नागिन स्टार अर्जुन आता करणार टशन-ए-इश्क

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 17, 2016 13:34 IST2016-06-17T08:04:21+5:302016-06-17T13:34:21+5:30

'नागिन' या मालिकेत रितीक ही भूमिका साकारणा-या अर्जुन बिजलानीची सध्या निकल पडी असंच म्हणावं लागेल. त्याची नागिनमधली भूमिका रसिकांना ...

Nagin Star Arjun will now do Tashan-e-Ishq | नागिन स्टार अर्जुन आता करणार टशन-ए-इश्क

नागिन स्टार अर्जुन आता करणार टशन-ए-इश्क

'
;नागिन' या मालिकेत रितीक ही भूमिका साकारणा-या अर्जुन बिजलानीची सध्या निकल पडी असंच म्हणावं लागेल. त्याची नागिनमधली भूमिका रसिकांना भावली. त्यामुळंच की काय आता 'टशन-ए-इश्क' या मालिकेत अर्जुनची वर्णी लागणार आहे. 'टशन-ए-इश्क' या मालिकेतील सिद्धांत गुप्ता साकारत असलेली कुंज ही भूमिका अर्जुन साकारणार आहे. सिद्धांतनं ही मालिका सोडण्याचा निर्णय घेतल्यानं त्याच्या जागी अर्जुनची वर्णी लागलीय. या मालिकेनं आपल्याला ओळख आणि सारं काही दिलंय. मात्र प्रत्येकाला पुढे जावं लागतं. त्यामुळं मोठ्या जड मनानं शो सोडत असल्याचं सिद्धांतनं सांगितलं. अर्जुनची कुंज म्हणून एंट्री थोडी नाटकी असणार आहे. अपघातानंतर प्लास्टिक सर्जरी झालेला नवा कुंज सगळ्यांसमोर येणार आहे. आता नागिन स्टार अर्जुनच्या एंट्रीनं टशन-ए-इश्कचा टीआरपीसुद्धा वाढणार असंच म्हणावं लागेल.     

Web Title: Nagin Star Arjun will now do Tashan-e-Ishq