या कारणामुळे रितू शिवपुरी होती अभिनयापासून दूर

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 17, 2017 12:35 IST2017-05-17T07:05:03+5:302017-05-17T12:35:03+5:30

रितू शिवपुरीने आँखे, हम सब चोर है, आर या पार, हद्द कर दी आपने, शक्तीः द पॉवर यांसारख्या नव्वदीच्या ...

For this reason, Ritu Shivpuri was away from acting | या कारणामुळे रितू शिवपुरी होती अभिनयापासून दूर

या कारणामुळे रितू शिवपुरी होती अभिनयापासून दूर

तू शिवपुरीने आँखे, हम सब चोर है, आर या पार, हद्द कर दी आपने, शक्तीः द पॉवर यांसारख्या नव्वदीच्या दशकातील अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. आँखे या चित्रपटातील रितूची गोविंदासोबतची जोडी चांगलीच गाजली होती. या चित्रपटातील रितूवर चित्रीत केले गेलेले लाल दुप्पटे वाली हे गाणे प्रेक्षकांना आजही स्मरणात आहे. रितूने 2006 साली काही मालिकांमध्ये काम केले आहे. पण दिवसातील 18-20 तास चित्रीकरण करणे तिला शक्य नव्हते. या सगळ्यामुळे तिला तिच्या कुटुंबियांना वेळ देता येत नव्हते आणि त्याच्यात तिच्या नवऱ्याला ट्यूमर झाल्यामुळे ते बिछान्याला खिळले. त्यामुळे तिने मालिकांमध्ये काम करणे बंद केले होते आणि रितू याकाळात त्यांच्या पाठिशी उभी राहिली आणि त्यातून त्यांना तिने बाहेर काढले. आता ती अनेक वर्षांनंतर छोट्या पडद्यावर पुनरागमन करतआहे. 
इस प्यार को क्या नाम दू या मालिकेच्या यशानंतर इस प्यार को क्या नाम दूँचा दुसरा भाग आला होता. पण पहिल्या भागात प्रेक्षकांना बरुण सोबती आणि सान्या इराणीची जोडी पाहायला मिळाली होती. ही जोडी प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. पण दुसऱ्या सिझनमध्ये ही जोडी प्रेक्षकांना न दिसल्याने त्यांनी या मालिकेकडे पाठ फिरवली होती. आता प्रेक्षकांना या मालिकेचा तिसरा सिझन पाहायला मिळणार असून तिसऱ्या सिझनमध्ये बरुण सोबती प्रमुख भूमिकेत दिसणार आहे तर शिवानी तोमर त्याच्या नायिकेची भूमिका बजावणार आहे. शिवानी तोमरच्या आईची भूमिका रितू शिवपुरी साकारणार आहे. या मालिकेत रितू खलनायिकेच्या भूमिकेत दिसणार आहे. तिचा या मालिकेतील लूक हा खूप ग्लॅमरस असून तिच्या या आधीच्या चित्रपटांमधील लूकपेक्षा या मालिकेतील लूक खूपच वेगळा असणार आहे.
रितू शिवपुरी ही प्रसिद्ध अभिनेत्री सुधा शिवपुरी आणि ओम शिवपुरी यांची मुलगी आहे. सुधा शिवपुरी यांनी क्योंकी साँस भी कभी बहू थी या मालिकेत बा ची व्यक्तिरेखा साकारली होती तर ओम शिवपुरी या सत्तरीच्या अनेक चित्रपटांमध्ये काम केले आहे. 

Web Title: For this reason, Ritu Shivpuri was away from acting