संगीत सम्राट देणार संगीताची आवड असलेल्या लोकांना संधी
By ऑनलाइन लोकमत | Updated: May 5, 2017 16:54 IST2017-05-05T11:24:49+5:302017-05-05T16:54:49+5:30
ताल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी ...
.jpg)
संगीत सम्राट देणार संगीताची आवड असलेल्या लोकांना संधी
त ल, लय व स्वर यांच्या त्रिवेणी संगमातूनच संगीत जन्माला येते. भारतात हजारो वर्षांपासून संगीताची परंपरा आहे. त्यामुळे भारतीयांचे संगीताशी आगळेवेगळे नाते जुळले आहे. प्रतिभा, अभिरुची आणि परिश्रम घेणाऱ्या कलाकाराला संगीत क्षेत्रात यशाची उंच भरारी सहज घेता येते. मात्र, या दिशेने कारकिर्दीची वाटचाल सुरू करण्यासाठी भरपूर अभ्यास आणि सरावाची आवश्यकता असते आणि त्याच बरोबर एका मोठ्या संधीची आणि व्यासपीठाची गरज असते आणि हीच संधी झी युवा प्रेक्षकांना देणार आहे.
गेल्या काही वर्षामध्ये नव्या दमाचे अनेक प्रतिभावान कलाकार मराठी चित्रपटसृष्टीला मिळाले आहेत. महाराष्ट्राभर आजही असंख्य कलाकार केवळ एका संधीची, एका व्यासपीठाची वाट पाहात आहेत. अशा कलाकारांना व्यासपीठ मिळवून देण्यासाठी संगीत सम्राट हा कार्यक्रम लवकरच येत आहे.
संगीत सम्राटमध्ये संगीतमय माणसाचा शोध, माणसातील संगीताचा शोध घेतला जाणार आहे. हा कार्यक्रम केवळ गायकांसाठी नाहीये तर कोणत्याही वाद्द्यापासून, वस्तूपासून किंवा तोंडाने आवाज काढून सुमधुर संगीताची निर्मिती करू शकणाऱ्या कलाकारांसाठी हा कार्यक्रम आहे. या कार्यक्रमात मुख्यतः गायन, वाद्य वाजवणे, तोंडाने आवज काढून संगीत बनवणे असे परफॉर्मन्स प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. या कार्यक्रमात तुम्ही एकट्याने किंवा समुहानाने सहभागी होऊ शकता. त्यामुळे ढोलपथके, बँड, गावागावातील संगीत या कार्यक्रमात प्रेक्षकांना पाहायला मिळेल.
या कार्यक्रमाच्या ऑडिशन्स ३ मे पासून महाराष्ट्रातील वेगवेगळ्या शहरांमध्ये सुरू झाल्या आहेत. झी युवाच्या संगीत सम्राट या टॅलेन्ट हंट कार्यक्रमात प्रसिद्ध अभिनेत्री क्रांती रेडकर आणि नावाजलेले गायक आदर्श शिंदे हे परीक्षकाच्या भूमिकेत दिसणार आहेत तर रोहित राऊत या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन करणार आहे.