गेले तेव्हा तो तिथे नव्हता. सगळीकडे शोधाशोध घेतली तरी देखील मोबाईल  मिळाला नाही. अवघ्या काही सेकंदामध्येच मोबाइल चोरीला गेल्याने सर्वच आश्चर्यचकीत झाले. मोबाईल मिळत नसल्याने मी सेवटरच्या कर्मचाºयांना शोध घेण्यास सांगितले. मात्र काहीही उपयोग झाला नाही. 

मोबाईल हरविल्याचे दु:ख सान्वीला सारखे वाटत होते. तिला असे वाटत होते की, आपणच कुठेतरी हरवलो आहोत. कोणाशीही संपर्क साधण्यासाठी तिच्याकडे मोबाईलच नव्हता. अखेर सान्वीने याप्रकरणी नायगांव पोलीस ठाण्यात मोबाईल चोरीला गेल्याची तक्रार नोंदविली. 

Web Title: Sawi swords ran thief's iPhone