​मेरी दुर्गा ही मालिका घेणार लीप

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 16, 2017 16:47 IST2017-05-16T11:17:31+5:302017-05-16T16:47:31+5:30

मालिकांनी लीप घेणे हा छोट्या पडद्यावरचा ट्रेंडच बनला आहे. अनेक मालिका सध्या लीप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिकेने ...

Mary Durga will take a series of leap | ​मेरी दुर्गा ही मालिका घेणार लीप

​मेरी दुर्गा ही मालिका घेणार लीप

लिकांनी लीप घेणे हा छोट्या पडद्यावरचा ट्रेंडच बनला आहे. अनेक मालिका सध्या लीप घेताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. मालिकेने लीप घेतल्यानंतर मालिकांच्या टिआरपीवर देखील चांगलाच परिणाम होताना आपल्याला दिसत आहे. त्यामुळे कथानकात काही बदल करायचे असल्यास लीप घेणे हे मालिकांसाठी सोईस्कर ठरते. आता प्रेक्षकांची एक आवडती मालिका लीप घेणार आहे.
मेरी दुर्गा ही मालिका काही महिन्यांपूर्वी सुरू झाली होती. या मालिकेत प्रेक्षकांना एक मुलगी आणि तिच्या पित्याची कथा पाहायला मिळाली होती. दुर्गा या चिमुकलीचा तिचे स्वप्न पूर्ण करण्याचा प्रवास प्रेक्षकांना या मालिकेत पाहायला मिळाला होता. या मालिकेची कथा प्रेक्षकांना चांगलीच भावली होती. तसेच या मालिकेतील दुर्गाची व्यक्तिरेखा प्रेक्षकांना प्रचंड आवडली होती. ही व्यक्तिरेखा मालिकेत अनन्या अग्रवाल या मुलीने साकारली होती. अनन्याने या भूमिकेला चांगला न्याय दिला होता. पण आता ही मालिका काही वर्षांचा लीप घेणार असून अनन्या प्रेक्षकांचा निरोप घेणार आहे.
अनन्याने या मालिकेद्वारे प्रेक्षकांच्या मनात घर केले आहे. त्यामुळे लीपनंतर दुर्गा ही भूमिका साकारण्याासठी तिच्या तोडीच्या अभिनेत्रीचा सध्या शोध सुरू आहे. मालिकेची टीम या भूमिकेसाठी सध्या अनेक ऑडिशन्स घेत आहे आणि या ऑडिशन्समधूनच नव्या दुर्गाची निवड होणार आहे.
मेरी दुर्गा या मालिकेने लीप घेतल्यानंतर या मालिकेच्या कथेला चांगलेच वळण मिळणार आहे. ही मालिका पुढील महिन्यात लीप घेणार असल्याची चर्चा आहे. आता लीप नंतर कोणती अभिनेत्री दुर्गाच्या भूमिकेत प्रेक्षकांना पाहायला मिळते, ते आपल्याला काहीच दिवसांत कळणार आहे. 

Web Title: Mary Durga will take a series of leap