या केवळ अफवा

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 25, 2016 16:33 IST2016-08-25T11:03:52+5:302016-08-25T16:33:52+5:30

ये है मोहोब्बते या मालिकेत रमणची भूमिका साकारणारा करण पटेल ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी करणने ...

This is only rumor | या केवळ अफवा

या केवळ अफवा

n style="color: rgb(34, 34, 34); font-family: arial, sans-serif; font-size: small; line-height: normal;">ये है मोहोब्बते या मालिकेत रमणची भूमिका साकारणारा करण पटेल ही मालिका सोडणार असल्याची चर्चा होती. काही दिवसांपूर्वी करणने इन्स्टाग्राम या सोशल नेटवर्किंग साईटवर स्वतःचा फोटो पोस्ट करून आरकेबी हो ना हो... द शो मस्ट गो ऑन असे लिहिले होते. त्यामुळे त्याने ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतला अाहे अशा अफवांना ऊत आले होते. पण तो ही मालिका सोडणार नसल्याचे त्याने स्वतः स्पष्ट केले आहे. करण सांगतो, "माझे या मालिकेवर प्रचंड प्रेम असल्यानेच मी ही पोस्ट टाकली होती. या मालिकेने मला खऱ्या अर्थाने प्रसिद्धी मिळवून दिली. त्यामुळे या मालिकेनंतरही माझ्या फॅन्सशी असलेले माझे नाते कायम असणार असल्याचे मला या पोस्टद्वारे म्हणायचे होते."

Web Title: This is only rumor