माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील हे आहेत बेस्ट फ्रेंड्स

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 9, 2017 14:59 IST2017-05-09T09:28:54+5:302017-05-09T14:59:54+5:30

माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत झळकणारे अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील हे खऱ्या आयुष्यात बेस्ट फ्रेंड्स आहेत. ते सेटवर नेहमीच मजा-मस्ती करत असतात.

My husband's wife, Fame Abhijit Khandkekar, Anita Date and Rasika Sunil are the best friends. | माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील हे आहेत बेस्ट फ्रेंड्स

माझ्या नवऱ्याची बायको फेम अभिजीत खांडकेकर, अनिता दाते आणि रसिका सुनील हे आहेत बेस्ट फ्रेंड्स

झ्या नवऱ्याची बायको या मालिकेत शनाया, राधिका आणि गुरुनाथ यांची तिकडी प्रेक्षकांना पाहायला मिळत आहे. राधिका ही गावंढळ आहे, तिला काहीही येत नाही असा गुरुनाथचा समज असल्याने तो या मालिकेच्या सुरुवातीला शनायाकडे ओढला गेला होता.  पण गुरुनाथला त्याची चूक कळली असून तो पुन्हा राधिकाच्या आयुष्यात आता परतला आहे. त्यामुळे या मालिकेच्या कथानकाला एक वेगळे वळण मिळाले आहे. प्रेक्षकांना सध्या मालिकेत गुरुनाथ आणि राधिका यांची केमिस्ट्री पाहायला मिळत आहे आणि ही केमिस्ट्री प्रेक्षकांना प्रचंड आवडत आहे. पण गुरुनाथ आणि राधिका यांच्यात निर्माण झालेल्या जवळकीमुळे शनाया प्रचंड चिडली आहे. ती राधिकाचा प्रचंड रागराग करते असे आपल्याला या मालिकेत पाहायला मिळत आहे.
माझ्या नवऱ्याची बायको या मालिकेत अभिजीत खांडकेकर, रसिका सुनील आणि अनिता दाते प्रमुख भूमिका साकारत आहे. या मालिकेत अभिजीत गुरूनाथ, रसिका शनायाची तर अनिता दाते राधिकाची भूमिका साकारत आहे. शनाया आणि राधिका यांच्यात असलेली भांडणे प्रेक्षकांना मालिकेत पाहायला मिळतात. पण तुम्हाला माहीत आहे का, खऱ्या आयुष्यात खूप चांगल्या मैत्रिणी आहेत. अनिता आणि रसिकाच नव्हे तर अभिजीत देखील त्या दोघांचा खूप चांगला फ्रेंड आहे. या तिघांची खूप चांगली मैत्री झाली असून मालिकेच्या सेटवर ते नेहमीच मजा मस्ती करत असतात. त्या तिघांची खूप छान भट्टी जमली आहे. 
रसिका सुनील नेहमीच त्यांच्या मजा-मस्तीचे फोटो सोशल मीडियावर पोस्ट करत असते आणि तिचे फॅन्स सोशल मीडियावर तिच्या फोटोची प्रशंसा करत असतात.  

 

Web Title: My husband's wife, Fame Abhijit Khandkekar, Anita Date and Rasika Sunil are the best friends.