भाईजानचं लाखमोलाचं घड्याळ! गोल्डन घड्याळ्यावर नेटकऱ्यांची खिळली नजर, किंमत ऐकून हैराण व्हाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 19, 2023 17:09 IST2023-02-19T17:08:05+5:302023-02-19T17:09:04+5:30

सुंबुल तौकीरने पोस्ट केलेल्या या फोटोत सलमानच्या हाताात गोल्डन घड्याळ दिसत आहे.

salman khans expensive watch photo viral see how much is it for | भाईजानचं लाखमोलाचं घड्याळ! गोल्डन घड्याळ्यावर नेटकऱ्यांची खिळली नजर, किंमत ऐकून हैराण व्हाल

भाईजानचं लाखमोलाचं घड्याळ! गोल्डन घड्याळ्यावर नेटकऱ्यांची खिळली नजर, किंमत ऐकून हैराण व्हाल

'बिग बॉस १६' चा फिनाले नुकताच पार पडला. एमसी स्टॅनने विजेतेपदावर नाव कोरले. यानंतर सर्व सदस्यांनी दिग्दर्शिका फराह खानच्या घरी जंगी पार्टीही केली.दरम्याने घरातील सदस्य सुंबुल तौकीरने सोशल मीडियावरसलमान खानसोबतचा एक गोड फोटो पोस्ट केला आहे. या फोटोत नेटकऱ्यांची नजर गेली ती थेट सलमान खानच्या घडाळ्यावर.

सुंबुल तौकीरने पोस्ट केलेल्या या फोटोत सलमानच्या हाताात गोल्डन घड्याळ दिसत आहे. तसेच सुंबुलच्या हातातही सारखंच घड्याळ दिसतंय. घड्याळ बघूनच किती महाग असेल याचा अंदाजा येत आहे. त्यामुळे नेटकऱ्यांनीही तर्कवितर्क लावायला सुरुवात केली आहे. सलमानच्या या घड्याळाची किंमत ऐकलीत तर हैराणच व्हाल.

सलमान खानने घातलेले हे घड्याळ रोलेक्स कंपनीचं आहे. रोलेक्सचं हे yacht मॉडेल आहे. यात १८ कॅरेट सोन्याची केस लावण्यात आली आहे. घड्याळ्याची किंमत तब्बल २८ लाख ९० हजार इतकी आहे. तर याचीच बाजारातील सध्याती किंमत ३५ लाख रुपये आहे.

ऐकून धक्काच बसला असेल ना. इतकं कमावूनही साध्या राहणाऱ्या सलमानने एवढे महागडे घड्याळ घातले यावर खरंतर चाहत्यांचा विश्वासही बसणार नाही. विशेष म्हणजे सुंबुलनेही सारखंच घड्याळ घातल्याने हे कोणी गिफ्ट दिलं आहे का अशीही शक्यता नेटकऱ्यांनी व्यक्त केली आहे.

Web Title: salman khans expensive watch photo viral see how much is it for