Revealed: चर्चा तर होणारच म्हणून गेल्या 14 वर्षापासू लिव्ह इन मध्ये राहतात हे टीव्ही कपल?सत्य वाचून तुम्हाला बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Published: June 15, 2017 06:01 AM2017-06-15T06:01:09+5:302017-06-15T11:31:09+5:30

संदीप बसवाना आणि आश्लेषा सावंत हे दोन्ही टीव्ही कलाकार 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या मालिकेत भूमिका साकारत ...

Revealed: The last 14 years as the talk goes on, the TV is a live-in live-in? | Revealed: चर्चा तर होणारच म्हणून गेल्या 14 वर्षापासू लिव्ह इन मध्ये राहतात हे टीव्ही कपल?सत्य वाचून तुम्हाला बसेल धक्का

Revealed: चर्चा तर होणारच म्हणून गेल्या 14 वर्षापासू लिव्ह इन मध्ये राहतात हे टीव्ही कपल?सत्य वाचून तुम्हाला बसेल धक्का

googlenewsNext
दीप बसवाना आणि आश्लेषा सावंत हे दोन्ही टीव्ही कलाकार 'क्योंकी साँस भी कभी बहू थी' या मालिकेत भूमिका साकारत होते. संदिप हा साहिल नावाची व्यक्तिरेखा तर आश्लेषा गौतमची पत्नीची भूमिका साकारली होती. याच मालिकेच्या सेटवर या दोघांची मैत्री झाली आणि मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले. मग काय त्या दिवसांपासून हे दोघे एकत्र लिव्ह इन मध्ये राहत असल्याची कबलू खुद्द संदिपनेच दिली आहे.दोघेही  गेल्या 14 वर्षापासून लिव इन रिलेशनशीपमध्ये राहत आहेत.लिव-इन च्या इतक्या वर्षानंतरही त्यांचा लग्नाचा कोणताच विचार नाही.कुठल्याही बंधनाविना हे आजही एकमेकांसोबत खूश आहेत. एका मुलाखतीदरम्यान आश्लेषाने सांगितले की, लहान गावातून चित्रपटसृष्टीत आल्याने सर्वच जण तिला संदीपपासून दूर राहण्याचा सल्ला देत असत.नुकतेच जेव्हा संदीपला त्याच्या लग्नाच्या प्लॅनविषयी विचारण्यात आले तेव्हा तो म्हणाला, मी कधीच तिला तिच्यासोबत माझे पूर्ण आयुष्य घालवू इच्छितो असे म्हणणार नाही आणि तिनेसुद्धा सात जन्म सोबत राहण्याच्या आणाभाका घेतल्या नाहीत. आम्ही जोपर्यंत एकमेकांसोबत खूश आहोत तोपर्यंत सोबत राहू नाहीतर वेगळे होऊ हा सर्वस्वी आमच्या दोघांचा निर्णय आहे. आणि आम्हाला दोघांनाही एकत्र राहण्यात आनंद वाटतो त्यासाठी लग्न करण्याची गरज मला वाटत नाही. समाज काय विचार करेन आमच्याबद्दल या गोष्टीत अडकण्यापेक्षा आम्हाला दोघांना आमच्या या नात्याबद्दल काय वाटतं हे महत्त्वाचे आहे त्यामुळे लग्न हे बंधन असल्याचे मला वाटते असेही संदिपने सांगितले. 

Web Title: Revealed: The last 14 years as the talk goes on, the TV is a live-in live-in?

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.