समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...'

By ऑनलाइन लोकमत | Published: August 9, 2023 09:47 AM2023-08-09T09:47:13+5:302023-08-09T09:48:31+5:30

क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत.

Sameer Wankhede revealed the reason behind the names of the twin girls ziya and zayda | समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...'

समीर वानखेडेंनी सांगितलं जुळ्या मुलींच्या नावामागचं कारण, म्हणाले, 'झिया अन् जायदा हे...'

googlenewsNext

मराठीतील एक आगळवेगळी जोडी म्हणजे अभिनेत्री क्रांती रेडकर (Kranti Redkar) आणि समीर वानखेडे (Sameer Wankhede) यांची. क्रांती लोकप्रिय अभिनेत्री, दिग्दर्शिका तर समीर वानखेडे हे एनसीबी अधिकारी. दोघांचं प्रोफेशन अगदीच वेगळं मात्र तरी त्यांची जोडी जमली. कॉर्डेलिया क्रूझ ड्र्ग्स प्रकरणामुळे समीर वानखेडे चर्चेत आले आणि ते कसे अधिकारी आहेत याची ओळख सर्वांना झाली. क्रांती आणि समीर यांना जुळ्या मुली आहेत. झिया आणि जायदा अशी त्यांची नावं का ठेवली यावरुन त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. यावर समीर वानखेडे यांनी उत्तर दिलं आहे.

टीव्हीवरील लोकप्रिय शो 'खुपते तिथे गुप्ते' मध्ये समीर वानखेडे यांनी हजेरी लावली होती. यामध्ये त्यांनी अगदी दिलखुलास गप्पा मारल्या. दरम्यान अवधूत गुप्तेने त्यांना मुलींच्या नावावरुन प्रश्न विचारला. ही नावं ठेवण्यामागचं कारण त्यांना विचारलं असता ते म्हणाले, 'माझ्या आईचं नाव जायदा होतं. तर जायदा हे नाव आत्यावरुन ठेवलं. आत्याचं नाव जायदा होतं. तिला कॅन्सर होता. मी तिच्या खूप जवळ होतो.'

क्रांती नेहमी तिच्या मुलींची मस्ती सोशल मीडियावरुन सांगत असते. तिने आजपर्यंत मुलींचा चेहरा दाखवलेला नाही. 2018 मध्ये तिने झिया आणि जायदा यांना जन्म दिला. ती त्यांना छबिल आणि गोदो या नावाने हाक मारते. पती समीर वानखेडे मध्यंतरी कॉर्डेलिया प्रकरणात अडकले होते. लाच घेतल्याचा आरोप त्यांच्यावर झाला. मात्र क्रांती सुरुवातीपासूनच पतीच्या मागे खंबीरपणे उभी आहे.

Web Title: Sameer Wankhede revealed the reason behind the names of the twin girls ziya and zayda

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.