​नारायणी शास्त्री झळकणार चक्रव्यूह या मालिकेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 6, 2017 15:26 IST2017-06-06T09:56:41+5:302017-06-06T15:26:41+5:30

नारायणी शास्त्रीने पिया का घर, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले ...

Narayani Shastri will be seen in the series Chakravyuh | ​नारायणी शास्त्री झळकणार चक्रव्यूह या मालिकेत

​नारायणी शास्त्री झळकणार चक्रव्यूह या मालिकेत

रायणी शास्त्रीने पिया का घर, क्योंकी साँस भी कभी बहू थी, कोई अपना सा, कुसूम यांसारख्या मालिकांमध्ये काम केले आहे. या मालिकेतील तिच्या भूमिका चांगल्याच गाजल्या होत्या. गेल्या काही वर्षांत नारायणीने छोट्या पडद्यावर तिचे चांगलचे प्रस्थ निर्माण केले आहे. गेल्या वर्षी तिने पिया रंगरेज या मालिकेत काम केले होते. या मालिकेतील तिची भूमिका लोकप्रिय झाली होती.
आता नारायणी चक्रव्यूह या मालिकेत झळकणार आहे. चक्रव्यूह या मालिकेची कथा ही खूप वेगळी असून प्रेक्षकांना माय-लेकीची कथा या मालिकेत पाहायला मिळणार आहे. या मालिकेत माय-लेकींमधील कडवट कथा गुंफण्यात आली असून कथानक एका शाही औद्योगिक घराण्याशी संबंधित आहे. या मालिकेत नारायणी महत्त्वाची भूमिका साकारणार आहे. 
चक्रव्यूह या मालिकेत नारायणी सत्रुपा ही भूमिका साकारणार असून ती राजमाता असल्याचे आपल्याला पाहायला मिळणार आहे. या मालिकेतील तिची वेशभूषा देखील खूप वेगळी असणार आहे. सत्रुपा ही अतिशय खंबीर आणि कठोर मनाची स्त्री असून आपल्या मुलाचे रक्षण करण्यासाठी ती कोणत्याही थराला जाऊ शकते असे प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. 
सत्रुपा आपल्या घरातील सारे निर्णय स्वतः घेते. आपल्या निर्णयात कोणी ढवळाढवळ केलेली तिला आवडत नाही. नारायणी ही एक उत्कृष्ट अभिनेत्री असल्याने या मालिकेतील भूमिका तीच खूप चांगल्या प्रकारे साकारू शकते अशी या मालिकेच्या दिग्दर्शक आणि निर्मात्यांना खात्री आहे. 
चक्रव्यूह ही आपल्या सावत्र पालकांकडून प्रेमाची अपेक्षा करणाऱ्या मुलीची ही कथा आहे. ही मुलगी लहान असतानाच तिच्या पालकांनी तिचा त्याग केलेला आहे. 

Web Title: Narayani Shastri will be seen in the series Chakravyuh